मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
कोणासी साकडें गातां रामना...

संत चोखामेळा - कोणासी साकडें गातां रामना...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


कोणासी साकडें गातां रामनाम वाचे । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥

येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥

अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं । ऐसी साक्ष देती वेदशास्‍त्रें ॥३॥

चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP