मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
न करीं आळस जाय पंढरीसी । ...

संत चोखामेळा - न करीं आळस जाय पंढरीसी । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


न करीं आळस जाय पंढरीसी । अवघी सुख राशि तेथें आहे ॥१॥

पाहातां भिंवरा करीं एक स्नान । घालीं लोटांगण पुंडलीका ॥२॥

कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखा सरी दुजी नाहीं ॥३॥

पाहातां श्रीमुख हरे तहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP