मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
महादोषराशि पापाचे कळप । न...

संत चोखामेळा - महादोषराशि पापाचे कळप । न...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


महादोषराशि पापाचे कळप । नामें सुखरुप कलियुगीं ॥१॥

म्हणोनि आळस करुं नका कोणी । नाम जपा वाणीं सर्वकाळ ॥२॥

आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करुं नका ॥३॥

चोखा म्हणे खातां जेवितां वाचे । नाम श्रीविठ्‌ठलाचें उच्चारावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP