मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १६०१ ते १६०५

दासोपंताची पदे - पद १६०१ ते १६०५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१६०१
मल्हार कांबोद.
प्रेम कलिके वो ! कंदु, बोधोदयें इंदु,
मुनीसुमनमकरंदु, दत्तु गे ! माये !
विज्ञानाचें तत्व, तत्वाचें हीं तत्व,
सत्याचें हीं सत्यत्व, श्रीदत्तु गे ! माये ! ॥१॥धृ॥
स्वानंदकंदें हरिलीं सकलें हीं द्वंद्वें;
तनु, मन, परमानंदें धालीं गे ! बाइये ! ॥छ॥
सच्चित्सुखवो ! सार, परांहूंनि पर, निजीं नीज निरंतर निरुषाधि माये !
जीवाचें जीवन; मनीं मनाचें मन; श्रीदत्तें चि निर्वाणसिद्धि गे ! बाइये ! ॥२॥
पंच प्राणाचा प्राणु चेतना चेतनु अधेयाधिष्ठानु प्रकटवी !
अनुभवितां समरसु विज्ञानामृतरसु गुणियां राजहंसु दावि गे ! माये ! ॥३॥
शून्याचा उलथा गगन गालूंनि घेतां, नुरवीं द्वैताद्वैता सत्तामात्रें.
ऐसा हा दिगंबरु योगियां शंकरु चित्सुखाहूंनि परु स्वातंत्र गे ! माये !

१६०२
श्रमूनि आलियें तुजपासीं वो ! माये ! बहिणी ! काहीं बोलईंन गुज
हृदय तापलें निवें पीयूषें प्रेमसौरसें सांग ऐसें काहीं मज.
कवणे विभ्रमें भूलि जाकली ? काहीं न कले मन विसरलें काज.
शरीर न दिसे व्यवहारतां; कर्म दूरि ठेलें; यत्न राहिले सहज. ॥१॥धृ॥
स्वप्न नव्हे वो ! नव्हे जागरु ! नाहीं विसरु; जाणें अवघा विचारु !
बाह्यांतर भाष मोडली; वृत्ति निवलली; गेला विलया आकारु. ॥छ॥
नयन सांडुंनि गेलें देखणें; देह मीं नेणें; माझें जाहालें वो ! काये ?
गगनाकारुवो ! सर्व अवघें देखें नवल बहु बोलतां न ये.
मज मीं जाणतां रूप नाहीं वो ! ते मीं खेचरा कैसी जालिये ?
माये शशि सूर्य हे दोन्ही लोपले !
तर्‍हीं अंतरीं ओम निवलत आहे. ॥२॥
अदृश्य दृश्य दृश्य सांडितां दर्शन चित्ता म्या वो ! गगन गीलिलें !
देखणेंपणासि ठाॐ नाहीं वो ! अतिनिर्मल आंगें आंग भरलें !
धरिजे, सोडिजे, ऐसें नव्हे वो ! विमलाद्वयचित्सुखमय ठेलें
नेणत नेणत आते जाणनें जाणों जाणतां सुख हातिचें गलालें. ॥३॥
जीव ईश्वर भाव न गमती भास मोडला भेदु स्वरूपीं न साहे
ऐसें हें कासया मज जाहालें ? सत्य सांगपां; धरीन तुझे पाये !
आंगी आडलें परि न कले भान स्पर्शाचें तेथ देहहीन पाहें
नयन उघडो दृश्य न दिसे शब्दु ऐकतां नेणें तयाची मीं सोये ! ॥४॥
वचन बोले सखी हांसोनी ::- अवो ! बहिणी ! तुज भेटला कव्हणी
नाहीं कीं येकटु येकु जनी वनी कर्मसाधनी हे वो ! तयाची करणी.
येरी ह्मणे ::- गुणमती क्रीडतां, अर्थु चिंतिता, आला दिगंबरु ध्यानीं.
सर्वस्वें पालटु मज जाहाला ! भास लोपला ! तया दिवसापासुनी. ॥५॥

१६०३
॥ राग मल्हार, डांका. ॥
महाशून्याचा वोवरा शून्यें रेखिला देव्हारा.
सुखसुमनें उपचारा; चिद्दीपक मांडले.
समाधि निःशब्दाची डांक निजनिवृत्तिदोरक.
होती ज्ञानस्पंदादिक ते सकलैक घागरिया.
अलयो अविक्षेप दोन्ही डांके करिती आलवणी.
गुणसाम्याचा आसनी प्रकृति जानी बैसली.
पंचाक्षरी अवधूतु पासीं बैसला श्रीदत्तु;
ब्रह्मभावना जपतु गुणवारें अवतरवीं. ॥१॥धृ॥
राहांण माडलें अपाडें वारें घेतलें त्या झाडें
डाक्यांत उतडा उडे डांक बुडे सुशब्दीं.
ऐसा विसंचु तो संचु भोगी भोगा वेचे वेचु.
गीत साचारु असाचु तैं निर्वचु उठिला. ॥छ॥
प्रथम डांक नादवितां नमन केलें गणनाथा,
स्वामी, सद्गुरु, समर्था, गुणातीता, केवला.
नमन सारदे अक्षरें गुरुकृपें श्रीशंकरें.
राहाणीम गाईं आदरें, प्रेमभारें डोलतु.
नमस्करु भूतनाथा, अत्रीवरदा, अवधूता;
तूं बा ! सकलजगकर्ता विश्वपिता ह्मणौनी.
भैरव भूतांचा गोसावीं गुरु हस्तु नमिला जीवीं
वंदुनि मस्तकीं खड्भावीं ( ? ) अनुभवीं पावलों. ॥२॥
नमन करूं त्या खेचरां देवा ऋषीयोगेश्वरां,
पंचाक्षरीया अपारां ज्ञानधीरा पुडती.
नमन भूचरातें करूं तुटे जयाचेनि संसारु.
सारासारज्ञ चतुरु जनु येरु नमिला.
राहाण यावें जी ! सकलीं भोगु घ्यावा ज्ञाप्ति मूलीं
सहज सुखाची नवाली आपापुली देववीं
झणें रुसाल कव्हणीं आह्मीं घेतसों मागोंनि
यावें यावेंपां धांवोंनि ये आसनीं अवघीं ॥३॥
जानी बैसली सन्मुख ते स्वरूपीं प्राड्मुख
मुद्रा उन्मेषें अचूक ऐसें येक उफराठें
पंचाक्षरी ऐसें ह्मणें ::- येथें पाहाणें न पाहाणें.
न पाहोंनि जें पाहाणें तेणें गुणें घे मुद्रा.
मुद्रा लाविली उन्मेषीं सुख बैसलें जीवेंसीं
आसन धेलें येकदेशी वारयास सौरसु
जानी घुमती अपारें पाडें येत आहे वारें
जती राजसीच्या गारें विसावे रे ! भाइनो ! ॥४॥
येइं वो ! राजसे ! वेल्हाले ! चतुर्मुखें खेलें, मेलें !
तुं वो ! स्वर्गीची देवता ! आह्मीं ह्मणों जगन्माता !
वेलु कां लागला पावतां ? भोगु वृथा जाईल.
कमलसंभवे वो ! नारी ! वेद शब्दु वो ! तुझे च्यार्‍ही !
कां नै येसी येथवरी ? कवण परी चूकलीं ?
जानी झडकिली तेव्हेली, वारें आलें बलोबलीं
हाक फूटली अंतराली ! घुमे बाली आनंदें ! ॥५॥
शुद्ध शबल जालें काये ? महाद्भूत जालें माये !
अहंकारें घुमती होये तीन्ही पाये पसरीले.
तमें व्योमा संचु केला तेथें पवनु उधलला;
दहज जन्मोनिया व्याला त्या निर्मिला उदका.
पृथ्वी तरंगती जाली बा ! रे देतसे आरोली
शंका उठुनि पलाली बोलिनली प्रकृती.
वारें ह्मणे ::- काये ? सांगा ! तुह्मीं पाहिजे ते मागा !
विश्व भरीन भोगी ! भोगा ! जे प्रसंगा पाहिजे ! ॥६॥
भूतें द्रव्यें विभागिलीं येकें दों दों ठांयीं केलीं
दोन्ही देहें उभाविलीं ते दिधलीं वांटुंनी.
शब्दु घेइं रे ! श्रवणा ! रूप प्रसादु नयना !
रसु मागते रसना ! पढिये घ्राणा परिमल !
त्वचे स्पर्श आवडला; तीतें तो चि प्रियु जाला.
विराटु आपणा घेतला; विस्तारिला हा लोकु.
येक जारज, श्वेदज, अंडज, आणि उद्बीज,
तृण, वृक्ष, गुल्म, सहज ऐसें चोंज मांडिलें ! ॥७॥
कर्म प्रसादु वाटला; धर्म ज्याचा तया दिधला;
उपकारु महा केला. भक्ता जाला संतोषु.
दिवस, निसी, पैं निदानीं शशी, सूर्य, अभिमानी
तारांगणें ये गगनीं, ग्रह, नक्षत्रें, मालिका.
नाना शिखरें पैं मेरू सप्त सागरु विस्तारु
केला महीचा समग्रु भूत ग्राम रचिला.
ऐसी पद्मजा पातली रजोगुणें खेलिनली.
आतां येइं, वो ! वहिली, सत्ववंते ! साउलिये ! ॥८॥
संखासुराची वैरिणी ! धरिणीधरे ! वो ! योगिणी !
तुझा धाकु त्रिभुवनी अवो ! बली बलकें !
तडक फुटला अवचिता स्तंबीं प्रकटली देवता !
गर्जे हंकारें ! खलुता हिरण्यकश्यपु पाडिला !
ते तूं प्रल्हादाकारणें आलीसि माये ! योगें जेणें,
तैसी करि कां वो  ! धावणें ! भक्तिधरणें मांडिलें !
दशाननाचे वैरिणी ! अवो ! यादवे ! गौलिणी !
अवो ! मुकिये ! मानविणी ! पावे पावे सवेग ! ॥९॥
पूर्वीं मातेचियां शोका आलीसि तैसी तूं येकां
पैला अजमेला पैं येकां गुजादिका लागुंनी
भक्तालागि उताविले ! अवो ! सात्विके ! वेल्हाले !
झणें ॐसंडिसी ये वेले तुझेनि बलें राहाण.
तंव तो गुणियां गुणवतु तेथें असे अनुमानितु
नेत्रस्पर्शे आकर्षितु अध्यासाचेनि बलें
येती थरथरां कां० टाले स्पंदें गुणाचेनि बलें
झडकी अक्षता तेव्हेले डांका नांदु अद्भुतु. ॥१०॥
हांक फूटली अंत्राली शब्दु न सटे पोकली
देवता पावली पावली बोलियेली आनंदें
कवणें बलियें अबला हाला ? कवणें कवणू पैं माजिला ?
कवणें माझ धांवा केला ? तो वहिला दावावा !
भक्त ह्मणती ::- अवो ! माये ! धरित असो तुझे पाये.
कवण आलीसि ? वो ! काये नाम तुझें ? स्वामिणी !
जलदेवता मीं ! हे जाणा ! वसें गिरीमस्तकीं ! ॥११॥
भक्त ह्मणती ::- वो ! देवते ! घेइं भोगू, खेलें येथें !
देईं प्रसादु आमुतें ! अभय्हस्तें कुरवालीं !
डांका घुमती सभारें; झाड खेलताहे वारें;
भूतें चालिलीं अपारें; हिरण्यगर्भु संचला.
विष्णु, ब्रह्मा, आणि रुद्र, झाडीं खेले इंद्रचंद्र,
नारायण, दिवाकरु, अग्नि, वायो, वरुणु.
अश्विन प्रजापतीदिगा ( ? ) उपइंद्रु आला वेगा !
गोंदलु मांडला निजांगा आंगें आंग प्रकृती. ॥१२॥
वडिल झावली प्रलपे ::- सत्वधीरा समाटोपें
कांहीं मागा रे ! संकल्पें अर्थरूपें देइंन.
येकां भोग, मोक्षदान, काम, अर्थु, उपादान,
करवीं आपुलें ह्मणौन उच्च स्थान देइं कां.
संखासुरातें विदारी, वेद रक्षावयां च्यार्‍ही.
कठिण पुष्टि धरा धरी दाढेवरि मागुती
येका नेउंनि पाताला सवें चि होय द्वारपाला
निष्ठुर हि ते कृपाला भक्तकुला लाहाणी. ॥१३॥
पुत्र रक्षिले येकाचे; निज सेवक सेवेचे.
पिते जानुवरि त्याचे हातखोंचें वधिले.
क्षेत्रकुलें संहारुंनि, विप्रां दिधली मेदनी;
भुजा सहस्र छेदूंनि; आणी रणी अजुना.
येका राज्य तें दिधलें; येकां राक्षस वधिले;
सत्य प्रतिज्ञेतें केलें; ऐसी महा माया हे !
मामा आपुला वधिला; भूमीभार उतरला;
धर्मु अर्जुनू स्थापिला; सहारिला कौरव. ॥१४॥
सांपें आलीसें मोहना पाहे दृष्टीचि या चिन्हा.
काये करील पुढें कवणा ? तें कवण जाणावें ?
रामा येका साटीं पैला नेले स्वर्गा अजमेला
भक्तु पढिये तो दुबला ऐसी लीला पैं तुझी.
अभय हस्तें ह्मणे सुखें मातें वंदावें या लोकें
वरि पडलोनि दुःखें स्मरा येकें मानसें
ऐसें बोलोंनि ते गेली जानी सावधान जाली
आतां पाचारा वहिली रुद्रुरूपीं खेचरा. ॥१५॥
येइं येइं वो ! त्रिनत्रे ! शुळपाणि ! पंचवक्त्रे !
गजांबरे ! कीं विचित्रे ! ध्ययमात्रे ! तामसें !
बाली भोली वो ! तूं कैसी ? राहाण मांडलें तूं ने येसी
पाये झाडीन मीं केशीं जेव्हां येसी आसना.
साटी थोड्या देणें बहु तुं वो ! हृदयींची मउ
परत्री केलासे आठउ तुतें जीउ न वंचु
तंवं ते बलि मागों पाहे येर ह्मणती ::- वो ! माये !
दृश्य वोडविलें आहे वरि काये मागणें ? ॥१६॥
तंवं ते सभारें पातली माया मौनेंसीं येकली
हाक लयें चि फुटली बोधें बाली पाहातुसे.
पहिलेनि चि ग्रासें येकें स्थूलें नेलीं सकलिकें
महातेजाचेनि सुखें पैं आणिकें आवर्षणें
पाठीं वर्षें मुसलधारी जलमुखें ते धरित्री
फुटे ब्रह्मांड त्यावरी घे उदरीं विराट
आप नेलें तेजमुखें तेजें पवन हाणें तवकें
पवन गगनमुखें चाखे ते हीं येक अहंकार. ॥१७॥
तामसु राजसें स्वीकारी राजस सत्व मुखीं भरी
सत्व महत्तत्त्वीं धरी ते आहारी अव्यक्तें
ते हीं अव्यक्त नुरवी आपण आपणा हीं जेवी
प्रलयो प्रलयीं नेठवी झाडा गोवी मांडली.
वन्ही लागे त्या कापुरा तो तेणेंसी होए पुरा
मारुंनि मारका मारी मारा स्वशरीरा नुरवी.
जें जें राजस देणें सात्वीकींचें सत्वगुणें,
तें तामसीचेनि भोजनें नुरे गुणें गुणीक. ॥१८॥
ऐस्या तीथीं खेलें मलें खेलनलीया सकालें
अवस्थात्रयाचे सोहले हे मानले जीयेंसीं
तया देव ती चि माये गुणत्रय जीचे पाये
शुद्ध सत्त्वमयी ज्ञेय जे पां ध्येय योगियां
प्रकृति झाड खेले जिया विण प्रकृति जेला ज्ञेया
पुरुषत्व जे आली आया ते सन्मया पाचारु
नाम, रूप, वर्ण व्यक्ति स्वयं पुरुष ना प्रकृति
मूलभूतां अस्ति भाति प्रीय मूर्ति आवाहनु ॥१९॥
गमागमविरहिते ! के मीं आवाहनु वो ! तुतें
विसर्जन कें मागुतें नाहीं रितें तुझेनी.
अरूप कैसें पां वर्णनें अनाम ज ती माजि गाणें
सर्व रूपें तें वंदणें सर्वपणें केवि पां ?
केवि पाचारु न पाचारु जाणो नेणों तुझा पारु
तूं मीपणा अगोचरु अनिद्धारु निर्धारें
द्रष्टा दृश्य वो ! दर्शन मोडी ज्ञाता ज्ञेय ज्ञान
प्रकट प्रकृति माजूंन भेदस्थान ग्रासूंनि ॥२०॥
हाले न ज्ञानें ज्ञाना ज्ञान शून्यें अशून्यें अशून्य
स्वरूप प्रकटे चैतन्य तुझें ध्यान अद्वय.
तूं चि तुझें वो ! जाणणें आपआपुलें नेणणें
तूं चि तुझें वो ! असणें आनंनें तूं तुझें
परापासाव तूं परे आदियोगिणी ! अक्षरे !
प्रकट होइं शुद्धाकारें झडकरें करूंनि.
आह्मीं मांडलें राहण तुजसाटीं ठेविलें प्राण;
वेगीं येईं वो ! ह्मणउन हात जोडूंन विनउ ॥२१॥
पर्वी जनकांचा घरीं राहण जालें या चि परी.
बहुत खेलीनली वारीं तूझी सरी न ये ची !
रोमें केलें मांगां जाण ठाईं आपुलां राहण
ते चि धरिली आह्मीं खुण ज्ञान ध्यान संपती
मीनलीं असतां दोघें जणें राहाण घेतलें अर्जुनें
तें उगवलें नारायणें पडलें जाणें तूं ते ची
ऐसे सकल ऋषीगण, देव, मानव, राहाण
घालिती गुरूचें वचन पैं प्रमाण करूंनि ॥२२॥
आह्मां श्रीदत्तु गोसांवीं जाणे हे विद्या अघवी
राहाण मांडिलेंसे जीवीं निजभावीं निर्गुणीं
येथ यावें वो ! उगिया ! आह्मां अवधूतु बलिया
आणील बुद्धि तुंतें ठाया मानु जाईल वांयां
ऐसें आइकोंनि निर्वाण देवता प्रकटली पूर्ण
प्रकृती जातुसे विरोंन झाडें प्राण सांडिले !
मोडूनि प्रकृतीचा थारा आपण घुमवा रे ! वारा
नेणें द्वैतभाॐ खरा स्वमाहेरा ! हांक दे ! ॥२३॥
मेली प्रकृति न मरे वारें जाउनि संचरे वारें भरे येरायेरे लागली
झाडा वारया मिलणी वितुलले गुण तीन्ही
शब्द उठिले तेथूनी ते सज्जनी जाणावे.
हाणा हाणा वंध्यासूतु करा आशेचा घातु
शून्यें उबारासें होतु व्योमा हातु ने दिजा !
आकाशाचें पुष्प तोडा मृगजलाची धांव मोडा
दीपेंतम वेढा वेढा ज्ञान वेढा लाविला ! ॥२४॥
द्रष्टा खोंचा रे ! या दृष्टी पाहा जाणीवेची पाठि
त्या कां जणियां सेवटीं मरणा पोटी घालुंनि
नाना मीपण हे दृष्टी न करा बोघेंसीं या भेटी
सांगैन मीं जीवीची गोठी उठा उठी तुमतें
जयासाठीं राहण केलें तंव नाहीं आलें गेलें
ठाईंठईं चि संचलें दुर्‍हावलें परपारी
जरि वेचाल रूपा, नामा ! कर्मा, अकर्मा, विकर्मा,
देहबुद्धि, गुणधर्मा, तरि तें तुह्मां सांपडें. ॥२५॥
अविक्षेप लागली माये ! राणी फिटे ह्मणतां ते कैसेनि ?
सांगा तीयेची सांडणी; आत्मज्ञानीं पाहिजा.
पैल वंध्येचा कुमरु बलि द्या रे ! अहंकारु !
आकाशाचा तोडा महुरु ! करा मारु कल्पने !
अंधकराची कालिमा लावा दिनकरा ते मा
आणा घटिचा चंडू मा सर्पु घ्या मा दोराचा.
नाथिलें तें नाहीं करा; पाठीं अविद्येतें मारा;
भेॐ न धरा ! न धरा ! ते विचारा न लभे. ॥२६॥
जया पदा भ्रंशलेति ते पैं पावों पाहती त्वितीं
तरि ऐका येक उक्ति आप्त ज्ञप्ति ऐसिये.
निजमस्तकीं बैसावें; छायेपुढें न लपावें;
व्याम व्योमीं पोववावें दृष्टी पाहवे द्रष्टया.
असिजे तैसें असावया होतो होये तें व्हावया
करी क्रिया कां अक्रिया ते पैं तया बाहेरी
जें जें जैसें जेथ वतें तें तें असत तेथ तैसें
नसणें नाहीं जे वस्तुतें आणी सर्वांतें अस्तीत. ॥२७॥
जाणोंनि चि नेणा आपा नेणोनि जाणा रे ! स्वरूपा
जाणा नेणा कैं निष्कंपा निर्विकल्पा निर्धारें.
इतुलें निर्वाण बोलली देवता स्ययं जाती जाली
झाड दे ते आलीपिली भूमंडली पडिलें.
नाना झाडेंसीं सहित वारें गेलें न दिसत.
आदि येकमेकांतें हारपत वोवरा नाही वोवरा उडाला
देव्हारया गजबुजाला दीपी क्षेपु मावलला
ठेक ठेला प्रबोधु प्रभोधीं बोधु बोधें रे ! ॥२८॥
डांक जेथिची तेथ विरे ना दुजी राला अंबरें
संसारें सहित डांक विसरले आपा
चुकले स्वरूपें रूरूपा पंचाक्षरी नव्हे सोपा
आपण पयां उतरी ऐसें राहण हें संपलें
अवघे न खेलिनले जें पुसावें तें अवधूतें उगविलें
नवल जालें अपूर्व काहीं न दिसे ना तें दिसे.
असे नसेसे न भासे कवण ललीत गावें कैसें अनारिसें मांडलें ॥२९॥
भेदु भाविता दुर्‍हावें तुवली ह्मणतां भेदु भावे
जालें मीं चि मीं आघवें तें चि कीं सुख आंगां विसावलें
काये कवण मांगां बोले ? द्रष्टा द्रष्टत्वें निवलले
सद्रूप पंचाक्षरी हा चोखडा मुलें नुरवी वारे नसी झाडा
करूंनि येरांचा ही दवडा तत्वीं झाडा मांडिला.
मी तूं पण आटियेलें अवघेंनि दाविलें दिगंबरें ऐसें केलें उगविलें xx

१६०४
॥ अहिरी. ॥
तुमचा हा जालों गातां; वोसंडला कांह्या ?
प्रपंचें गांजिलें; आलों तुमचि ठायां ! ॥१॥धृ॥
प्रेम ही नुरे प्रेम ही नुरे जाहालों तर्‍ही मी पाहीं प्रेम ही नुरे. ॥छ॥
तुह्मा चि देखतां बहुवेळ आला गेला
दिगंबरा ! आतां कें होइंन वेगळा ? ॥२॥

१६०५
न साहे, न साहे देवा ! वियोगु यया जीवा !
करि करि करुणा; दाखवी चरणा. ॥१॥धृ॥
येई येई ! न लावि उसिरू, आजि वो ! ये घडी. ॥छ॥
न धरे न धरे धीरू काये मीं वो ! करूं ?
दिगंबरा ! दावीं पाय, झडकरि रूपा.

॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
यो वेदैरनुभूयते सुकृतिभिः सत्कर्मभिर्योर्च्यते ।
यस्यानुग्रहतस्तरंति सुधियो मायां महादुस्तराम् ॥
तं देवं वरदं पुराणपुरुषं श्रीदत्तमत्रेः सुतम् ।
संसाराब्धिमतीत्य गंतुमनसो नित्य स्मरामो वयम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP