मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १०४१ ते १०६०

दासोपंताची पदे - पद १०४१ ते १०६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१०४१
कवळूंनि अहंता माझें माझें ह्मणतां, बहुसाल अवधूता ! जन्म गेले.
मतीसि अंधकारु केवळ तुझा विसरु;
करितां हीं वीचारु वच न कळे. ॥१॥धृ॥
लाधलों मीं आतां तुझे हे चरण, कैसी करूं जतन देवा ! तुझे ? ॥छ॥
बहु योग साधितां न कळे जें तत्वता; तें श्रीअवधूता ! स्वरूप तूझें.
अनायासें, जाण, सांपडलें निधान. दिगंबरा ! कवण भाग्य माझें ? ॥२॥

१०४२
परसिद्धि हरणें, ऐसें तुझें करणें; आमुतें लाजिरवाणें ! बोलतां नये !
तस्कराची वृत्ति कवणें केली होतीं ?
साधूची प्रवृत्ति ऐसी काये ? ॥१॥धृ॥
काये सांगों तुझें नवलाचें करणें ?
जनांचीं कां मनें हरितासि तूं ? ॥छ॥
भक्तां सर्व देणें ? कीं त्याचें हरणें ? ऐसें पाहे मनें वीचारुनी !
हा गुणु तुजपासीं. कां गा ! न सांडिसी ?
फळ तैसें पावसी, सत्य मानी. ॥२॥
सकळ अर्थुहीनु तूं होसी अगूणु. रूपें अकिंचनु, अवधारिपां !
दिगंबरपणें भ्रमसी वनेवनें; आतां भक्तांकारणें करीं कृपा. ॥३॥

१०४३
भाव देखोनिया प्रकटु जाला, आमृताचा मेघु जेवि बोलला. ॥१॥
रूप कां चोरिलें ? रे ! आत्मयां ! सुंदर सावलें रे ! ॥छ॥
मायया मोहिती मोहिसी कायी ? दिगंबरा ! तूंचि ब्रह्म अदेही ! ॥२॥

१०४४
॥ मल्हार कांबोद ॥
जन हें वन वजिन साजणी ! जालें मज श्रीदत्ते वांचूंनी.
ने दखे हीतकर वो ! कव्हणी ? करा वेगीं तेणेंसीं मीलणी. ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! कमळनयना ! कई कई करिसी करुणा ?
बाधिताहे ! वियोगुवेदना ! देवा ! धीरु न धरवे मना ! ॥छ॥
कवण दुष्ट दुरित न कळे !
नयनीं रूप न दिसे सावळें. दिगंबरीं मनस गुंतलें.
कयी भेटि देयील ? न कळे. ॥२॥

१०४५
सजळ जळचंचळ नयन; देवा ! तुझे आठवती गुण.
वियोगहुःखसायकीं हें मन; फुटताहे हृदय कठिण. ॥१॥धृ॥
कित्ती काळु पाहों मीं वाटुली स्वजनजनवीजनी येकली ?
देवा ! प्रीति कासया सोडिली ? तेणें मति जाहाली आंधळी. ॥छ॥
देवा ! अंध, मूक मीं बधिर; कवण तुझें दाखवील घर ?
करणगणवीहिन शरीर दिगंबरा ! जाहालें अचर. ॥२॥

१०४६
समळ जळचंचळ सरिता भवदकर्मवासना पाहातां.
वायां मज लोटितासि दत्ता ! बहु रे ! बहु होति आहे वेथा.॥१॥धृ॥
पाहीं, पाहीं परतोंनि पाहीं रे ! क्षणु येकु निश्चळु राहीं रे !
शब्दु येकु बोलोंनि जायीं रे ! पुढें कैसें करूं मीं कायी ? रे ! ॥छ॥
पुडती मुख कई मीं पाहिन ? संगु तुझा केधवां लाहिन ?
दिगंबरा ! बोलपां ! वचन. बहू मज न करीं कठिण. ॥२॥

१०४७
मायेचें मीं बाळकु धाकुलें, गुणहीन मूळिचें येकलें.
वनी तिया मज वो ! सांडिलें. प्रयत्नु तो काहींचि न चले. ॥१॥धृ॥
आतां कित्ती करूं वो ! रूदन ? अतिक्षिण जाहाले नयन.
प्राणकोश वीकळ चेतन; देवा ! मज कां नये मरण ? ॥छ॥
चटपट लागला करणा; कवणाप्रति येइल करुणा ?
जीवीं दुःख न साहे वेदना; दिगंबरे ! दावी वो ! वदना. ॥२॥

१०४८
हृदयीं मज पेटला अनळु; प्राणु माझा जातसे विकळु.
तयाप्रति सारथी अनिळु; तुटोनि बाह्य पडताहे ज्वाळु. ॥१॥धृ॥
दीर्घस्वरें गगन गर्जवीं; दत्ता ! तुजलागि मीं आळवीं.
वियोगवडवानळु निववीं; येथ मज सर्वथा नेठवीं. ॥छ॥
विसरु नये आणितां येथुनि; क्षणक्षणा आठवसी मनी.
ते चि बाण हृदयभुवनी खरत लागती मीपणी. ॥२॥
अरे ! करुणाम्रुतांबुधरा ! कई कई बोलसी ? शंकरा !
वाट तुझी पाहें दिगंबरा ! भेटि देयीं श्रीगुरो ! माहेरा !॥३॥

१०४९
तुजलागि साधिलें तपस, योगवन लंघिलें बव्हस.
तुझें ऐसें कैसें बा ! मनस कठिण हो दिवसेंदिवस ? ॥१॥धृ॥
आतां काये पडणीं पडिजे ? नीडळ हें भूतळीं पीटिजे ?
शरीर हें पावकीं हविजे ? मोहो तुज कैसेनि उपजे ? ॥छ॥
क्रियायोगीं सांडी गणना, तीर्थ परिभ्रमता वेदना.
दिगंबरा ! न ये कां करुणा ? जाला सीणु सांगीजें कवणा ? ॥२॥

१०५०
वियोगदुःखें पडली विकळ; करणगण जाहाले शिथळ;
मनस जाहालें अंतरीं निश्चळ; विरोनि गेले मीपण विरल. ॥१॥धृ॥
आत्मा दत्तु आला वो ! तेव्हेळी गळितगुणबोधनाचा मूळीं.
रूपें रूप अवघें कवळी; वाॐ नाहीं; वेचली पोकळी. ॥छ॥
अवस्थेची मोडली पाहाणी; भानुलोपु जाहाला गगनीं.
गुणी गुण कुंठली करणी, द्रष्टेपण सोडितां साजणी !॥२॥
अवो ! अंतकालिचा सोयेरा न साहे स्वभाॐ या दुसरा.
भेदु नाहीं यया दीगंबरा; जाणवला यये अवसरा. ॥३॥

१०५१
ऐसा दिनु कैं वो ! लाहिन ? नयनीं रूप सावळें पाहिन;
हृदयीं दोहीं बाहीं आळंगिन; चटपट लागली येथूंन. ॥१॥धृ॥
दत्ता ! मीं रे ! पोटिचें लेंकरूं. काये करूं ? न पडे वीसरू.
धरीं, परि न धरवे धीरूं. भवदुःख केवि मीं सावरू ? ॥छ॥
कासेया मी पालउ धरीन ? आतां तुजसंगें मीं येइंन.
दिगंबरा ! न वटे कठिण. बहु दुःखी जाहालेंसे मन. ॥२॥

१०५२
आजि प्रलयानलु पेटला ! मजवरि पर्वतु पडिला !
दिशाभ्रमु सखिये ! जाहला ! करद्वय पीटितां नीडळा ! ॥१॥धृ॥
आधुतु गेला वो ! सांडुनि, सखा मज ये भवविजनी.
बोलविता न बोले वचनी; अश्रुपात चालिले नयनी. ॥छ॥
काये करूं ? जावो मी केउती ? वियोगु माये न साहावे चित्ती !
दिगंबरु केधवां पुडती, नेणें, मज देयिल संगती ? ॥२॥

१०५३
सुंदररूप सावळें डोळस येणें माझें हरिलें मनस;
विषयरस जाहाले विरस; गणिताहे दिवसें दिवस. ॥१॥धृ॥
देखयीन कयी वो ! नयनी ? तगबग लागली साजणी !
अवधुतु न ये कां अझुणी ? उताविळ संगती लागूंनी. ॥छ॥
सांगे काये कागु वो ! सकुणु ? माझा अनुस्पंदे हा नयनु.
दिगंबरें आजि वो ! सुदिनु होइल; ऐसा गमे अनुमानू. ॥२॥

१०५४
पैलु, पाहा, येतुसे कवणु ? नव्हे कीं वो ! कमळनयनू !
सादु घालूं काये मीं येथुंनु ? सखिये ! मजा न राहे वो ! मनु ! ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! सज्जनजीवना ! अरे ! नीरजाकृतनयना !
अरे ! अनसूयेच्या नंदना ! देयीं सादु काळाग्निशमना. ॥छ॥
योगिजनवल्लभा ! राजया ! अवधूता ! आत्मयां ! माझया
स्वजनश्रमहरणा ! सखया ! दिगंबरा ! साधुजनप्रिया ! ॥२॥

१०५५
भुजा दंडु लोडवी चालतां; विदगदु जाणवे पाहातां.
दुजा संगु नावडे अवधुता. होय वो ! सादु घालिन मीं आतां. ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! माझया जनका ! अरे ! अरे ! त्रीपुरनायका !
योगिजनवल्लभा ! बोल ::- कां तुझी खुण नेणवे आणिकां ? ॥छ॥
योगिजन लक्षिती लक्षणें; तयाचें विनिर्फळ देखणें.
वेदवादु कुंठलीं वचनें; शास्त्रवादीं सर्वथा दूषणें. ॥२॥
तुझी खुण आत्मया ! नेणवे; तुं चि तूं जाणसी बरवें.
आह्माप्रति सर्वथा आथी ठावें; दिगंबरु ह्मणौनि बरवें. ॥३॥

१०५६
आजि दिनु संभ्रमु सोहोळा सुंदरु दृष्टी देखिला सावळा.
अवधूतु चिद्धन पूतळा जीवाहूंनि प्रीयू वो ! जवळा. ॥१॥धृ॥
चरण मीं झाडीन कबरीं. परमानंदु न स्माये अंतरीं !
दयामृतधनु वो ! अंबरीं देॐ वो ! बोलला सुंदरी ! ॥छ॥
जीउं बलि देइंन, देयीन ! ऐसें रूप कयीं मी लाहिन ?
दिगंबरु माजें वो ! दिद्धन, प्राणु प्राणा, बाइये ! जीवन. ॥२॥

१०५७
त्रिगुणसंन्निपातु वो ! जाहाला ! स्वरूप मति स्पंदु हारपला !
फांटा जनवादु संचरला ! जनु तेणें न राहे उगला ! ॥१॥धृ॥
वैद्यराजु सद्गुरू सखिये ! अवधूतु न दिसे बाइये !
अंतकाळु हा चि वो ! गोरिये ! स्वरूपें जीत मरणें मेलिये ! ॥छ॥
अहैतुक प्रलपे वचन. अहैतुक पाहाती नयन.
मृषा सत्य जाणवे हें भान. करणगण स्फूरती सगुण. ॥२॥
गर्वगुणें तंद्रि का लागली ? कामक्रोध ये तिस आकळी.
दिगंबरु आठवे तेव्हेळी; ऐसें नाहीं भेषज जवळि. ॥३॥

१०५८
शब्द निःशब्द कंठले; जेथें वेद परतले;
दत्तनाम तें येकलें नित्य घेइंन वो !
कोटि चंद्र शिवळ, शब्दवाद वृत्तिमूळ,
याचें वदनकमळ दृष्टी पाहिन वो !
गुण करितां श्रवण, रूपीं मिसळलें मन.
तें मीं स्वरूप सगुण कयी लाहीन ? वो !
भवदुरितहरण द्रवे जेथूंनि जीवन;
ते मीं हृदयीं चरण नित्य ध्याइन वो ! ॥१॥धृ॥
तो माझें जीवनधन वो ! बाइये ! माझें जीवनधन वो !
माझें जीवनधन अवधूतु स्वजन प्राणीं वोवाळींन वो ! ॥छ॥
योगमतीचा विस्तारू, ज्ञानगुणें जळधरू,
भाग्ये जोडला ईश्वरु गुरु बाइये ! वो !
तेणें द्वैत निमालें; माझें मीपण पारूषलें;
रूप अरूपीं वेचलें गोरिये ! वो !
नेणें अवस्थेची खूण; माझें वेचलें मीपण;
तत्वीं जालें समाधान; जाण, सखिये ! वो !
दिगंबरीं आदरु; ठेला सकळ विस्तारु;
अहंमतीचा वीसरु; पारु गेलियें वो ! ॥२॥

१०५९
लक्ष ठेवितां मीपणीं देह हारपले तीन्ही;
नेणे अवस्था; करणी सर्व राहिली वो !
गुणस्वभाव कुंठले; दृश्य भान वीतूळलें;
शून्याशून्यत्व आतलें स्थिति उरली वो !
ज्ञाताज्ञेयसंवेदन, कर्तासकार्यकारण,
द्रष्टा दृश्येंसीं दर्शन; खूण मोडली वो ! ॥१॥धृ॥
वो ! मीं दत्ती वेचली, गेली वो ! बाइये ! दत्ती वेचली गेली वो !
दत्ती वेचली गेली; दत्तमय जाहाली; दत्ते प्रबुद्ध केली वो ! ॥छ॥
विमळ चैतन्यधन जाहालें सखिये ! मन; माझें स्वरूपीं लीन जाहालें वो !
योगवियोगकल्पना ते मी न करी वासना;
गुणे न ये गुणु गुणा; खुणा न चाले वो !
मींतुंपणाचें स्फुरण, क्षीण जालें संवेदन;
ध्येयीं कुंठलें वो ! ध्यान; मन वारलें वो !
दिगंबरीं नीजानंदु नित्य भजतां प्रबोधु,
तया सुखास वादुबोधु न कळे वो ! ॥२॥

१०६०
द्वैतदृष्टीवेगळें मनाबुद्धी तें नकळे.
वित्त होतें संग्रहिलें; नेलें कवणें वो !
कवण आला वो ! पारिका ? परम दुर्गम भूमिका.
रीघु नव्हे वो ! आणिका; ये कारणें वो !
करितां ऐसी चाळणा; चित्त आडळलें गुणा;
वित्त देखिलें सिवणा; कैसें काढणें ? वो !
अवधूताचा चरणी माझें चिद्घन साजणी !
याची नवलकरणी ! कैसें करणें ? वो ! ॥१॥धृ॥
हा मायावी सगुणु वो ! बायीये ! मायावि सगुणु वो !
मायावि, सगुणु, सरिसिजलोचनु, तत्वता गुणहीन वो ! ॥छ॥
मागतां पडैल तूटि; योगिराजुधूर मोटी;
डोयी घालीन पोटीं सखिये ! वो !
नाइके परावी मातु; प्राणु माझा अवधूत;
केंसीं झाडीन पंथु ? बाइये ! वो !
दोन्ही चरण धरीन; वित्त मागोंनि घेयीन;
त्याची दासि मीं होयीन; जाण, गोरिये ! वो !
तो जरि न सोडी चिद्घन; तरि मीं सवें चि जायीन;
पुडती न यें परतोंन प्राणवेसिये वो ! ॥२॥
काये पां ! कैसें होयील ? मन होताहे व्याकुळ;
करूं नये आंगबळ; स्थळ थोरलें वो !
ठेउंनि वासनेची ऊरि, पासीं असतां उभी दूरि,
चरण धरूंनि अंतरीं मनें अचळें वो !
सगुण तें चि तें निर्गूण, ऐसी प्रकटली खुण.
आपणासहित चिद्घन माझें दीधलें ओव! ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP