मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे| पद १५०१ ते १५२० महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे पद १ ते २० पद २१ ते ४० पद ४१ ते ६० पद ६१ ते ८० पद ८१ ते १०० पद १०१ ते १२० पद १२१ ते १४० पद १४१ ते १६० पद १६१ ते १८० पद १८१ ते २०० पद २०१ ते २२० पद २२१ ते २४० पद २४१ ते २६० पद २६१ ते २८० पद २८१ ते ३०० पद ३०१ ते ३२० पद ३२१ ते ३४० पद ३४१ ते ३६० पद ३६१ ते ३८० पद ३८१ ते ४०० पद ४०१ ते ४२० पद ४२१ ते ४४० पद ४४१ ते ४६० पद ४६१ ते ४८० पद ४८१ ते ५०० पद ५०१ ते ५२० पद ५२१ ते ५४० पद ५४१ ते ५६० पद ५६१ ते ५८० पद ५८१ ते ६०० पद ६०१ ते ६२० पद ६२१ ते ६४० पद ६४१ ते ६६० पद ६६१ ते ६८० पद ६८१ ते ७०० पद ७०१ ते ७२० पद ७२१ ते ७४० पद ७४१ ते ७६० पद ७६१ ते ७८० पद ७८१ ते ८०० पद ८०१ ते ८२० पद ८२१ ते ८४० पद ८४१ ते ८६० पद ८६१ ते ८८० पद ८८१ ते ९०० पद ९०१ ते ९२० पद ९२१ ते ९४० पद ९४१ ते ९६० पद ९६१ ते ९८० पद ९८१ ते १००० पद १००१ ते १०२० पद १०२१ ते १०४० पद १०४१ ते १०६० पद १०६१ ते १०८० पद १०८१ ते ११०० पद ११०१ ते ११२० पद ११२१ ते ११४० पद ११४१ ते ११६० पद ११६१ ते ११८० पद ११८१ ते १२०० पद १२०१ ते १२२० पद १२२१ ते १२४० पद १२४१ ते १२६० पद १२६१ ते १२८० पद १२८१ ते १३०० पद १३०१ ते १३२० पद १३२१ ते १३४० पद १३४१ ते १३६० पद १३६१ ते १३८० पद १३८१ ते १४०० पद १४०१ ते १४२० पद १४२१ ते १४४० पद १४४१ ते १४६० पद १४६१ ते १४८० पद १४८१ ते १५०० पद १५०१ ते १५२० पद १५२१ ते १५४० पद १५४१ ते १५६० पद १५६१ ते १५८० पद १५८१ ते १६०० पद १६०१ ते १६०५ दासोपंताची पदे - पद १५०१ ते १५२० दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥ Tags : dasopantmarathiदासोपंतपदमराठी पद १५०१ ते १५२० Translation - भाषांतर १५०१कां गा ! लाविली अर्थकल्पना ? गत, मृत, बहू गुण वेदना ! ॥१॥धृ॥सेखीं मज जाणें येकट; अर्थु साधितां परम दुर्घट. ॥छ॥दिगंबरा ! हे सृष्टी चि कां केली ? गुणधर्में प्राणियें गोचिली ! ॥२॥१५०२माव करूंनि प्रगुप्त जालासी; तें चि अज्ञान बळवंत जनासी. ॥१॥धृ॥ऐसें कां बा ! श्रीदत्त ! कइं प्रकटसी ज्ञानसविता ? ॥छ॥दिगंबरा ! तुझें अज्ञान, तें चि संसारबंधासि कारण. ॥२॥१५०३आह्मा आमुचेनि कर्मबंधन; सुटिका ते नाहीं तुजवीण. ॥१॥धृ॥ऐसें कैसें हें तुझें करणें ? देइजे कव्हाणप्रति गार्हाणें ? ॥छ॥दिगंबरा ! हे माव न करीं. होतें पाहिलें, तैसें चि तें करीं. ॥२॥१५०४सर्वकर्ता तुज वीण कवणू ? अपराधी करितासि हा जनु. ॥१॥धृ॥आतां सांगणें काये कवणा ? अकर्ता ह्मणवीसी आपणा. ॥छ॥दिगंबरा ! तूं सर्वचाळकु, ऐसा योगी जाणती विवेकू. ॥२॥१५०५अविद्या कवणे निर्मिली ? माया रूपासि कवणे आणिली ? ॥१॥धृ॥आतां काये तुजसीं बोलणे ? मनीं जाणोंनि उगलें चि असणें. ॥छ॥दिगंबरा ! आह्मी कवण ? ऐसेंपाहे सत्य विचारूं. ॥२॥१५०६तूं चि निमित्य समवायी कारण;भिन्न विश्व हें कैंचें तुजवीण ? ॥१॥धृ॥लटिकें कित्तीं करिसी साचार ? अवधूता ! जाणती चतुर. ॥छ॥दिगंबरा ! तूं स्वरूपसन्मात्र; तद्वैत चि कैसें तदीतर ? ॥२॥१५०७अंधाकरिची काठी सूटली; मग ते नव्हे तया आपुली. ॥१॥धृ॥तैसें मज जालें गा ! देवा ! अंतरलासेइ; भेटसी केधवां ? ॥छ॥दिगंबरें वीण गति न दिसे. अंधकारु पडला दीवसें. ॥२॥१५०८लोभियाचें देवा ! धन जैसें जाये, तें चि लागे त्या पीसें; ॥१॥धृ॥तैसें मज जालें रे ! स्वजना ! तुजवांचूंनि कमळनयना ! ॥छ॥दिगंबराचें पीसें लागलें; नूतरे तें येराचें बोलणें. ॥२॥१५०९भेटि देइं, रे ! सखया ! स्वजना !मायेबापा ! पुरवीं वासना ! ॥१॥धृ॥अवकाशु न दिसे श्रीदत्ता ! वयवेगु आटली सरिता. ॥छ॥दिगंबरा ! मीं तुझें किंकर; तुझें मज बहु पडलें अंतर. ॥२॥१५१०आजि विषाचा मेघु बोलला !मज आतां चि प्रलयो पावला ! ॥१॥धृ॥अवधूतु गेला सांडूंनी; काये करूं ? सांगइं साजणी ! ॥छ॥दिगंबरेवीण मज न सहए ! प्राणपंचक सांडिन हे माये ! ॥२॥१५११जीउ प्राणु तूं रे ! सखया ! तुज सोडूंनि न सवे आत्मयां ! ॥१॥धृ॥अवधूता ! जासील केउता ? पाहे परतोंनि माझी अवस्था ! ॥छ॥दिगंबरा ! न करीं कठीण; निर्वाण पडताहे येउंन. ॥२॥१५१२ सादु घाली, तो जाये विनिर्फळु ! प्राणु माझा पडताहे विकळू ! ॥१॥धृ॥प्रतिसादु देइं अवधूता ! कयी नयनीं पाहिन अवधूता ! ॥छ॥दिगंबरा ! हृदय नेणसी; दुःखसागरु भरलाहे मानसीं ! ॥२॥१५१३क्षितितळ पाहातां कठीण; वरि शन्य, निरालंब, गगन. ॥१॥धृ॥आतां वाट पाहों केउती ? कोण ह्मणैल मातें आरुती ? ॥छ॥दिगंबरा ! तूं मज येकला ! परु नाहीं संसारीं आपुला ! ॥२॥१५१४वियोगाचे खरतर सायक साहों न शकें; देवा ! मीं रंक. ॥१॥धृ॥आतां काय मेलें चि मारिसी ? संसारीं वियोगें हाणसी ? ॥छ॥दिगंबरा ! निदान जाहालें. रूप दाखवीं मातें आपुलें. ॥२॥१५१५मागु पाहातां देखैन पाउलें; न्हायीन मीं तेणें मृगजलें. ॥१॥धृ॥तर्हि विश्रांति नेणें न दीसे, भेटिवांचूंनि दत्ता ! परियेसें. ॥छ॥लल्लाट हाणैन भूतळीं ! प्राणु ठेवीन त्या पादकमळीं ! ॥२॥दिगंबरा ! सत्य वचन आतां न पाहिजो तें निर्वाण. ॥३॥१५१६कवणाची आश करणें ? कवणाचा पुत्र ह्मणवणें ? ॥१॥धृ॥तुज ऐसिया असतां संसारीं, मायेबापा ! जालों दरिद्री. ॥छ॥दिगंबरा ! कैसें तुज न कळे ? निजांगा उणेपण आलें. ॥२॥१५१७मातें कवणु जाणें इतरू ? तूं सभाग्य दत्ता ! ईश्वरू ? ॥१॥धृ॥आतां लाज कवणा जाहाली ? चुकवावी कवणे आपुली ? ॥छ॥दिगंबरा ! घडलें अनुचित; आतां कीजो यावरि उचित. ॥२॥१५१८जेथें जाये, तुझा तुझा ची ! वास न पाहे देवा ! आणिकाची ! ॥१॥धृ॥आतां करिसील, तें करीं उचित; मिं तवं बापा ! सोडीं स्वमत. ॥छ॥यमु दंडील तें हीं साहीन. तेथें तुझा चि पुत्र ह्मणवीन. ॥२॥दिगंबरा ! तूं सर्वज्ञ जाणता; आतां होतास कां बळें नेणता ? ॥३॥१५१९पाशबद्धासि जो नरु सोडवी, तया धर्मिष्ठ ह्मणती अघवीं. ॥१॥धृ॥तया वधितां, पुरुषार्थु कवणु ? दिगंबरा ! नव्हसी कां जाणू ? ॥छ॥संसारें मीं दृष बांधला, गुणकर्मीं असतां गुंपला, ॥२॥अवधूता ! वियोगें हाणसी; पुरुषार्थु कां ऐसा साधिसी ? ॥३॥दिगंबरा ! टाके तें करीं; मीं वेचलों तुझां व्यापारीं. ॥४॥१५२०कित्ती शब्द हें बोलणें प्रखर ? तुतें न मनें माझें उत्तर. ॥१॥धृ॥आतां तुज उचित, तें करीं ! प्राणु देयीन मीं यया चि परी. ॥छ॥दिगंबरा ! तूं तवं जाणता; माझी कां पां नेणसी हे वेथा ? ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 17, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP