मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ११२१ ते ११४०

दासोपंताची पदे - पद ११२१ ते ११४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


११२१
आइकीलें सर्व विसरें ! विसरलासि तें न स्मरें !
चिन्मात्र चि ठाइका उरे रे ! येक भजता ये दुसरें !
वृत्ति सोडूंनि असतां बरें रेया ! ॥१॥धृ॥
ठाइका चि रे ! ठाइका चि रे ! ठाइका चि राहीं ठायीं !
जाणत नेणपण जाणे जाणिव मग पां करणें चि नाहीं रे बापा ! ॥छ॥
प्रबोधु जो निर्गुणाचा असंगु तो चि तो गुणाचा.
भाॐ करि कां क्षीणु तयाचा दिगंबरीं स्वस्पंदु कैंचा ?
बोधु तत्वासि तत्वाचा रे ! ॥२॥

११२२
सजातीय, विजातीय, स्वगत, अद्वय तें जें भेदविगत,
काये निष्ठा पाहातासि ? तेथ रे ! सांडूंनि देयीं निजचित रे !
मग भरैल सभराभरित रेया ! ॥१॥धृ॥
पाहातासि तवं तें नाहीं; पाहे, विसरोंनि ठायीचें ठाइं;
जाणो जाणतां नेणणें ऐसें जाणतां जाणणें
संत बोलती भूषणें दोदूषणें कहीं. ॥छ॥
सकळां साधनांचें कारण, जे सकळां वृत्तीं मरण,
तेथें विक्षेपु ह्मणिजे ध्यान रे !
दिगंबरीं ऐसी खुण रे जाणों जाणती योगीजन रेया ! ॥२॥
स एष नेति नेत्यात्माsगृह्यो न हि गृह्यतेsशीर्य्यो न हि शीय्यतेसंगो
न सज्यतेsसितो न व्यथते

११२३
शरीर, सुत, कळत्र मार्गी जन्म गेले अपार;
सेखीं कवण जाहालें स्थिर तुजपासीं ?
पुढें करिसी सोसणी ते बा ! कवणालागूंनि ?
पाहे विचारूंनि वनी. वायां भ्रमु धरिसी. ॥१॥धृ॥
आतां सांडि संगु तयाचा रे ! अनुबंधु ये ममतेचा.
सोये धरीं रे ! आलया ! व्यर्थ भ्रमलासि वायां !
देह जायील वीलया; मग न चले काहीं. ॥छ॥
सर्व शरीर पवित्र; त्यामाजि द्वार अपवित्र;
कटकटा येरधार घडे तैसेनि पंथें.
जें कीं पाहातां नयनीं अन्न परते माजूंनि,
गंधु भरला येउंनि घ्राणीं विकळु करी ! ॥२॥
जाणत जाणत चि ऐसें, प्रीय ह्मणतासि तें चि कैसें ?
मळ विडुमळद्रवरसें हर्षे जेवी. यके वनितेकारणें दुःख पावसी केसणें ?
पाहीं विचारूंनि मनें झणें, विलंबु करी. ॥३॥
भोगावया कुश्चिळा स्थाना, साहासी पुत्रैषणा वित्तेषणा.
येकि पाळितां अंगना दाहा पाळणें घडे !
साहातां पुत्रांचें नरक, साहावे तदर्थ आणिक;
गृहीं ह्मणे जें जें सुख तें तें दुःख सकळ. ॥४॥
मोटका गवसला देखोंनि वरि हाणती देवगण;
भाग मागती अवदान अन्न पितर ते ही.
राजा, अतीथि, तस्करु, जनु, स्वजनु अपरु
कैसा जालासी किंकरु ? सहसा सूटिका नाहीं. ॥५॥
ऐसें अनिष्ट जाणौन योगी सन्यासी ब्राह्मण
दारा दायादि जन धन सांडूंनि देती.
आत्मा जाणोंनि निर्मळु गुणरहीतु केवळु
येरुं संगु सकळु मळु सांडती स्वयं ॥६॥
आतां अपार असो बोलणें; ये अर्थीं येक चि करणें;
ऐसा सद्गुरू सेवणें, जो कीं तमस हरी !
दिगंबराचे जाहाले, तेहीं दुःखद जिंकिले
जाणों नेणणें आपुलें मूळसहीत मुळें ॥७॥
एवं वै तमात्मानं विदित्वा ब्राह्मणाः पुत्रैषणायाश्च
वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च ॥छ॥

११२४
तुं कवणु ? आधीं जाण; मग उचित तें करीं आन;
नातरि, केलें क्रियामाण दृढबंधन होयील. ॥१॥धृ॥
अरे ! झणें बोलपां तूं जडा ! बहु जाणपण साधूं पुढां;
अति अभिमानु येथें कुडा जाणोंनि, वेडा होतासि. ॥छ॥
यातीतें चि ठाॐ नाहीं, तेणें धर्म आचरावा कायी ?
धावे मार्गु न घलीत ठाई, तो संदेही पडैल. ॥२॥
ब्रह्म चिं जरि तूं साचार; तरि काइसे गुणाचे व्यापार ?
निज निश्चळ निरंतर चराचर हें मृषा. ॥३॥
दिगंबराचोनि अनुवचने तुं चिन्मात्र ऐसें जाणें.
येरा मती भुलपां झणें भवबंधनें न तूटती. ॥४॥

११२५
ब्रह्मज्ञानची वायी तेहीं परि सांडूंनि देयीं.
ईश्वरु कैसा ? कवणु ? कायी ? विवेकु हा ही न करीं. ॥१॥धृ॥
आधीं जाणपां आपणां, अवघीं सांडूंनि कल्पना;
अभिवंदूंनि श्रीगुरुचरणा, मग त्या खूणा पावसी
भेदु सत्य ? कीं अभेदु ? ऐसा न करीं वृथा वादु.
जाणतां तूं चि परमानंदु; भेदाभेदु तो लटिका ! ॥२॥
बंधमोक्षाची कडसणी शाब्दीक झणें वाखाणी;
स्वरूप जाणता स्वस्थानीं मग ते दोन्ही माइक.
प्रपंचज्ञान ही परी जाणोंनि आपणा मग करी;
असत्यभान दीगंबरीं निराकारीं लटिकें ! ॥४॥

११२६
पासीं असोंनि निधान कां भाषितासि दीनपण ?
बरवें आविद्यक जाण; सन्निधान फळलें ! ॥१॥धृ॥
आहा ! रे ! देॐ केनि दैवा ! वायां भ्रमितासि मावा !
माजि घरीं विसरोंनि ठेवा गांवोगांवा धावसी. ॥छ॥
बंधू चि नसतां मूळीं मोक्षु मागतासि देवाजवळि !
देवो तो स्वर्गीं ना ! पाताळीं महीमंडळीं तुजवीण ! ॥२॥
दृश्य दर्शन निरासे; मग द्रष्टेपण चि आड असे !
तें निराशितां तुझें पीसें पाहातां कैसें न संपडे ? ॥३॥
शास्त्रजनित ज्ञान न करी स्वस्वरूप दर्शन !
पुडती संदेहवर्धन, आत्मज्ञान न खंडे ! ॥४॥
श्री सद्गुरूचेनि वचनें तुटती भेदाचीं बंधनें;
होये विश्रांति समाधानें अनुसंधानें दिगंबरी ! ॥५॥

११२७
‘ मीं ’ ह्मणतासि तें चि आड; विण तेणें ब्रह्म उघड;
अवघे अक्षर, नीबीड, अज, अखंड, सर्वदा ! ॥१॥धृ॥
अरेरे ! काये जालें ? जडा ! तुं पाहतासि कवणिकडा ?
दृश्यभ्रमें होसी वेडा ! मग कुवाडां पडसी. ॥छ॥
प्रेम उपजलें कवणाचें ? जीवा मूळीं रूप देवाचे,
जाणोंनि पाहातां दुसरें कैंचें आत्मयांचें पूर्णत्व ? ॥२॥
जें आठउं पाहतासि मनीं, तें आठवांचा चि लयस्थानीं,
मना बुद्धीचां कारणीं, गुण निर्वाणीं सांपडे. ॥३॥
श्रीसद्गुरूचेनि वचनें उगा चि राही आत्मज्ञानें;
वायां वीण येर साधनें; खूण जाणें दिगंबरीं ! ॥४॥

११२८
परोक्षज्ञानें परमात्मा आपरोक्षज्ञानें तो चि आत्मा;
वेगळा नामा रूपा धर्मा गुणा कर्मा नातळे. ॥१॥धृ॥
अरे ! काये पाहातासि दूरि देवा ! ह्मणोंनि बाहेरि ?
जाणें आत्मा अभ्यंतरीं चराचरीं अवघा चि ! ॥छ॥
अनुमानें तर्कु न करीं; साक्षात्कारीं प्रवृत्ति करीं;
स्वरूप निर्धारें निर्धारीं; भाना उरी असे चि ना ! ॥२॥
शास्त्रांचें तोंड रीतें, काये आसक्तु होसी तेथें ?
वादें संतोषु न वर्ते गुरुविण मतें काइसीं ? ॥३॥
करूंनि सर्वाचें विस्मरण वृत्तिविकारातीत मन,
द्रष्टें स्वस्वरूप जाण, गुणहीन दिगंबर. ॥४॥
श्रुति :-
स वा एष महानज आत्माsजरोsमरोsमृतोsभयो
ब्रह्माभयं वै जनक प्राप्तोसीति होवाच याज्ञवल्क्यः
सोsहं भगवते विदेहां ददामि मां चापि सह दास्यायेति
स वा एष महाजन आत्मा जरोsमरोsमृतोsभयो ब्रह्मा भयं
वै ब्रह्मा भय हि वै ब्रह्म भवति य एवं वेद ॥छ॥

११२९
अवस्थेपासाव स्फुरे भान; कारण अवस्थे तें अज्ञान;
अज्ञानपूर्वक अयथाज्ञान; हें भवस्वप्न आभासें ! ॥१॥
कवणु देॐ येथें ? जना ! कीजे कवण उपासना ?
जाणिजे आपण आपणा. उपासना मग कीजे. ॥छ॥
आत्मार्थ चि प्रीय सकळ; नव्हे सर्वार्थ सर्व केवळ.
सुखभोगासि आत्मा मूळ; येर जनजाळ स्वविषयो. ॥२॥
समस्त ही देव सगुण, आणि परब्रह्म ही निर्गुण,
प्रीय आत्मार्थ; ह्मणौन प्रीतिस्थान तो आत्मा. ॥३॥
आपणा वेगळें आत्मधन, तें विषयोपासनेंसीं समान.
येक स्वरूप सेवन सत्य जाण परमार्थु. ॥४॥
हें चि मत योगियांचें, वेदा आणि ईश्वराचें,
दिगंबरा सद्गुरूचें. मत मूर्खाचें अनारिसें ! ॥५॥
श्रुति :--
न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवत्यात्मनस्तु
कामाय पतिः प्रियो भवति ॥छ॥

११३०
तत्वमस्यादि वेदश्रुतीं जीवातें चि ब्रह्म बोलती.
निरशूंनि दृश्याची संगती अतद्वयावृत्ती नेतित्वें. ॥१॥धृ॥
आहा ! काये बोलसी परमाणु ? आत्मा न द्रष्टा; कवणु ?
नित्यु ह्मणतां होसी पाषाणु अवलक्षनु वेद बाही ! ॥छ॥
स्थूळ द्रष्टा स्थूळेंसीं, सूक्ष्म साक्षित्वें सूक्ष्मेंसीं;
आत्मा विलक्षणु दोहींसीं; जड तयासी नेणती. ॥२॥
आश्रिता जाणें आत्मा साना, आश्रयत्वें विलक्षणु ज्ञाना,
परमाणुत्वें दृश्य स्थाना, कीं अज्ञाना आणिसी. ॥३॥
अवस्थात्रयीं विलक्षणता भोक्तृत्वें चि असे पाहातां.
इये हि तुरियेते जाणता तो तत्वता तुं कवणु ? ॥४॥
आत्मस्वरूपाचें ज्ञान स्वसाक्षात्कारें जो नेणोन
ग्रंथाधारें बोले ज्ञान; तया सज्जन हांसती. ॥५॥
मी येथ अहिं नाहीं इतरा पुसिजे जैसें काहीं.
तें चि जाणपण ज्याचा ठाइं अतिसंदेहीं दिगंबरीं. ॥६॥
श्रुति :-----
स वा अयमात्मा ब्रह्म विज्ञानमयो मनोमयः
प्राणामयश्चक्षुर्मयः ॥छ॥

११३१
निदान कालिचा विसावां, योगियां हृदयगतु ठेवा,
पाहो ह्मणतां आठवा जीवा परुता वो !
योगें करूंनियां बळ, लक्ष ठेवितां केवळ,
चूके जयाचें वीमळ रूप भजतां वो ! ॥१॥धृ॥
तो आत्मा श्रीदत्तु वो ! बाइये ! आत्मा श्रीदत्तु वो !
परब्रह्म सदोदित वो ! परिपूर्ण गुणातीत वो !
विश्वेंसीं अन्वित वो ! नामरूपविवर्जित वो !
गुणकर्मविरहित वो ! ॥छ॥
मना बुद्धीचा देखणा, विलक्षणु, देहाद्यवस्थागुणा,
दृढ धरितां मीपणाहूंनि परुता वो !
ज्याचें प्रकटलेंपण, कार्यसहित कारण,
सेष नुरवी सगुण अहंममता वो ! ॥२॥
सकळाम विद्यालयस्थान, पूर्णानंद चैतन्यघन,
परब्रह्म निर्गुण गुणमय जालें.
दिगंबरें हें केवळ नित्य, स्वरूप निर्मळ,
सत्य, सहजु, केवळ, मूळ न विचळे. ॥३॥

११३२
वेद्य, वेदन, वेत्ता, साक्षित्वें चि विलक्षणता;
आतां जाणिजे जाणता अंगें कवणें ? वो !
धृति धरूंनि वेगळा जाणे धारणा सकळा
द्वैतभावें सूटला येणें सगुणें वो ! ॥१॥धृ॥
तो आत्मा अवधूतु वो ! बाइये आत्मा अवधूतुं वो !
ज्ञानज्ञेयविवर्जित वो ! ज्ञानसागर श्रीदत्तु वो !
व्यक्ती आला अव्यक्तु वो ! ॥छ॥
दृश्याचेनि परित्यागें, तद्दर्शनाचेनि अंगें,
द्रष्टा जाणिजे वियोगें गुणमतीचेनि.
तेथें अभाव स्वभाव भाव न धरी जाणिव.
जाणों ह्मणतां नेणिव, ठाये जाणतेपणीं. ॥२॥
जाणत नेणत जाणणें, जाणोंनि तें नेणपणें,
आगां आलया देखणें खुणे खुणे सहजासी.
दिगंबरीं हें बोधन, स्वयं स्वरूपवेदन,
योगी उमजले खुण; ते वदवे कैसी ? ॥३॥

११३३
युक्तांचें गुप्तधन, आणि मुक्तीचें कारण,
कैसी करूं मीं जतन गुणरहिताची ?
जेथें धृतीचें करणें योगा न मिळे धारणे,
प्रति सहज सोडणें युक्ति धारणेची ॥१॥धृ॥
ऐसा आत्मा गुणहीनु वो ! बाइये ! आत्मा गुणहीन वो ?
चिद्वस्तु सनातन वो ! श्रीदत्तु निरंजन वो !
योगमायावीहिनु वो ! ॥छ॥
प्रवर्तन तें गुणाचें; गुण अप्रकाशक वस्तूचें;
एवं सिद्धा साधन कैंचें ? बाइये ! वो !
दिगंबरीं समाधान, सिद्ध सहज चेतन,
वृत्तिविलयें साधन जाण सखिये ! वो !

११३४
दृश्या शरीराचा जाणता, आलिये अवस्थेचा भोक्ता,
तो तुं कवणु ? तत्वता ऐसें जाणपां गा !
जे छों देखिजे देखणें, जो तरि श्रवणीं आइकणें,
रसु जाणवे रसने, स्पर्शु कळे आंगा. ॥१॥धृ॥
तो तूं आत्मा गुणहीनु रे ! बापा ! आत्मा गुणहीनु रे !
परमात्मा गुणहीनु रे ! सर्वात्मा सगुण रे !
परब्रह्म निरंजन रे ! बापा ! ॥छ॥
लयोद्भवस्थान गुणांचें, जाणसीं विभेद तयांचे.
तुजवांचूंनि मतीचें होणें जाणें.
नाहीं दिगंबरेंवांचूंन, हें तव प्रकत चि खुण;
परि येथिचें साधनज्ञान न कळे काहीं ॥२॥

कोsयमात्मेति
११३५
चंचळा प्राणाचा प्राणु, देख तया नयना नयनु;
आत्मा श्रवणाश्रवणु, अन्न अन्नमय.
मन मनाचें कारण, जीव मतीनिरसन,
जेथें उपजे मीपण, स्फुरण जाये विलया. ॥१॥धृ॥
ऐसा मनें जो जाणती, बाइये ! मनसें जाणती,
ते ब्रह्म स्वयं भजती; भवसागरु तरती;
जीवन्मुक्त क्षिती चरती; गे ! बाइये ! ॥छ॥
मायाकृत भवभान, ययाचें जेथ निरसन,
शिवपर निर्गुण तत्व अविकारी.
दिगंबर केवळ मनें जाणोंनि पाल्हाळ,
येर सांडिजे सकळ जाळ श्रमकारी. ॥२॥
प्राणस्यप्राणमुत चक्षुषश्चक्षुः ॥छ॥

११३६
आत्मत्वाचें संस्फुरण तें उपजलें जया पासूंन;
स्वपरवृत्ती आभासमान तें चि आत्मत्वें.
दाउंनि तया मीपणा अंतरीं प्रगुप्त जें दिसेना;
मीपण शरीर तया मीपणा जाणे तो आत्मा.
जया जाणतां मीपण शेष न उरे स्फुरण;
शुद्ध, स्वरूप, निर्गुण, पूर्ण, प्रकट होय. ॥१॥धृ॥
ऐसें जाणणें अध्यात्मज्ञान; एर लटिकें संप्रलपन.
यत्नु करीं रे ! आलया ! नित्य श्रीगुरूसेवया;
वेचु मांडला सेवया; क्रिया न करीं दुजी. ॥छ॥
मीपण नेणे आत्मयां ? आत्मा चि जाणे तया;
नियंता अंतगु तो, या निरसूंनि जाणिजे.
पाहातां तें काहीं चि नसे; तेथ अविनाशु आत्मा चि असे;
देहावस्थाभानदोषें लिंपे चि ना.
जो या सर्वांचें अंतर, जेणें सर्व ही नश्वर;
जो तरि स्फुरे, हें समग्र भानकर्य गुणाचें. ॥२॥
अदृष्ट द्रष्टा तत्वता, अश्रुतु आत्मा श्रोता,
मानिला नव्हे सर्वथा, मानिता चि जो.
ज्ञेय ना जो ज्ञान, ज्ञातेपणाचें कारण;
अनुभविजे खुण ते अखुण अनुभविता चि जो.
जेथें प्रवृत्ति न चले; जो कीं प्रवृत्तीचेनि मूळें
कळे; कळला; न कळे; न कळणें; न साहे. ॥३॥
दुजा द्रष्टा जया सर्वथा नाहीं; मंता, विज्ञाता;
तो आपुला आपणू चि स्वतां स्वप्रकाशु आत्मा.
ऐसी जाणावयाची खुण न कळे दिगंबरें वांचूंन;
येरां मती साधन तें बाहेरि सवडे.
येक नेणती बापुडे; शास्त्रवादें जाले वेडे;
साक्षात्कारू चि घडे; ऐसें बोलती जड. ॥४॥
श्रुति :----
य आत्मनि तिष्ठन्नात्मनोन्तरोयमात्मा न वेदेति अदृष्टो द्रष्टेति ॥छ॥

देवदत्त
११३७
रूपांतःपाती सान ते नाहीं परमाणूहून;
तयातें हीं सूक्ष्म गगन व्यापूंनि असे.
तें हीं परि सछिद्रपणें जाणवों न ये नयनें;
तेथें अदृश्यत्वें असणें सूक्षा शब्दाचें
तो हीं शब्दु श्रवणातें स्थूळत्वें वेद्यु वर्ते;
श्रोत्रसंबंधीं ज्ञान तें अत्यंत सूक्ष. अंतःकरण श्रवणा; ज्ञान अंतकरणा;
आत्मा सूक्ष्मु जाणा ज्ञानाहूंनि. ॥१॥धृ॥
ऐसें सानें आन नाहीं जयाहूंन !
ते सूक्ष्म निर्गुण परब्रह्म गा ! ॥छ॥
थोरामाजि अतिथोर विराट देवाचें शरीर,
चतुर्द्दशभुवनाकार ह्मणौनिया.
तया विराटाहूंनि प्रचंड सप्तावरण ब्रह्मांड;
जयामाजि हें कोड सकळे सृष्टीचें.
ऐसिया अंडाचिया कोटी जीये मायेआतु वटी,
महामाया चि मोटी सकळांहूंनि.
ते ही जेथें येकदेशी निमे ऐसिया रूपासि,
केली मर्यादा कवणासि जाये ? सांग बापा ! ॥२॥
ऐसें सानाहूंनि सान, असाधारणा असाधारण,
ब्रह्म चि येक; वांचूंन दुसरें नाहीं.
जयाहूंनि पर न वर्त्ते स्वयं चि सर्वाकारें.
प्रपंचभाव दर्शनें तें निर्विकल्पत्वें सेवणें;
अथवा, अन्वयज्ञानयोगें तेणें विश्व ब्रह्म.
तेथें भेदें उपासना झणें करिसि अज्ञाना !
वेदविरुद्ध कल्पना योगु झणें बोलसी. ॥३॥
स्ववेद्देचेनि निरासें सर्वा विद्या काहीं चि नसे;
तेणें चि स्वरूपशुद्धांशें मायावी वाॐ.
तेथ जीउ ना सर्वेश्वरु, देहअवस्थागुणव्यापारु,
अत्यंतीकु प्रगोचरु प्रलयो चि तो.
ठेलें स्वपरानुसंधान, सहजें सहज समाधान;
अनुभवें ऐसी खूण प्रत्यया ये.
बापु सद्गुरु ईश्वरू ज्ञान करी दिगंबरु;
यरां न दिसे; आंधारु ते पैं पाहात ठेले ! ॥४॥
यस्मात्परं नापरमस्ति किंचिद्यस्मान्नावीयो
न ज्यायोsस्ति कश्चित् ॥छ॥
अणोरणियान्महतो महीयान् ॥छ॥

११३८
पूज्य, पूजक, पूजन, यये त्रिपुटीहूनि विहिन,
सकळे त्रीपुटीचें भान सहीत येणेंसी;
सहित तरंगाकारें, निस्तरंगु निजाकारें,
सागरु स्वस्थिती स्फुरे जैसा काहीं
तैसा अवघेपणेंसीं अवघा, दाटीतु आंगें आंगा,
आत्मा ब्रह्म जो योगा वियोगा नातळे.
जाणों जाणता अंतरीं दीसे भानाची परी
सर्व सहज अंबरीं वर्ते अंबर जैसें रे ! ॥१॥धृ॥
ऐसें तें निर्गुण ब्रह्म निरंजन
जाणती सज्जन स्वस्वरूप गा ! ॥छ॥
नेणिजे तंवं दुरि अपार अंतर माझारि
जाणतां आपुलां अभ्यंतरीं आपण चि ते !
कीं तत्पदार्थशोधनीं तत्पर आभासे तें तें चि समग्र
त्वंपदार्थगत निरंतर अक्षर चि सर्व.
असि पदार्थें जाणतां माजि भेदु नुरे सर्वथा;
एवं भानेंसीं येकात्मता सहज जयाची.
जाणों जाणें तो देखणा योगी स्वरूपें आपणां;
येरांप्रति ते कल्पना मनें केलि; न वचें !
अतद्रूप नसे काहीं, तद्रूपभान येक ही,
ऐसोनि विरोधें नाहीं विक्षेपु जया.
तें चि जवळि, तें चि दुरि, सर्वां तें बाहेरि, अंतरीं,
मध्यें, सर्व नाममात्र, परी वस्तु सर्वत्र.
सदन्वयव्यतिरेकें भान हें बोलणें लटिकें;
ह्मणौनि सर्वमयत्व आणिकें घेतलें न वचे.
ऐसें जाणतां निर्गुण आड न साहे दर्शन;
बुद्धी स्वरूपबोधन तें हीं सांडणें पडे. ॥३॥
दूरील दृश्य दृश्यपणें जाणोंनि तें सांडणें;
दर्शन हीं तेणें चि मानें आश्रयत्वें करूंन.
द्रष्टेपण प्रकल्पित दूरि त्यक्त साक्षेपित;
एवं जवळि ह्मणौनि अत्यंत जाणणें न साहे.
सकळ वृत्तिपरित्यागें आपण चि जें कीं अवघें,
ते जवळी, दूरि, पुढें, मागें, कल्पना कासी.
सर्व अवघें अक्षर, एकपण निरंतर;
ब्रह्म स्वयं दिगंबर सिद्ध सहज असे. ॥४॥
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वान्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्थास्य बाह्यतः ॥छ॥
यस्तु सर्वाणि भूताण्यात्मन्येवानुपश्यति
सर्वभूषेतु चात्मानं ततो न विजुगुप्सते
यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥छ॥

११३९
यया विश्वाचें कारण पूर्णब्रह्म चि निर्गुण;
तें चि नामरूपाकारें पूर्ण प्रपंचरूपें.
जैसें निस्तरंग जळ तें चि बुदबुद फेन कल्लोल;
परंतु, तेणें भेदें तें वेगळ नव्हे कवणेंसीं.
कायीं सहचर वर्तमान ब्रह्म समवाइ कारण
तेथें भेदाचें भान सामावें जैं,
तैं तें सहज संचलें; जैसें तैसें चि उरलें;
भेदवादियां न कळे बहिर्मुखें वेदनें. ॥१॥धृ॥
ऐसें संपूर्ण ब्रह्म सनातन जाणिजे आपण ज्ञानगम्य गा ! ॥छ॥
सगुण, पूर्ण, येकदेशी, मायामयत्वें परियसीं,
निर्गुण, पूर्ण, तें तयासि व्यापूंनि वेगळें हीं.
तेणें संपूर्ण निर्गुणें सगुण पूर्ण जैं ग्रसणें,
तैं यथापूर्व पूर्णपणें ब्रह्म चि पूर्ण.
तेथें भेद चि उपासना असंबद्ध प्रकल्पना
गुरुहीना अज्ञाना योग्य भासे.
ज्ञानविद्येचा सागरु जरि भेटे दिगंबरु,
तरि स्वरूप निर्द्धारु पारु पावती जड. ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ॐ स्वं ब्रह्म ॥छ॥

११४०
॥ मल्हारु ॥
व्यर्थ श्रवण मनोरंजन करितां, तैं मज न मनें सुखाचें;
विषयसूखस्वप्न क्षणीक भजतां व्यर्थ चि आयुष्य वेचे.
मानव्य देह गेलियावरि बापा ! कव्हणी नव्हे कव्हणाचें.
न धरीं भ्रमु येथें काहीं रे ! आलया ! चिंतन करिं दत्ताचें. ॥१॥धृ॥
रेया ! लाहो, घे सज्जना ! नित्य निरंतर देहीं.
सद्गुरुसंगु घडे, तरि चि तरसी; उपाॐ दुसरा नाहीं. ॥छ॥
श्रवण, मनन, निदध्यासन परि ते गुरुविण फळद चि नोहे.
येकु चि दिनकरु नसतां, इतरीं निसिमान ते केविजाये ?
सकळ श्रमकर साधन भजसी; श्रमु चि तेणें उपायें.
दिगंबरें विण सुटिका कैंची ? तुं दृष धरीं त्याचे पाये. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP