मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आम्हां नकळे ज्ञान न कळे प...

संत चोखामेळा - आम्हां नकळे ज्ञान न कळे प...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आठी निगमाचा भेद । शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्‍टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP