दासोपंताची पदे - पद ४०१ ते ४२०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
४०१
मनुजा रे ! वीण श्रीगुरुनाथें वायांचि धावासी योगपंथें. ॥१॥धृ॥
तैसें नव्हे आन सुखा; हें तुं पै जाण. नोहे दुःखाचें हरण. ॥छ॥
देहीं नाहीं तरी नाशी; तयांचा गुरुविण सुखा ठाॐ कैचा ?
मनसीं दिगंबरु संचरे; जें देॐ चि होणें; तई येर काई ? ॥२॥
४०२
॥ भिन्न चाली ॥
मन गुण चारी चले चंचल अहितपर.
वेदना हृदय विदारी. वेदना भयद निवारीं.
आतां संगु सखया ! दे. ॥१॥धृ॥
सांग देवा, कयीं येसी ? मातें भेदु न साहे.
छेदी समळ भवद हें. हरीं समळ ॥०॥छ॥
जन, धन, जाया, माया - बंधन, बाधक - गुण.
निरसी जनन येथूंनीं. देवा ! दिगंबरा ! तूं ये. ॥२॥
४०३
॥ भिन्न चाली ॥
सकळ सुंदर रूप आठवितां मनीं वियोगवेथा. ॥१॥धृ॥
सैये ! कामना कामना पूरवी. तेणेंसीं करा भेटीं. ॥छ॥
देव दिगंबर स्मरतांचि माये ! मीपण विरोनि जाये. ॥२॥
॥ भिन्न चाली ॥
४०४
परम शंकर शिवरूप माये ! दृष्टी केवि मीं पाहें ? ॥१॥धृ॥
सैये ! देखणें येथूंनि नुरवीं. शरीरें साही न तूटी. ॥छ॥
देव - दिगंबरीं आतां भेटी - लागि आत्मत्व न धरीं आंगीं. ॥२॥
॥ भिन्न ॥
४०५
नको मनसा विषयांची कामना. भारी बाधकु संसार सिवणा. ॥१॥धृ॥
वंचली हीता; जाहाली हारी; मीं कैसें करूं ? हें दुराचारीं. ॥छ॥
गुणगणवैरी येयां हातीं पडली मज नुमजे करणी.
काये करीं ? दिगंबरु देॐ स्मरें अखंड.
तया वांचूंनी नाहीं वो ! सुखकारी. ॥२॥
॥ काफी ॥
४०६
नको करूं रे ! दूरी आतां. बहु श्रमलें मन
नेणों दुसरें मानसें देवा ! दत्ता ! तुजवीण न दिसे सुखद. ॥१॥धृ॥
प्राण - सखया ! तुविण निरसी दुःख कवण ? ॥छ॥
देइ वर - दा हातु मागें.
भयद दिसे भान; येथें न भजे आणिकां. देवा !
देवा ! दिगंबरा ! न करीं कठीण. ॥२॥
४०७
दत्तू कव्हणीं दावा डोळा. रति गुंतलें मन.
काय चुकलीं ? नेणवे सैये ! गेला अवधुतु बिजनीं सांडुन. ॥१॥धृ॥
योगवरदा वांचून, हां वो ! ज्ञानवरदा०, ॥
योगवरदा०, ॥ जातिल विकळ प्राण. ॥छ॥
दीर्घे आळवी; सादु घालीं; न ये अझुणीं माये !
कोठें न कळे गुंतला ! सैये !
देॐ दिगंबरु नव्हे वो ! निष्ठुरु. ॥२॥
४०८
सुर तेरी लाल पियारी
जाउंगी बलि हारी हारी, पिरत लगी तेरी.
सुध बिसारी बादी लाल तुह्मारी हो ! ॥१॥धृ॥
लाल देखुं केउं नही ? मेरे मेरे ये लाल देखुं केउं नहीं ? ॥छ॥
दील सुचोरी खासत तेरी.
ज्याउंगी, ज्याउंगी, बलि हारि रे ! ॥२॥
सार दुराई सारी सारी.
दिगंबर ! तेरी कैसी यारी ? ॥३॥
॥ तोडी ॥
४०९
कीती सीकवाल मातें ? जाइन मीं तेण पंथें.
अवधूती रती; चीत्त न सोडी तयातें. ॥१॥धृ॥
वेधु लागला वो ! साजणी ! आतां रंगलीयें त्याचा गुणी.
नाइकें मीं सीकवण. न बोला कव्हणी.
देहे बुद्धी हारपलीं शंका सांडिली वो येणें.
दिगंबरें येणें हरिली वो ! ॥२॥
॥ भिन्न ॥
४१०
अति प्रीति न सुटे मज. काये करूं ? कठीण ह !
मन नव्हे ! न संडी ममता !
बोलिजा वो ! बोलिजा माये प्रति माझा.
श्रमु बाइये ! साजणी ! करि, जा, वेगा. ॥छ॥
विसरु न पडे क्षणुही. पडितां वो ! मनी मज.
दिगंबरु देॐ ते न सुटे. ॥२॥
४११
गुणवृत्ती जाली क्षीण भासे दुरी शरीर हें.
मन मरे. निमाली ममता. ॥१॥धृ॥
देखिला देॐ, देखिला हा अवधूतु डोळां.
श्रमु बाइये ! येथूंनि अवघा निमाला. ॥छ॥
अविसरु आठउ गेला. भेदस्पंदु हारपला.
दिगंबरु देॐ हा देखिला. ॥२॥
॥ भिन्न ॥
४१२
संसारीं ये तुवीण माये ! मीं केवि धरूंनि धैर्य राहें ? ॥१॥धृ॥
ये; ये; हृदयीं स्थीरु राहें, श्रीदत्ता ! हेंचि विनवीं तुतें मीं सर्वथा. ॥छ॥
विण तुवां येथें आप नाहीं कव्हणीं. दूरि होसी ते वेळीं काये गती ?
देवा ! दिगंबरा ! कमळनयना ! संसारीं सांडूंनि मातें न जावें. ॥२॥
॥ भिन्न ॥
४१३
कवण करील भेटी ? पाहिन पाउलें दृष्टी.
जाहालें मनस कष्टी. कर्म लागलें पाटीं. श्रमली भारी वो ! माये !
दत्तेसीं पडली तूटी. ॥१॥धृ॥
येइं रे ! येइं कमळनयना ! आत्मया !
वाचूंनि तुज न भजे मीं दूसरी क्रिया. ॥छ॥
दिगंबरा ! होसी माये. पाहासी निदान काये ?
येकुदां पाहीन पाये. मग मी पुडती देवराया !
तुज सोडूंनि न ये. ॥२॥
॥ भिन्न ॥
४१४
वय गेलें हें क्षीण बहू गूण. नेणवें स्वहित - सोये या मना.
देवा येइं रे ! सुखनिधान ! ॥१॥धृ॥
न सोडीं येथूंनि पाये. मनीं भेदु न साहे.
मंगळ ! गुणनिधान ! ॥छ॥
योगधन तूं माझें दिगंबरा ! आत्मया ! तुंविण नेणें दुसरा.
देवा ! निवारी या संसारा. ॥२॥
४१५
आशा धरूंनी मनीं वाट पाहें. जाला उशीरु; दत्तु कां नये.
आतां न जियें येथुंनि माये ! ॥१॥धृ॥
सांडिळी सोये. कां येणें सांडिली सोये ? आतां करूं मीं काये ?
पाहिन पद्मनयना ॥छ॥
दयासागरा ! गुरो ! दिगंबरा ! मुख आठवे तुझें माहेरा !
देवा न दवी या संसारा. ॥२॥
॥ कानडा ॥
४१६
निर्मळ कैसें हो चांदिणें स्फुरताहे मनें.
चंद्रबिंबेवांचूंनि तेणे अरूपगुणें. ॥१॥धृ॥
न कळे, न कळे, माये ! नयनी तयाची सोये. ॥छ॥
निर्मळ मतीचें देखणें निमालेपणें
दिगंबरें दावीलें येणें कैसें मीं नेणें ? ॥२॥
४१७
केवळ दृष्टीचें देखणें हरिलें वो ! येणें
स्थूळ - देहा - भासु मीं नेणें याचेनी गुणें. ॥१॥धृ॥
वारलें, वारलें, माये ! भान. तें आयासि न ये. ॥छ॥
अगुणगूणें वो ! गुंपली; आसक्त जाली;
दिगंबरें प्रबोधली; मीं चि मीं जाली. ॥२॥
॥ कानडा ॥
४१८
श्रीमुख पाहातां सगूण हरिताहे गूण.
पारुषलें माझें हें मन; लागलें ध्यान. ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! माये ! ययाचें दर्शन आहे. ॥छ॥
अद्वयपणें दीसे भेदु; कुंठे अनुवादू; दिगंबर गुणवेधु हरी बिभेदु. ॥२॥
४१९
पद्मनयनाची दासी जायीन पासीं;
झाडीन श्रीचरण केंसीं; आवडि ऐसी. ॥१॥धृ॥
न ये वो ! न ये वो ! माये ! पुडती संसारा न यें ! ॥छ॥
आंगण झाडीन शरीरें येणें साकारें. विसरैन दीगंबरें भान दूसरें. ॥२॥
४२०
चंचळ मन माझें माये ! स्थीर न राहे.
याचे धरितां जीवीं पाये विक्षेपु होये. ॥१॥धृ॥
नवल ! नवल ! रे ! मना ! धरूंनि श्रीदत्तचरणा. ॥छ॥
स्वरूप सिद्धीचें पाहणें हरिलें वो ! येणें.
दिगंबरें निर्गुणगुणें गोविलीं मनें. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP