मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ४४१ ते ४६०

दासोपंताची पदे - पद ४४१ ते ४६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


४४१
प्रतिक्षणीं क्षीण क्षणभंगुर वो ! स्थूळ शरीर वो ! हें साकार वो !
अवस्थाजनीत भानगोचर वो ! भासे अस्थीर वो ! तें हीं नश्वर वो !
तापत्रय हें अतिदुस्तर वो ! पोळे अंतर वो ! नव्हे विज्वर हो !
चित्त चंचळ चळे पामर वो ! न भजे सार वो ! तें माजि वो ! ॥१॥धृ॥
काये करू मी वायां भुललियें ? धिग्य नाशलियें ! अर्थीं गुंतलियें !
श्रीदत्तें सद्गुरुरायें सांडीलियें भ्रमें भूतलियें; हीत चूकलियें. ॥छ॥
कर्मकरीं तें गुणीं बाधक वो ! श्रमकारक वो ! नव्हे मोचक वो !
नीचाचें नीचकरी सेवन वो ! जन्मदायक वो ! फळें भ्रामक वो !
कवणा सांगों मी जिवीचें दुःख वो ? जन मायीक वो ! अतद्वादक वो !
दिगंबर परब्रह्म व्यापक वो ! निर्विकल्पक वो ! नेणें हें दुःख वो ! ॥२॥छ॥

श्रीराग.
४४२
श्रमहर वो ! श्रद्धाकार वो ! संकीर्त्तन गुण - संकीर्त्तन
श्रवणीं घेईन माये ! येर शब्द मीं नाइकें.
अवो ! जन - प्रलाप नाइकें. वो ! सैये ! मानस भ्रमीत होये. ॥१॥धृ॥
धृती न धरें; स्मृती न धरे. अनुगायन, याचें गायन,
संकीर्तन, प्रेम - स्पंदन, हृदय भरलें सैये ! ॥छ॥
गुणश्रवणें, तत्वश्रवणें, भ्रमनाशन, भ्रांतिनाशन,
विषद जाहालें माये ! दिगंबरें, श्रीशंकरें,
अवो ! ईश्वरें, जगदीश्वरें, ॥०॥
वो ! सये ! मीपण विरोनि जाये. ॥२॥

४४३
द्वैतहीन वो ! भेदक्षीण वो ! आलिंगन, याचें स्पर्शन,
हृदयीं झेलीन माये ! येर अर्थ नावडती.
अवो ! स्पर्शु दुःखातें करिती. वो ! सैये !
ते सर्व करूं मीं काये ? ॥१॥धृ॥
चंदन मने; चंदन न मने. सरसुमन, माला - सुमन,
दहनु कैसेनी साहें ? ॥छ॥
अळंकारणें, नाना - भरणें, सर - सरकती, बाण लागती;
बाइये ! मज बाण लागती. ॥०॥
हृदयमे दत्त आहे. भेटवा वो ! दीगंबरु.
अवो ! भेटवा वो ! सर्वेश्वरु, ॥०॥
शंकरु. विभ्रम हरैल माये ! ॥२॥

४४४
कृष्णतनु वो ! करुणेक्षणु वो ! पद्मनयनु, पंकजनयनु,
पाहीन नयनीं माये ! येर रूप खरतर;
अवो ! येर रूप खरतर; बाइये ! बाधक बाधीत आहे. ॥१॥धृ॥
जन धन वो ! वन सदन वो ! मनोरंजन, चित्तरंजन,
विचित्र पाहोनि काये ? अवधूताचें दर्शन,
अवो ! श्रीदत्ताचें दर्शन, स्मरण परम - पदद माये ! ॥छ॥
योगधन वो ! विद्याधन वो ! सुखसाधन, सत्यबोधन,
सुरधी - जीवन माये ! दिगंबराचें दर्शन,
अवो ! देवदेवाचें दर्शन, स्पर्शन मुक्तीसि कारण होये ! ॥२॥

पादजळ वो ! विनिर्मळ वो ! अतिपावन ! पुण्यपावन !
रसु मीं सेवीन माये ! येर रस विभ्रामक.
अवो ! कुरस सकळैव, सर्व ही; माजीर शरीर होये. ॥१॥धृ॥
पीयूष तें ही विष वो ! विषयादिक विक्षेपात्मक,
न भजें, न भजें माये ! विषपंचामृतादिक,
अवो ! शेष ही न सकळैक, बाधक. झणें तें नयनी पाहें. ॥छ॥
अन्नरस वो ! मूखशेष वो ! भवनाशन, भेदनाशन,
सेवीन सकळ माये ! दिगंबराचें सर्वदा,
अवो ! देवदेवाचें सर्वदा, सर्वही सेषचि तारक होये ! ॥२॥

४४६
अरे ! मनसा ! रे ! रे ! मनसा ! काये भ्रमसी ? काह्या भ्रमसी ?
भ्रमरु होउंनि राहीं. अवधूत - पदांबुज
अरे ! श्रीदत्त - पादांबुज सहज. सुगंधु तेथिचा घेई. ॥१॥धृ॥
पादतळ वो ! रातोत्पळ वो ! गुणअन्वित, गुणसंसेवित,
संभावित, सुरसंपूजित, नित्य सेवीन माये ! ॥छ॥
गंध तुळसी - पुष्पीं रमसी. कइ कइ मना चंचळ नव्हसी ?
श्रीचरणीं चंचळ नवह्सी ? जाणोंनि स्वहीत - सोये
दिगंबरें येकेंवीण, अरे ! श्रीदत्तें येकेंवीण,
सर्वथा व्यर्थचि सकळ होये ! ॥२॥

४४७
चंद्रानेक - गुणैक - सशितळ, विमळ, सकल - मळहारी,
दत्ताचें रूप ब्रह्मसनातन देखयीन कयीं संसारीं ? ॥१॥धृ॥
मानस मोहियेलें. देवाधिदेवें दत्तात्रयें
श्रीयोगिराजें निजगुणीं गोवियलें. ॥छ॥
विश्वाकार विकारविनाशन, स्वजन - जीवन, गुणकारी,
दिगंबर सुखभान सनातन गुणकृतभेद निवारी. ॥२॥

४४८
ब्रह्मेंद्रादिं - प्रजेंद्र - प्रभाकर - भ्रमर भ्रमती गुणचारी.
तें पादांबुज चंदनचर्चित देखयीन कयी अविकारी ? ॥१॥धृ॥
मन माझें मोहियेलें. वरदरूपें दत्तात्रेयें
श्रीगुरुनाथें रूपें रूप चोरीयेलें. ॥छ॥
मुनिजन - ध्यान - विधान, गुणान्वित, अमित - सुकृत - फळकारी,
दीगंबर दीनार्ति - विनाशन, पादकमळ - दळ - थोरी. ॥२॥

४४९
सिद्धानेक - सहस्र समाहित भजती चरणमहिमान.
तें पादोदक मुक्तिपददायक देयीं मज परमनिधान. ॥१॥धृ॥
स्वजनु तारीयेला. दत्तात्रयें अवधूतें श्रीदेवरायें द्वैत भाॐ छेदियेला. ॥छ॥
योगातीत, वियोग - विनाशन, जनन - मरण - भय - हारी,
दीगंबर, गुरुगम्य, पुरातन, ब्रह्म, अमळ, अविकारी. ॥२॥

४५०
आदिरूप, निगमागम - पूजित, सकळ - विमळ - गुणस्थान,
द्वैताद्वैत - विकल्प - विवर्जित, ब्रह्म, विमळ, परिपूर्ण. ॥१॥धृ॥
श्यामळ देखियलें, स्वरूप माये ! डोळस माये !
नयनीं रूप. मन माझें पारुषलें. ॥छ॥
कार्तवीर्य - वरदैक - सनातन, ब्रह्म, अगूण, गुणधारी,
दीगंबर - रूप राजीव - लोचन माया - तमस निवारी. ॥२॥

४५१
सकळ सुव्रत व्रती जें पद नेणती, जाणती तें जेथ माया,
तें नीरंजन गुणमती - खंडन कैसेनि भजिजे माये ! तया ? ॥१॥धृ॥
मानस पारूषलें, भजनें येणें, अगूण गुणें,
निर्मळपणें. मीपण वीतूळलें. ॥छ॥
सकळ अमरगण कुंठित - साधन मुनीजन वीरमति ठायीं.
तें दीगंबर, गुणमय, शंकर, नयनीं देखिजे रूप दोन्हीं. ॥२॥

॥ चालि भिन्न ॥
४५२
गुणी ही गुणु नाहीं. सेंखीं येथ आकृति तेही.
परम सुख जालें हृदयीं. शरीर नेणें; जाहालें कायी ? ॥१॥धृ॥
काये मीं करूं ? वो ! सखिये ! अनुभउ आया न ये ! ॥छ॥
भवमान हृदयीं सैये ! नेणें. जाहालें कायी ?
करणगण - भावना नाहीं. दीगंबरु भेटला देहीं ! ॥२॥

४५३
॥ श्रीरागु ॥
सजळ नयन दोन्हीं आठवसी प्रतिक्षणीं.
माये ! बापा ! श्रीसद्गुरू ! उपेक्षीं झणीं. ॥१॥धृ॥
कयी नेसी स्वपुराप्रति ? केधवां नेसी ?
कैं येसी ? केव्हां नेसी ? सांग आह्मांसी.
श्रीगुरुराया ! सांग आह्मांसी. ॥छ॥
वीनटले गुणीं गुण; अचळ लागलें ध्यान.
दिगंबरा ! तुझें रूप माझें जीवन. ॥२॥

४५४
गुणीं गुंपलें चेतन करितां तदंग ध्यान.
मीतूंपण वीतूळलें. गणी गण. ॥१॥धृ॥
कांहीं नेणें; याहूंनि पर काहीं नेणें;
काहीं नेणें; हेंहीं नेणें केवळपणें.
मीं मज नेणें केवळपणें. ॥छ॥
देहत्रय वितळलें. भान अभान आतलें.
दिगंबर ! मींचि मातें जाणवों आलें. ॥२॥

४५५
आठवीन तेव्हां येयीं बोलवीतांचि बोलयीं.
ललेवड मीं धाकुलें; लोटिसी कायी ? ॥१॥धृ॥
जळो जीणें ! येथूंनि माझें धिग्य जीणें !
जळो ! जळो ! धिग्य जीणें ! काये करणें ?
सद्गुरुराया ! काये करणें ? ॥छ॥
अर्थु न मगें दुसरा. भेटि देयीं दिगंबरा !
अंतकाळिचा सांगती मातें सोयेरा. ॥२॥

४५६
निडुळीं ठेउंनी बाहे वाटुली पाहें गें ! माये !
पंथु चालतां कव्हणीं जाणवों नये ? ॥१॥धृ॥
दूर - देशीं काये मीं करूं अंतरवासी ? दूरदेशीं दूरवासी सांगों कोणासी ?
मी पाठउं कोणासी ? ॥छ॥
हृदयें मांडिली त्वरा; नयनीं लोटती धारा;
दिगंबरु कइं माये ! येइंल घरा ? ॥२॥

४५७
मूळिचा मीं तुझा पुत्रु. मज काइसा संसारू ?
नको, नको, अवधूता ! अइसें करूं. ॥१॥धृ॥
कयीं देसीं सानिध्यपद ? केधवां देसी ?
कयीं देसीं ? केव्हां देसी ? सांग आह्मांसी;
श्रीदत्तराया ! सांग आह्मांसी. ॥छ॥
जननी, जनकू, गुरू मज तूं श्रीदिगंबरू.
सत्य सर्वज्ञु सारथी, ऐसा निर्द्धारू. ॥२॥

४५८
॥ चालि भिन्न ॥
सिद्धीचें कारण तें तुं सिद्धचि जरी;
सिद्धेशा ! सद्गुरू ! सिद्धिराजा ! अवधारी.
पर, सिद्धि हरिजे; ऐसी कवण हे अवधारी.
ब्रह्म तूं निर्गुण. अवघे आंत बाहेरी. ॥१॥धृ॥
करि रे ! करि रे ! होये तें करि रे ! ॥छ॥
शक्रारिमर्दनु ! तुज हे काइसी कूटि ?
माया प्रधान स्वरूप तूं; हे आख्या ही खोटी.
दिगंबरु चिन्मात्र ब्रह्मगुणा सेवटीं
योग - मती - लय - स्थान कयीं पाहीन दृष्टी ? ॥२॥

४५९
अत्रीचा तपसु कवण तयाची थोरी ?
मायारहित सन्मात्र जैं धरिलें उदरीं.
उपकारु केसणा प्रकट केलें बाहेरी.
अवधूत परब्रह्म धरा हृदया माझारी. ॥१॥धृ॥
दुरि रे ! दुरि रे ! न धरा दुरि रे ! ॥छ॥
कपिलु धाकुळा धन्य अनसुया सती.
अवधुता ! ऐसें रत्न पडलें जियेचां हाती.
धन्य रूषीपुत्र जे तयाचे सांगाती.
दिगंबरें धन्य ! धन्य अवघी जगती. ॥२॥

४६०
योगाचें कारण, सार तूंचि तूं जरी;
परब्रह्म अखंडीत विश्वा आंतु बाहेरी;
योगु तो कासया संपादी शरीरीं ?
परार्थ सकळ तुझें ययाचि परी. ॥१॥धृ॥
नाहीं रे ! नाहीं रे ! नाहीं रे ! तुज तें नाहीं रे ! ॥छ॥
अवघेंचि तूं; तरि त्यागु काइसा तुंते ?
अवघें न होसि तरी तो कवणे मतें ?
दिगंबरा ! सत्य येक जाणवे येथें ::-
न करणें, नाकरणें, गुणी गुण कर्म तें तें. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP