मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १४०१ ते १४२०

दासोपंताची पदे - पद १४०१ ते १४२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१४०१
चंचळ हें मन स्थीर न राहे, दत्ताचे पाये आठवितां. ॥१॥धृ॥
अर्थाचा लाभु; कोटी ममता. भ्रमु येणेंकरितां होतु असे.
दिगंबरेंविण विश्रांती नाहीं. मनस तये ठयीं बांधयीन.

१४०२
जीवाहुंनि मज प्रिय गे ! माये ! दत्ताचे पाये आठविन. ॥१॥धृ॥
श्रीदत्तें जपु; श्रीदत्तें ध्यान; श्रीदत्तु ज्ञान; ज्ञेयपद; ॥छ॥
श्रीदत्तें मुक्ति; श्रीदत्तें गति; श्रीदत्तें उपशमु; परमविश्रांति; ॥२॥
श्रीदत्ता विद्या; श्रीदत्तगुरू; वेद्य, निरंजन, हा दिगंबरु. ॥३॥

१४०३
नामस्मरण जणु जपकां मनसा. वीण तेणें योगु न वचे कलसा. ॥१॥धृ॥
सावळे, परब्रह्म, सगुण, कमळलोचन न विसंवें. ॥छ॥
दिगंबरें योगें जाणें आत्मा. तूं विश्व, ब्रह्म, सह चिदात्मा. ॥२॥

१४०४
चंचळ जल चळे आयुष्यसरीता;
गेलें तें पानीय; न ये, न ये, धरितां. ॥१॥धृ॥
कवणाची वास पाहातासि ? मनसा !
पल, पल, त्रुटि, लव, जातसे वयसा. ॥छ॥
दिगंबरेंविण सर्व दुःखासि जनक. तयातें आठवीं. देह जायील क्षणिक. ॥२॥

१४०५
सदन, स्वजन, धन, यौवन, वनिता,
मायिक बंधन, येणें न पवसि विहिता. ॥१॥धृ॥
अर्थाचा संदु काइसा ? रे ! मनसा !
प्रारब्धु न चुके. वायां दवडीसी वयसा. ॥छ॥
दिगंबरेंविण जाण श्रमकर सकळ.
मृगतोय पाहातासि; डहुलु कीं नितळ. ॥२॥

१४०६
जन, जन, धन, धन, वणवण करिसी.
श्वान चि काये ? नेणों ! मनुज नव्हसी ! ॥१॥धृ॥
दैवाधिन जीणें; दैवगती मरणें. दैवभोगु हा कवणें निवारिजे ? ॥छ॥
आशापाशबद्ध जे काहीं करिसी; क्रियामण खरे; तेणें अर्थु न पवसी. ॥२॥
दिगंबराप्रति वेगीं रिघ काम तुं शरण. आणिकु करितां धर्मु पावसी पतन. ॥३॥

१४०७
कवण तनुज ? तनु कवणाची ? वनिता ?
ममतासलिल वाहे दुःखाची सरिता. ॥१॥धृ॥
वायां विण कां रे ! बुडतासि ? मनसा !
येणें, जाणें येकलें न धरीं दुराशा. ॥छ॥
गेलें तें आपुलें काये ? आहे तें कवण ?
दिगंबराप्रति वेगीं रिघ कां शरण. ॥२॥

१४०८
अहित, विहित कर्म मानुनि करिसी.
निदान पावलया तुं कैसेनि तरसी ? ॥१॥धृ॥
जाइल हें देहें सुट सकळें. स्वहित कवणें बोलें वो ! सांडिसी ? ॥छ॥
जन्मोजन्मीं तुतें येकू चि सोयेरा; दिगंबरेंविण नाहीं आणिकु दुसरा. ॥२॥

१४०९
चंचळ मन माझें; चंचळ वयसा; चंचळ शरीर; नाहीं भरवसा. ॥१॥धृ॥
दत्ताचें रूप कैसेनि धरवे ? मज माझें नांगवें; काये करूं ? ॥छ॥
दिगंबरें येकें वांचूंनि सकळ चंचळ मानव्य जातसे विफळ. ॥२॥

१४१०
जन, वन, स्थान, सदन, धन, वनिता,
शरीर वेचलें माये ! काये येथें ममता ? ॥१॥धृ॥
येणें गुणें बहू श्रमली गे ! माये ! येणें गुणें० हीत काहीं मीं न लाहें,
येणें गुणें०. सुख ही दुःख होये, येणें गुणें० तापत्रय भोगताहें. ॥छ॥
दिनेंदीनु क्षीणु, क्रमली माये ! वयसा.
दिगंबरेंवीण आतां न रंजवी, मनसा ! ॥२॥

१४११
श्रवण, मनन, निदिध्यासन करितां,
अवस्था लागली; माये ! न ये ते विसरतां.
तेणें वीण माझें मनस न राहे. तेणें० योगु अयोगु होये. तेणें
उपशांती न लहें ! तेणें ० तमोभय बाधिताहे, तेणें वीण. ॥छ॥
दिगंबरतत्व सकळगुणविगत स्वरूप केवल म आझें सवेंसी सहति. ॥२॥

१४१२
अमळ, अचळ, मूळपद नये गणिता.
गणनासारिखें सर्वगत अनुसरतां.
तेणें माझें मन हरिलें गे ! माये ! तेणें०
माझेंपण आयासि न ये. तेणें ०
चित्त विरोनि जाये. तेणें ० मीपण मीं न लाहें, माझें तेणें. ॥छ॥
श्रमसर्वगत, निर्वृत्त, श्रमहरणा ! दिगंबर ब्रह्म चिदन्वित सगुण. ॥२॥

१४१३
सुरगणपती ! कमळकृतनयना !
त्रिभुवनपती ! काळानळशमना !
तुजवीण माझें मनस न राहे. तुज० अर्थु मीं करूं काये ? तुज०
येरें श्रमु जि होये. तुज ० मज कवणु आहे तुजवीण ? ॥छ॥
अमरवल्लभा ! तापत्रयवीमथना ! दिगंबरा ! सुरगुरो ! मोक्षदचरणा ! ॥२॥

१४१४
अमृत तें हीं तें विष मज जालें गोरिये !
विषाचां सागरीं मन बुडताहे, बाइये !
येणेंविण देह न धरी गे ! माये ! येणें ० आंगीं प्राणु न साहे. येणें ०
सर्व वायां जाये. येणें ० गति न पवें उपायें येणें वीण. ॥छ॥
साधनें श्रमू चिं मज योगें आणि तपसें.
दिगंबरें येणें वीण आनहीत न दीसे. ॥२॥

१४१५
॥ चालि भिन्न ॥
तनुत्रय गेलियां मज तुरिया न साहे.
संग दोषजनकु भाॐ; करूं मीं काये ?
गुणसिद्धि सगूणें येणें हरिजत आहे.
सगुण वेदक, मातें स्थिती न मीले. तें पद नें दी वो ! सखिये !
तें पद नें दी वो ! सखिये ! येणें ऐसें काये केलें ? ॥छ॥
येणें गुणें धेलियां मीं वो ! बरया न पाहें !
आंगें योगजनकु सैये ! संगु न लाहें.
श्रीदिगंबरें वो ! गुणी गोविजत आहे. ॥२॥

१४१६
जन, धन, स्वजन, वन, करूं मीं काये ?
मज नित्य वियोगु याचा बाधीतु आहे.
मन, बुद्धि माझी वो ! येणें मोहिली माये !
नयन श्रमले ! मन भ्रमीत जालें.
नये नये वो ! श्री दत्तु ! येणें कां दूरि घेलें ?
येणें कां दूरि धेलें ? ॥छ॥
मज भेटि जालियां मीं परति न लाहें. आंगें आंग लागैन; याचे धरीन पाये.
येणें दिगंबरें वो ! वीण आतां न राहें. ॥२॥

१४१७
येणें दत्तें वांचूंनि रूप नयनीं न पाहें.
बहु काळ जाहालें; आतां मीं करूं काये ?
निज प्राण देईन सैये !       ०    ०    ०    ०
चांदु चंदन मातें आंगीं न साहे. तापत्रय कठीण मज बाधीत आहे. ॥छ॥
गुणगण पारूषले; परति न लाहें. मज माझें मीपण तें ही पारिखें माये ! ॥
दिगंबरे वो ! वीण मनस न राहे. ॥२॥

१४१८
अवधूतें सर्व मजही स्वहीत आहे. गुण कर्म सकळ येर करूं मीं काये ?
अनुमानु सखीये ! झणें मीं येथ पाहें.
संगें सेवन मज साधन माये ! मंत्रसार सर्व ही मातें येथें चि आहे. ॥छ॥
ज्ञानध्यानधारणाध्येय ज्ञेय सर्व सखीये !
येणेंवीण वो ! नलगे; मातें विश्रांति नाहे.
येणें दिगंबरें विण गुणवेगु न साहे. ॥२॥

१४१९
रूप सावळें सुंदर पाहिन नयनी वो !
मन माझें गुतलें अवधूतचरणीं वो ! ॥१॥
निरंतर तेंचि ध्यान, देयीन मीं आलिंगन. विण श्रीदत्तें नसवे;
सांडिन पंचप्राण ! करा, वो ! समाधान ! ॥छ॥
प्रतिक्षणीं अवस्था ते चि ते लागली वो !
दिगंबरातें पाहीन; न राहें मीं येकली वो ! ॥२॥

१४२०
अतिप्रीतीचें बोलणें कठीण जाणवलें.
अवधूतु कां न बोले ? प्रेम चि पारूषले !
दत्ता ! देइं आलिंगन ! तूं चि माझें प्राणधन ! न राहें मीं तुजवीण !
न धरीं हें देहप्राण ! लाडिकें मीललें वड !
बोलाची नेणें खण. मंदमति, ज्ञानहीन. ॥छ॥
केंसीं झाडीन चरण; मीं लोलैन भूमिवरी.
दिगंबरा ! दीगंबरा ! हा चि हा संदु करीं. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP