मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
भाविकांच्या लोभा होऊनी आर...

संत चोखामेळा - भाविकांच्या लोभा होऊनी आर...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्‍ठत पंढरीये ॥१॥

काय करुं प्रेमा न कळे या देवा । गुंतोनियां भावा राहे सुखें ॥२॥

वर्ण अभिमान न धरीं कांहीं चाड । भक्ति सुख गोड तयालागीं ॥३॥

चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP