दासोपंताची पदे - पद १२६१ ते १२८०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
१२६१
॥ भिन्न ॥
अवृत्तीवृत्ती भारी मन खेदु पावे ! दत्ता ! तुजविण नानभावे. ॥१॥धृ॥
येइं ! श्रमु नीवारीं अरे ! शंकरा ! ॥छ॥
ने घे मीं तुंवीण सायोज्य मोक्षु ही; पादप्रेमसुख देइं.
दिगंबरा ! तूं माझा ईश्वरु ! देवा ! दुसरी गति मज नाहीं ! ॥२॥
१२६२
तो हा येतो; मनस हरीतो; आह्मीं यां सोडूं ना !
शोभा दावि गणसमुदायिं; गायक गाति करुणा ! ॥१॥धृ॥
पाहुं या गुरुचरणा ! धरूं त्या; मग सोडूं ना !
पाहातां श्रीवदना तृप्ति जालि या मना !
दिगंबरें गुणि माझि गुंतलि हे वासना ! ॥२॥
१२६३
॥ मल्हार ॥
प्रकटला मितु श्रीदत्तु हा रे !
सज्जना ! त्वरीतु प्रलपनी उल्हासादि करी तुवां
सेवनि बोध वैभवदायकु अचंचळ संतापशमनु
सन्न्तनु पुरानु स्वजनामाजि बरव तुवां ॥छ॥
जनभानें नुरवितु जाति सत्यानंदु मिरवे या
सुधीर साधकानंदले ते मीनले सुरतरु या
विण गर्जनें गुण संहारितु गणसंगे क्रीडा करीतु
साही रस परीत पावले वितुलल्ले चिद्गुणि या
प्रकटला मितु श्रीदत्तु हा रे ! सज्जना ! ॥१॥धृ॥
ऐसा सज्जनी रमतां निजगुणी
गुणवंतु बोध न रिपु तेणें संसारु विवर्त्तु हा ॥छ॥
अविज्जनमनोनाशकु संवेदनकळाभेदकु सन्नाशकु
गुणगणसंगें जनीं प्राणबंधन दायकु अगुणी स्फुरे क्षुल्लकु हा
निघु योगविदांप्रति दिगंबरु निर्मळु परु
चिदाद्वयसागरु सेउंनि न पवति संसारु वा ॥२॥
प्रकटला मितु श्रीदत्तु हा रे ! सज्जना ! ॥छ॥
१२६४
कांबोद.
काये मी चूकली कोणें कर्में भूतली ?
येणें दुरि धरिली; कां प्रीति सांडिली ? ॥१॥धृ॥
माझी जननी माझी जननी वो ! मज परजनी गेली मज सांडुनी;
काये करूं साजणी ? नाहीं मज कव्हणी ! एकट निदानी. ॥छ॥
वीकळ जाइन; प्राण मी देयीन;
दिगंबरें वांचूंन न धरीं जीवन ! ॥२॥
१२६५
गुणी गुण गुंपलें ! रूपीं रूप रूपलें !
मानस कुंठलें ! येणें मज मोहिलें ! ॥१॥धृ॥
काये करणें ? देइं रे ! चुकवीसी काइ रे ?
निश्चळु पाहि रे ठाइचा ठाइं रे ! ॥२॥
येणें जाणें मोडलें; साधन कुंठलें.
दिगंबरें नाशिलें; प्रेमसुख तोडिलें ! ॥३॥
१२६६
येकु वेळ नयनी पाहिन जननी;
अवधूतु साजणी जा कां घेउंनि. ॥१॥धृ॥
माझी माये, माझी माये, वो ! आठवत आहे;
वियोगु न साहे; जायिन मी सखिये ! येकु वेळ बाइये ! ॥छ॥
अवो ! अवो ! गोरिये ! ॥धृ॥
बहु, दिन लागले; जन्म चि लोटले;
योगवन शोधलें; दिगंबरु न कळे ! ॥२॥
१२६७
स्वप्नीं मुख देखिलें; मन माझें गुंपलें;
तेथूंनि न चले; तेणें देह सोडिलें ! ॥१॥धृ॥
रमारमणा ! रमारमणा ! रे ! कमळनयना !
गुणनिधाना ! दत्ता ! सगुणा ! ॥छ॥
श्यामल सुंदर धेलें तेणें अंतर;
दत्त दिगंबर पाहिन शंकर !
१२६८
जनें जन पाहिलें; योगवन शोधलें;
कर्मगिरि लंघिलें; नाहीं तुज देखिलें ! ॥१॥
कें होतासि ? कें होतासि ? रे ! दृष्टीहूंनि अंतरें;
भूलि मीं वीसरें ! आतां पुरे ! वा ! पुरे ! ॥छ॥
पालउ धरीन; आतां काये सोडीन ?
सवें येइन; न करीं साधन ! ॥२॥
जाणें तुझी लपणी; होतासि मीपणी !
दिगंबरा ! येथुनी न ठेवितें अझुणी ! ॥३॥
१२६९
वीष विषयरसवासने मन माझें गुंतलें; सखिये ! धर्म कुंठले !
कामें चपळ, चळ, चंचळ चळताहे; नाकळे ! सखिये ! कै आकळे ? ॥१॥धृ॥
हितविषयीं देहीं अंतर पडताहे बाइये ! सखिये ! वो ! गोरिये ! ॥छ॥
क्षणक्षणें हें क्षणभंगुर वय जाये माये ! वो ! आतां करूं काये ? वो !
दिगंबरें वो ! वीण न चले स्वहित माझे !
जाइ ! जा ! तया येथें आणिजा ! ॥२॥
१२७०
शब्दु न करा ! मज अर्थें अंतर जालें ! बाइये ! अवो ! अवो ! गोरिये !
मन विकळ माझें चंचळ, तळमळी;
माये ! वो ! तया करूं नये ? वो ! ॥१॥धृ॥
हृदयगतधन जातसे अवधुतू बाइये ! गेलयावरि न ये वो ! ॥छ॥
काहीं करा वो ! प्रतिकारु ! मी पुसतीसें या मना मनोजयसाधना !
दिगंबरेंसीं भेटि होईल तरि, मनोवासना होईल क्षीण कामना ! ॥२॥
१२७१
चंद्र, चांदिणें, काये चंदन करूं ? मी वो ! तापली ! गुणगणी पीटली !
निजहृदयीं दत्तु पाहिन क्षणभरि; पाउलीं त्याचां प्रीती गुंतली ! ॥१॥धृ॥
शब्दजनितु भ्रमु नव्हे वो ! सखिये ! हा ! शाब्दिकें दूरि नव्हे लौकिकें ! ॥छ॥
मी तें कवण ? माझें मज स्मरण नाहीं काहीं वो ! गुंपलियें देहीं वो !
दिगंबरें वो ! येणें वांचूंनि प्रतिकारू देहीं वो ! तैसा योगु नाहीं वो ! ॥२॥
१२७२
देह धरूंनि कैसी येउं मीं तुज प्रति ? शंकरा ! अरे ! ज्ञानसागरा !
दृश्यदर्शनें आड्पारक्य परतलें; भूलली;
मा तुझा पंथु चूकली ! ॥१॥धृ॥
काये करूं रे ? माझें चंचल मन बहू चूकलें ! भवनदीं लोटलें ! ॥छ॥
रूपसगुण तुझें धरीन हृदयीं मीं; साधन तें चि योगसेवन.
दिगंबरा ! तुजवांचूंनि भवदुःखहरण करूं शके कवण ? ॥२॥
१२७३
कांबोद.
जन्म जाहाले कोटी ! काळ क्रमले ! आतां दाखवीं पाये वो !
संसारवनीं कां मज सांडिलें ? दाखवीं पाये वो! ॥१॥धृ॥
दाखवीं पाये वो ! अवो ! माये ! दाखवीं पाये वो !
अवधुते ! मज कां दुरि धरिसी ? दाखवीं पाये वो ! ॥छ॥
वाट पाहातां तुझी गेलें वो ! वय माझें ! दाखवीं पाये वो !
दिगंबरे ! तुज येइन सवें ! आतां दाखवीं पाये वो ! ॥२॥
१२७४
सावळें डोळस रूप आठवे; क्षणक्षणा लागती बाण वो !
येर अर्थवाद काये मीं करूं ? मज लागती बाण वो ! ॥१॥धृ॥
लागती बाण वो ! सखिये वो ! लागती बाण वो !
अवधूतु न ये, वियोग खरतर; लागती बाण वो ! ॥छ॥
माये माझिये ! तुझे बोल चि आठवितां, लागती बाण वो !
दिगंबरे ! तुज वेगळी नसें आतां ! लागती बाण वो ! ॥२॥
१२७५
पाये धरिन; कयीं करिसी परति ? मीं वो ! जातिसें दुरि वो !
परतोनि मुख दाखवीं माये ! मिं वो ! जातिसें दुरि वो ! ॥१॥धृ॥
जातिसें दुरि वो ! अवो ! मीं जातिसें दुरि वो !
संसारपुर दुरुळ सासुरें जातिसें दूरि वो ! ॥छ॥
कंठु पालटला; शब्दा परति नाहीं; जातिसें दुरि वो !
दिगंबरे ! तुज सोडुनि, परजना जातिसें दूरि वो ! ॥२॥
१२७६
नाम घेतां चि रूप आठवे ! मनी मज न धरे धीरु वो !
माये ह्मणऊंनि झाडासि कवळीं ! न धरे धीरु वो ! ॥१॥धृ॥
न धरे धीरु वो ! तुजवीण न धरे धीरु वो !
भेटीवीण कैसें शरीर धरूं मीं ? न धरे धीरु वो ! ॥छ॥
रूप आठवतां, चंचळ मन माझें न धरे धीरु वो !
दिगंबरे ! बहु काळ कमले ! आतां न धरे धीरु वो ! ॥२॥
१२७७
मार्गु न कळे माये ! चंचळ मन माझें; कुंठली गति वो !
माये ! माये ! दीर्घस्वरें मीं आळवीं ! कुंठली गति वो ! ॥१॥धृ॥
कुंठली गति वो ! अवो ! माए ! कुंठली गति वो !
करणगुणगणीं मानस गुंपलें ! कुंठली गति वो ! ॥छ॥
दीशामंडळ वोस ! जावें कवणीकडे ? कुंठली गति वो !
दिगंबरे ! तूं न येसि तरि, माझी कुंठली गति वो ! ॥२॥
१२७८
वीषहृदयगत चंचळ मन माझें ! न चले गति वो !
काम, क्रोध, गुण काळज फाडिती; न चले बळ वो ! ॥१॥धृ॥
न चले बळ वो ! कैसें करूं ? न चले बळ वो !
माझें मज गुणकर्मविबंधन; न चले बळ वो ! ॥छ॥
अग्नि लागला देहीं ! पेटे हृदय ! न चले बळ वो !
दिगंबरे ! कयीं पावसी ? नेणवे; न चले बळ वो ! ॥२॥
१२७९
जळें सुटला मीनु करितुसें तळमळ; करणें काये ? ॥१॥धृ॥
अवधूतु मज सांडूंनि जातुसे ! करणे काये ? वो !
करणें काये ? वो ! अवो ! माये ! करणें काये !
पंचप्राणु हे देह सोडूंनि जातिल ! करणें काये ? वो !
दत्तीं गुंपलें मये ! नूपडे मन माझें; करणें काये ? वो !
दिगंबरु माझें आयुष्य हरीतुसे ! करणें काये ? वो. ॥२॥
१२८०
गुणी गुणदृष्टी; भजन तें वायां; सर्व ही ते गुणक्रीया. ॥१॥धृ॥
आत्मयां गुनसंगु तो नसे अव्यया ! ॥छ॥
विषद्रुम छाया, तेवि हे गुणमाया; योगी न रमती तिया.
श्रीदिगंबर गुणमुक्त सर्वत्र; अनुभवें जाणती तया. ! ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP