१४४१
॥ चतुरंग प्रबंध. ॥ धनाश्री.
मनिं भरल्ला अवधुतु रे ! रे ! सकलेप्सितहेतु आदिगुरु;
शरीरसंगपणें शशिशीतलु, अखंडितु वो.
सुवासीत दतु, स्रजाशोभितु, गंधें करूंनि चर्चितु वो,
अनंता सुखातें देतु; मुक्तावली यया उरी;
किरीटादि अलंकारी; दिनमणी विफल्लु जाला;
अरे ! उपमानें गेलीं लया. ॥१॥
१४४२
सा सा नि पा नि सा प नि सागा मा गा सा नि प सा निन्निनिनिप मा ग म्म पा नि निसा स्सा नि प म्मगम्म पा सा ग म्म पा स म्म ग स म्म ग स ग म पा ग म्म पा नि पा नि सा म्म ग सा नि सा प सा नि न्नि नि प म्मा ग म पा नि नि सा सा नि पा मा मा ग सा ॥छ॥
१४४३
झेम् झेम् ज्ग ज्ग झक्क् किण्णा कक्कुधांधारि तकु झेंत्र झेंत्र झंकिणा दाम् दाम् तद्धिमि धिमि धिमि दिग्दां दिग्दां धडा धाडां
तद्धिमिकिटातथडी कुनक किणा ॥छ॥
१४४४
तेन्न तेन्ना तेना तेन्ना तेन तेना तेन्ना तेन्ना तेना तेन्ना अरे तेना
तेन्ना तेन्ना तेन्ना तीन तेना तेना
तीन तीन तेना डुती डुनतेन्नातेना ॥छ॥
१४४५
मळाप
करुणाघन वोळपां देवा ! नामवादी गुणीयातें पाव तूं बा ! रे !
श्रुतिसुखा वाणी म्यां निरामयु चतुरंगें प्रबंधें
अरे ! दिगंबरु तोषवियला, लोकनायकु, मममनोलाभकु.
जीव देइन या. ॥छ॥छ॥
१४४६
॥ रामक्री ॥
कामितासि तो अर्थु अनर्थकू; सत्य जाणोंनि करिकां विवेकु. ॥१॥धृ॥
विक्षेपु भजतासि आपुला; तो चि लोपकु तुतें विनिर्मळा. ! ॥छ॥
आप जाणतां दृश्य मगजळ दिगंबरीं मन करीं निर्मळ. ॥२॥
१४४७
आप नेणोंनि करितासि कल्पना; वादवसी मृषा वासना. ॥१॥धृ॥
अवघें चि स्वप्न मायिक; सत्य केवळ तत्व तूं येक. ॥छ॥
दिगंबर निजरूप निर्मळ, आत्मतत्व हें; येर मृगजळ. ॥२॥
१४४८
मृगजळें येणें न नीवजे; मृग होउंनि, कासया श्रमिजे ? ॥१॥धृ॥
संसारु जाणोंनि करिकां. भय नाहीं विषय ही भोगितां ! ॥छ॥
दिगंबरेंवीण वर्म न कळे. येर डोळस, ते ही आंधळे. ॥२॥
१४४९
दृष्टी प्रसवली भाना सकळा; ते चि परतोनि लागे त्या मूळा. ॥१॥धृ॥
तइं भान मृगजळ आतलें. द्वैत अवघें तत्वीं सामावलें. ॥छ॥
दिगंबरीं प्रपंचु लटिका जाणु जाणे न कळे आणिका. ॥२॥
१४५०
अवस्था ते गुणप्रकल्पना; ते चि प्रपंचसंभावना. ॥१॥धृ॥
बहु काये करितासि सोसणी ? जाणु हो पां जना स्वस्थानीं. ॥छ॥
दिगंबरासि रिघ कां शरण तेणें होइल तमसविच्छेदन. ॥२॥
१४५१
आत्मविसरीं हे जन बुडाले; विपरीता वृत्ती चेइले. ॥१॥धृ॥
आतां ते चि बहुगुणें पाहातां, भ्रमु न तुटे बापा ! समर्था ! ॥छ॥
बाह्याक्रिया तें नव्हे साधन; बाह्यज्ञानें अज्ञानछेदन. ॥२॥
दिगंबरें स्वरूप नीवलें, तरि यथार्थ तत्व तें केलें. ॥३॥
१५५२
देह कोठें कैंचा आश्रमू ? वर्णु वैदिकु स्वधर्मू अधर्मू. ॥१॥धृ॥
तुतें तूं चि जाणसी जेधवा, तइं मिथ्या हा आभासु अघवा. ॥छ॥
स्वर्ग ? मृत्यु ? कैंचें पाताळ ? दिगंबर परब्रह्म केवळ. ॥२॥
देॐ मानिसील ते कल्पना. जाण त्रिपुटीवेगलें आपणा.
तेथें येकं चिन्मय केवळ. देवभक्त मृषा भान सकळ. ॥छ॥
दिगंबरें वीण युक्ति न कळे. आत्मविषयीं हें जन आंधळें. ॥२॥
१४५३
देॐ मानिसील ते कल्पना. जाण त्रिपुटीवेगलें आपणा. ॥१॥धृ॥
तेथें येकं चिन्मय केवळ. देवभक्त मृषा भान सकळ. ॥छ॥
दिगंबरें वीण युक्ति न कळे. आत्मविषयीं हें जन आंधळें. ॥२॥
१४५४
योगु नेणोंनि करितासि आपणा; तेणें बद्धत्व होइल त्या मना. ॥१॥धृ॥
अवलंबु भजती पामर. पासीं असोनि पडलें अंतर. ॥छ॥
मनें मन चि पाहातें पाहिजे. दिगंबरें चि हें वर्म जाणिजे. ॥२॥
१४५५
कां गा ! ह्मणतासि मनस विचंचळ ? अधिष्ठानेंसी नव्हे तें वेगळ. ॥१॥धृ॥
जेथें जाये तेथें चिन्मय. मनसेंसीं परब्रह्म विज्ञेय. ॥छ॥
दिगंबरीं चिदानंद जळधरीं मन भ्रमे, क्रीडे, वीरे लहरी. ॥२॥
१४५६
कासया हा प्रपंचु निरसावा ? कां योगासि आरंभु करावा ? ॥१॥धृ॥
सहज चि असतां स्वस्थिती निर्विकल्प समाधि आइती. ॥छ॥
दिगंबरें विण खूण नेणवे; म्हणउंनि चि साधन करावें. ॥२॥
१४५७
संसारिक करिती संसारु; योगियां योगु, तैसाचि व्यापारू. ॥१॥धृ॥
अधिष्ठान सत्य या दूसरें; जाणतां, तें सहज न स्फुरे. ॥छ॥
दिगंबरू न भेटे सद्गुरू, तरी केलाचि पाहिजे तो व्यापारू. ॥२॥
१४५८
विलावला प्रबंध देशांक
अवतरल्ला योगीराजु आनंदु जगतीवरी पावला.
ब्रह्मादि देवी धरणीस्थानी येउनि अभिनमिला रे !
बाळु रे ! गुणवंतु बहुगुणी आवरिलारे !
पादांभोजी मुनिजनु प्रिती रंगला.
तेणें योगाची मती योगीं विसरल्ले; यावधूतचरणाब्जिं विनटले
विषयां यरा हरा सुजाला स्तविती. गायक नाचती,
कमळनयना ! श्रीदत्ता ! ह्मणउंनियां रे ! ॥छ॥
प नि सा गा रि सा नि स ग ग्गा पा मा गा गा रि सा
रिगा रि सा रि सा नि धा प नि सा गा
रि सा नि नि ध प प म ग !
१४५९
सिंहासनभासी अवरूनि सूर्यो तपीत केला.
आनन वर विचारु करितां तंवं तुला नाहीं चि पाहातां.
कमळें क्षणीकें चंदृ सुक्षीणु; भानु तापदोषें विफळु जाला.
तें मुख पाहातां, नेत्रीं निमेषु साडिला.
ऐसा श्रीदत्तु निजजनाप्रति पोषकु हृदि समस्तीं धरीयला.
देॐ तो सुरेषु, दिनासि त्राता;
ऋषिसेवितु. गुणधर्मा सांडूंनि, मुनिजनु वेधला.
अधिकारियां ज्ञानसमुद्रु, दिगंबरु अत्रिकुमरु सुरजना आनंददु. ॥छ॥
१४६०
॥ बिलावल ॥ देशांक ॥ खंड. ॥
देखिला गुणईभ हरी रे ! सुरनरा परम कैवल्यनिधिय रे !
देखिला सिद्धराजु दुरीतदोशनाशनु; देखिला सिद्धांचियां सीद्धीतें.
अतिचोरिता देखिला निजभक्तांप्रति विज्ञानसागरु देॐ.
देखिला भवहरनु, स्वजना अति दिव्यमूर्ती; शंकरवरा सर्वशुभा. ॥१॥धृ॥