मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ४१ ते ६०

दासोपंताची पदे - पद ४१ ते ६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


४१
अतुळ स्वरूप रे ! सगुणगुणहिन.
न दावति प्रबंधें आरे भक्तिभावें तो दिगंबरु.
देवनायकु स्वर्गदानीं उदारु गाइला; गुणभेदासि मारुनिया. ॥छ॥६॥

४२
शोभे मुकुटु शिरि यारे ! सुरनरवरदिप्पळीया.
दलितनेत्रमुखाब्जिं साजती अधर सुरगितनिरुपमवरि.
दंतकिरण राजतिया. अखिल दीप्ति भवतम पळिनलें.
मुनि वेधले; इतरें न रमती. येकैक देव त्रिदिव सोडूनि;
येकैके देव स्वसुख सांडुनि; येकैके देव जीवदान देउनि;
सकळ देव सेविति या; आनंदरूप श्रीदत्तुबा रे ! ॥१॥

४३
कलिमलादहन अवधूतु उद्भौ जना गुणेशु वा ! रे !
दीनदयाभरितमेघु, शोभनु, मुनिमनधामु,
निजसेवककुळानंदकु, सुरपतिअरिदमनु, सोमु,
दिगंबरु देवो धरियला मनीं. यियाईया ॥स्वर॥छ॥
जया विवर्त्तु गुणक्रुतुहा आइति हिनु पुराणु वा ! रे ! ॥२॥

४४
अरे ! उज्वळ - विदृमशोभि - नखगणदीप्ति - विराजितु !
कमळदळसमश्रीचरणे !
रे ! रे ! लोकाधिषु ! कैवल्यनिसंशोभितु ! पितवाससीं
अमरादिगण रातल्लेया !
सगुणसुंदररूपगुणीया ! श्रीगुरुसंगें रे !
परपदा रे ! सुभक्त पावले. पापभोगें ज्ञानसागरीं
निमज्जलेया रे ! भेदा मोंडुनि जीविता अर्पूनि अरे ! जीविता
अर्पूनियां तो गुरु धरियला मनीं तेहीं.
वैरिमुळा दुस्तरा छेदिलें; तो अवधूतु
ध्यान ज्ञान सांडूंनियां अतिगौरमूर्त्ति म्यां धरियला. ॥छ॥१॥

४५
आरेतियाईय्याईय्याईय्या
अरेथियाईय्याईय्याईय्यय्ययाईयय्ययाईयय्या
अय्याईयेअय्याइयेअय्याइये
अयेईयंवोईयाईवा
ईय्यय्ययाईईयंवोइय्यईय्या ॥छ॥२॥

४६
॥ अहीरी नाट ॥
गगनीं गहना चमकती ज्वाळा; पावकू उधळला रे !
यसणातपसू दारूणु; ब्रह्मगोळु तडतडिला. ॥१॥छ॥
नवल ! नवल ! रे ! तापस हो ! अत्रीचें तप ऐसें.
महां कल्पांतु मांडला; मूर्द्धा भूटला तपसें. ॥छ॥
त्या त्या सकळा प्राशुनि ज्वाळा; पावला त्वरित रे !
दिगंबरु आत्मारामु तया जाला हृदयगतु. ॥२॥

४७
बहुतां दिवसां हा दिनु ऐसा देखिला नयनी रे !
दत्ता ! तुझें स्वरूप अगम्य प्रकट जालें त्रीभूवनी. ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! रे ! तापस हो ! अत्रीचें तप कैसें ?
येसणें निधान साधिलें परब्रह्म अनायासे. ॥छ॥
देवांचा देॐ देहीं सर्वां योगिया आधारु रे !
अवधूतु आत्माराम प्रकटु जाला दिगंबरु. ॥२॥

४८
किरणीं जळकल्लोळ गमतां मृगें लांचावलीं रे !
सेखीं जळचि वाॐते; कैसी ? दुराशा कवळली रे ? ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! संसारीक हें तैसें.
जन हें जनासी नोळखे; वृथा ममतेचें पीसें ! ॥छ॥
गुरुवचनावरि सावधु हो ! पां ! साच तेचीं विचारीरे ! जना साच तें.
दिगंबरें तूटें भ्रमु; न धरीं मीपण शरीरीं. ॥२॥

४९
क्षितितळगतजळचंचळ ढळतां सागरीं वीसांवे रे !
नाहीं तया पुनरावृत्ति; कार्यकारणीं सामावे. ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! जिवासि जालें तैसें.
अवधूतें येकेंवीण लेया कोठेंचि न दीसे. ॥छ॥
नाना योनी भ्रमतां श्रमले साधनें आयासें रे !
दिगंबरीं जाले लीन, हे निवाले ब्रह्मरसें. ॥२॥

५०
मुनिजनजिवना ! पंकजनयना ! पाये मीं पाहीनरे !
अवधूता ! येणें देहें येर न ठके साधन. ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! चरणीचें महिमान.
बहुतां जन्माचा सेवटु; सत्य स्फुरे ब्रह्मज्ञान. ॥छ॥
निश्चळ नथरे; चंचळ हें मन मानसें वोढाळें रे !
दिगंबरा ! तूं मीं आत्मा; आतां न करीं वेगळें. ॥२॥

५१
तुझें रूप रूपलें हृदयीं; बानु लागला वासनेचा ठाइं. ॥१॥धृ॥
आतां काय सांगो ? दातारा ! अवधूता ! करुणासागरा ! ॥छ॥
जीवें नुरिजे ऐसें जाहालें; दिगंबरीं मानस निमालें. ॥२॥

५२
योगिराजीं रातलें हें मन; आतां न करीं मीं परचिंतन. ॥१॥धृ॥
काइसा लौकिकु मातें ? मीं येणें पंथें रातलिये. ॥छ॥
दिगंबरीं अर्पिलें हें मन; आतां न करीं आणिक स्मरण. ॥२॥

५३
देवा ! हृदय तुमचें मंदीर; करूं नये इतर बिढार. ॥१॥धृ॥
कायिसा लौकिकु आतां ? मी अवधूता रातलियें. ॥छ॥
दिगंबरेंचि दीपु लाविला; नांदे हृदयीं आत्मा येकला. ॥२॥

५४
दोन्हीं नेत्रकमळें वायीलीं; तीं माझीं न ह्मणें आपुलीं. ॥१॥धृ॥
आतां कुंठलें येर दर्शन; अवधूता येका वांचून. ॥छ॥
दिगंबरीं वाचा दीधली; तेणें नेउंनि स्मरणीं बांधली. ॥२॥

५५
पाय पाहिन नयनीं; शिर ठेवीन पुडती चरणीं. ॥१॥धृ॥
न करीं येरधारा आतां; श्रीअवधूता ! कृपाळुवा ! ॥छ॥
दिगंबरा ! अमृतसागरा ! आदिगुरो ! तूं माहेरा बापा ! ॥२॥

५६
दोन्हीं हात जोडूनि मागैन; नेणें बोलों सेवक अज्ञान. ॥१॥धृ॥
पुरे हा संसारु मातें; तूंविण परुतें नलगे. ॥छ॥
दिगंबरा ! स्वदीनवत्सला ! भवसागरू तारीं अवलीळा. ॥२॥

५७
सिद्धराजा ! अमृत जळधरा ! धर्मु न कळे मातें दुसरा. ॥१॥धृ॥
येइन तुज संगें संगें तूं पुढें मागें, हेंचि पुरे. ॥छ॥
दिगंबरा ! सुरगणवंदीता आदिगुरो ! श्रीअवधूता बापा ! ॥२॥

५८
संसार सर्पु मीं धरीन; तापत्रय आंगीं साहीन. ॥१॥धृ॥
परि संगु तुझा न सोडीं; भेदु विसरैन तुझिये आवडी. ॥छ॥
दिगंबरा ! तूं मी होईन; मग दंडु तोही मीं साहीन. ॥२॥

५९
आदिगुरो ! आत्मया रामा ! मंगळधामा ! अद्वैता ! ॥१॥धृ॥
मीं तूझा; तरि कां दीनवाणा जन्ममरणा आधीनू ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वज्ञु देही; तुजहूंनि नाहीं आणीकू. ॥२॥

६०
तत्वता तूं तत्व अदेही; तुजहूंनि नाहीं सर्वथा. ॥१॥धृ॥
पाये मी दिव करीन; आतां न भजे आणिक साधन. ॥छ॥
दिगंबरा ! तूं माझा आत्मा; संसारु आह्मां तो कइंचा ? ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP