मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ५८१ ते ६००

दासोपंताची पदे - पद ५८१ ते ६००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


५८१
अर्थलाभाचिया कोटीं न पाहे त्या मी दृष्टी. ॥१॥धृ॥
तुझें प्रेम चे, दातारा ! अवधूता ! जी ! माहेरा ! ॥छ॥
दिगंबरा ! तुजवीण न करी दुजें ध्यान. ॥२॥

५८२
न करीं दुसरीं गोष्टी. एकुवेळ देइजे भेटी. ॥१॥धृ॥
दत्ता ! चाळां कां लावीसी ? पूर्वीचे वीसरलासी ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझे आह्मी. तुज नेणोंनि जालों कर्मी. ॥२॥

५८३
देहीं कर्म तें गूणाचें वीवर्तु गुणमायेचे. ॥१॥धृ॥
आतां सांडावें तें काई ? सांडी माडी कारण नाहीं. ॥छ॥
दिगंबर सर्व - सम गुणसहित निर्गुण ब्रह्मं. ॥२॥

५८४
कर्म अकर्म निष्ठा देहीं. तया देहासि ठाॐ चि नाहीं. ॥धृ॥
आतां कर्म ना अकर्म. नीज रूप अवघें सम. ॥छ॥
दिगंबरी पालटु नाहीं. अभिमानु कवणें ठाई ? ॥२॥

५८५
देह वेद्य; देही वेत्ता; दोहींचे अंतर पाहाता;
तेथें बुडालें शरीर; प्रपंच भाव समग्र. ॥छ॥
आत्मया देह - संगु नाहीं. आतां विटाळ कवणे ठाई ? ॥२॥
दिगंबरे मन सोवीळें. न लोपे गुण विटाळे. ॥३॥

५८६
आंगीं नलगे अवस्था. मी असैन चहूं परुता. ॥१॥धृ॥
तेथें भान कैचें काये ? असंगा संगु न साहे. ॥छ॥
दिगंबरें मी असंगु. आह्मा करणें नलगे त्यागु. ॥२॥

५८७
देवीं देवो समर्पिला. होमु हवनी हविला. ॥१॥धृ॥
आह्मी जालो गा ! रीकामे. सुटलों रूपें नामें. ॥छ॥
दिगंबरीं क्रीया नाहीं. गुण गळाले सर्वही. ॥२॥

५८८
पाकावरि कें पेशन ? दग्ध जालया पुनरपि दहन ! ॥१॥धृ॥
आतां योगें जालें पूरें. फीटले कर्मद वारे. ॥छ॥
दिगंबरू आत्मा देहीं. गुण क्रीया मुक्ता नाहीं. ॥२॥

५८९
मुक्तासि बंधन नाथीं. कां बोलो पुडता पुडती ? ॥१॥धृ॥
आतां स्वंडलें, खंडलें. आह्मी न करूं सांगीतलें. ॥छ॥
दिगंबरू आत्मा ब्रह्म. योग्य नव्हे ययाप्रति कर्म. ॥२॥

५९०
देह नाहीं, तैसें आहे. निर्धारु आंगीं न साहे. ॥१॥धृ॥
आतां कवणें घेइजे भारू ? आत्मा मी निराकारू. ॥छ॥
दिगंबरीं देह विवर्त्तु. यया पुडती कें परमार्थु ? ॥२॥

५९१
मोक्षावरि उरलें कर्म. सद्गुरू तुमचें नाम. ॥१॥धृ॥
हातीं घेतली जपमाळा. उच्चारिन वेळोवेळा. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें नाम मोक्षाहुंनि प्रीय परम. ॥२॥

५९२
भेदु सर्वत्र हारपला. तो म्या गुरुचरणीं देखिला. ॥१॥धृ॥
तया सांडूंनि न वचे मन. जेवि दुर्बळ लोभी धन. ॥छ॥
दिगंबरीं भजतां भेदु. तेथ न रूचे ब्रह्मानंदु. ॥२॥

५९३
व्योमासि पल्लव जाले. तैसें मज माझें परतलें. ॥१॥धृ॥
दत्ता ! सगुण जालें पुडती. गुणी गुंपलें आसक्ती. ॥छ॥
दिगंबरा ! तुझी व्यक्ती. मन पडलें येतीरूती. ॥२॥

५९४
योगसाधने सोषिता विश्रांति न वटे चित्ता. ॥१॥धृ॥
देवा ! विक्षेपु करिसी वायां. माझी समाधि तुं योगिराया ! ॥छ॥
दिगंबरा ! सत्य जाण ::- तुझें हो कां मज बंधन. ॥२॥

५९५
तृप्ति होऊंनि क्षुधा उरली. हे अपुर्व नव्हे बोली. ॥१॥धृ॥
दत्ता ! कवळी रे अमुतें. आतां भुलविसी कवणें मतें ? ॥छ॥
दिगंबरा ! तुं अव्ययो. मुक्तातें होसि विषयो. ॥२॥

५९६
पूर्ण ही अपूर्ण जालें. माझें मन कां गा ! परतलें ? ॥१॥धृ॥
दत्ता ! वेध कवण तुजपासी ? सोडिलाही न सूटली. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें ध्यान. न परते तेथुंनि मन. ॥२॥

५९७
ज्ञान मतीचें देखणें, मानलें ही मा तें नमनें. ॥१॥धृ॥
ऐसी कवण याति मनाची ? आवडी हृदई तुझीचि. ॥छ॥
दिगंबरा ! तुझां पाई हित समर्पिलें सर्व ही. ॥२॥

५९८
परद्वीपासि माणिक नेलें ! तेथ पारखी अंध मिळाले !
तयां न कळे पिवळें काळें ! पारखीविण हळवट जालें ! ॥१॥धृ॥
आतां जाणोंनि बोलतां बरवें ! ऐसें घेतलें माझेन जीवें ! ॥छ॥
अर्थु न कळे तें श्रव श्रवण ! दुःख जनक माने कठिण !
दिगंबरी न रमे मन ! वायां जातसें चतुरपण ! ॥२॥छ॥

५९९
चोरा न साहे चंद्रमा ! कुष्टीया आंगीं उपमा !
अभक्तास गुण महिमा ! पापी तो भजे कर्मा ! ॥१॥धृ॥
ऐसें जाणीतलें गा ! देवा ! मीनले बहु जन मावा ! ॥छ॥
शीर - शूळातें गायन ! स्लेष्मला शीर - स्राव !
दिगंबरा ! तुझें ज्ञान वीष वीषइकां लागूं. ॥२॥

६००
शांति नावडे तोंडाळा. नाइकवे पर - गुणु खळा.
हातु न वाहावे व्याळा. परमार्थु तेवि कुश्चीळा. ॥१॥धृ॥
आतां वर्त्तावें तें कैसें ? जन येकुचि बहुविध असे. ॥छ॥
कुचरातें तत्वबोधु नाइकवे श्रवणीं शब्दु.
दिगंबरेसी अभेदु. सत्य गमिती ते साधु. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP