मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
निगमाचे शाखे आगमाचें फळ ।...

संत चोखामेळा - निगमाचे शाखे आगमाचें फळ ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्‍त्रा बोल विठ्‌ठल हा ॥१॥

पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्‌ठल हा ॥२॥

निगम कल्पतरु भक्तांचा मांदुस । तोहा स्वयंप्रकाश विठ्‌ठल हा ॥३॥

चोखा म्हणे तो तूं जगाचे जीवन । संताचें मनरंजन विठ्‌ठल हा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP