मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
सुखाचें जें सुख चंद्रभ...

संत चोखामेळा - सुखाचें जें सुख चंद्रभ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP