९२१
धन, धनद, साधन नित्य भजताहे;
मन माझें नुपडे तेथूंन; कैसें करूं ? माये !
वन, सदन, स्वजन, जनक, तनुज आन स्वप्न माइक भान भासताहे.
किरणी किरणजाल ढाळें ढळलें; चळ मृगातें चि म्रुगजळ सत्य होये.
ऐसी करितां सोसणी, वय सरलें साजणी !
जरा घडली येऊंनि ! आतां करणें काये ? ॥१॥धृ॥
कट कट्टा मीं भूलैये; येणें शरीरें चाड मज काये ?
विषयसूख सर्वदुःखाचें मूळ; लटिका तें कवणें उपायें ? वो ! ॥छ॥
जन आपुले चि पर माझा अहितीं तत्पर जैसें, तैसें चिशरीर, येर करणगण.
गुण आपुलाला परी भागु भजतीं अंतरीं;
माझें मींपण शरीरीं मज पारिखें मन.
आतां पुरे हे संगती. जीवें धरिली वीरती;
परि सुटिका कवणें रीती ? न कळे खुण.
करूं तपसु कवणु ? माझा हरे केवि सीणु ?
माये ! बगलला मनु अनुवचनें वीण. ॥२॥
सखी ह्मणे ::- वो ! सावरीं; युक्ती आपुली न करीं;
यत्नें पडसील दूरि वरि अयोगदशे. अनुसूयाकुमरु, ज्ञानगुणजळधरू,
योगीराज, सद्गुरू, धीरु, प्रकटु असे.
तया रीघतां शरण, छेदे मायीक सगुण;
भवभयनिरसन होये विण आयासें.
दुजा न करीं विचारु; भजे गुरू दीगंबरु,
भक्तजनसुरतरु; तेणें पावसी दशे. ॥३॥
९२२
अरे ! अरे ! भूमिखडसरा. झणें झणें जाशील बाहिरा.
झडझड करी शीतळु वारा बा ! रे ! सकुमारा अवधूता ! ॥१॥धृ॥
मृद बोल बोले अनसुया; निति प्रबोधी दत्तात्रया.
येरु न राहे तीचेनियां; मायिक क्रीया दावितुसे. ॥छ॥
ती प्रतितिचेनि संकल्पें बाह्य वीचरे आणिकें रूपें.
ऋषिपुत्रहितु साक्षेपें करी योगजल्पें वनक्रीडा. ॥२॥
ऐसें दृष्टी देखोनी समस्ता प्रति अनसूये ऋषिवनिता
बोलों आलिया रोषवंता, तवं अवधूता देखियेलें. ॥३॥
विस्मयो करीती मानसीं ::- अवो ! हे मूर्ति ऐसी कैसी ?
केलें लटिक येणें आह्मासी ! मग अनसूयेसी अनुवदती ::- ॥४॥
अवो ! येणें तुझेनि कूमरें आमुचीं मोहिलीं लेंकुरें.
भ्रमती वनें भयंकरें. योगव्यापारें श्रमवितुसे. ॥५॥
एकीं घातलें वज्रासन. एक लक्ष ठेविती लोचन.
करिती, नेणों, काये तें ध्यान ? ऐसें विंदाण करितुसे. ॥६॥
ऐसा खेळु नाहीं वो ! आइकिला; आह्मीं नाहीं नयनीं देखिला.
योगमुद्रेचा काइसा चाळा ? वेधु लागला. हित नेदी. ॥७॥
तंव अनसुया ह्मणे ::- वो ! राहा; प्रत्यक्षु येथें हा दृष्टी पाहा;
गेला नाहीं वो ! बाहीर ग्रहा; वचनें दाहा झणें प्रळपा. ॥८॥
तवं येरि बोलती ::- वो ! माये ! प्रत्यक्ष तेथें बैसला आहे;
लटीकु तरी येउंनि पाहे. मग लवलाहें उठलिया. ॥९॥
अतिशीघ्र गती त्यां अंगना सवें श्रीदत्तु आलिया वना.
तेथें ही देखती सगुणा, योगनिधाना, अवधूता. ॥१०॥
तिया बोलती ::- पाहे, वो ! माये ! तवं ते ह्मणे ::- हा सवें चि आहे;
नवल, नेणें जाहालें काये ? माझा तो नोहे; जाउंनि धरा. ॥११॥
मग सकळैका आलिया पासीं; करीं धरिती अवधूतासी;
तवं तो नाडळे करासी, रूप त्वचेसी विषयो नव्हे ! ॥१२॥
चालितां न चळतीं बाळकें. तन्मय जालीं तीं सकळैकें.
सांगावया अतिकौतुकें आलिया भूमिके आश्रमासी. ॥१३॥
तव तीं सहज स्वस्थिती आश्रमीं आपुलाला होतीं.
देखोंनि तया वृत्त पुसती. ते बोलती आह्मीं नेणों. ॥१४॥
नव्हे स्वप्न; नव्हे कल्पना; प्रतीति आली या नयना;
सत्य कीं मिथ्या हें कळेना. इतरां जनां आश्चर्य ! ॥१५॥
तें सत्य मानूं; तरि हीं मुलें ! मिथ्या मानूं; तरि देखिलें !
सदसत्व युक्ती न मिळे. बोलतां बोलें न बोलवे ! ॥१६॥
वनक्रिया ते मायावी जाणीतली जनी अघवी.
दिगंबरु ऐसा गुणलाघवी स्तविजे सर्वीं परमात्मां. ॥१७॥
९२३
अवो ! प्रीतिवादाचें बोलणें; क्षोभु धरिला याचेनि मनें;
न पहए, न बोले वचने; रुसला, नेणें, अवधूत. ॥१॥धृ॥
अरे ! तुझे धरीन पाउले; सांग, अपराध काये म्या केले ?
दंडिसी साहीन तीतुलें; मजप्रति बोले अवधूता ! ॥छ॥
अरे ! तूं माझा जीउप्राणू; बा ! होतासि अतिकठिणु;
कवणाप्रति सांगणें सीणु ? हृदयीं बाणु कडतरे. ॥२॥
देवा ! तुज न साहे बोलणें; न साहे दृष्टीचें पाहाणें;
न साहे गुणीक स्तवणें; वेगळेपणें रुसलासी. ॥३॥
आतां मीं शरीर सांडिन; अवस्था आणि द्रष्टेपण;
देवा ! ते न साहाती गुण; स्वस्फुरण तें न करीं. ॥४॥
हे दृश्य सारा वो ! सकळ; संदर्शनें जालीं विकळ;
द्रष्टेपण करा कां निर्मुळ; शुन्य केवळ दुरि करा. ॥५॥
आठउ विसरु वेचला; भेदभाॐ हा विलया गेला;
दिगंबरू आत्मा प्रकटला; आनंदु जाला मज माये ! ॥६॥
९२४
अवो ! माझे जीविचें आरत, पुरवावें मनोगत.
देईन सर्वस्व उचित; कोण दूरित आड जालें ? ॥१॥धृ॥
पाहिन कमळनयना, सावळ्या, करुणेक्षणा.
वियोगु न साहे वेधना; हें मन सगुणा विनटलें. ॥छ॥
सखी बोले ::- अवो ! वो ! सुंदरे ! आत्मा पाहीं अभ्यंतरें;
विश्व भरलें दीगंबरें; भेदु संहारे त्रिविधु माये ! ॥२॥
९२५
अवो ! मज स्वहीतें अचाड योगसेवा हे न लगे गोड.
बोलोनि दावीतसें उघड. न धरी भीड साधूंची. ॥१॥धृ॥
मीं वो ! पाहीन नयनी अवधूतुराजा अवो ! साजणी !
मन माझें गुंतलें सगुणीं. ते तेथूंनी परते ना. ॥छ॥
सखि ह्मणे ::- अवो ! अवो ! सखिये! द्रष्टा द्रष्ट्या न साहे;
दृश्यदर्शन सांडूंणि लाहें; आत्मा पाहें दिगंबरू. ॥२॥
९२६
झणें मज सीकवा कव्हणी ? सुख न वटे माये ! वचनीं;
मी रातली याचा गुणीं; दत्तेवांचूंनी पढिये ना. ॥१॥धृ॥
अवो ! तयासवें मी जायीन; तें स्थळ नयनीं;
जेथें नांदती सुहृद्गण; दत्तभुवन अनुपम्य ! ॥छ॥
सखी ह्मणे ::- अवो ! वो ! आरजे ! र्तु कवणु आधीं बुझें ?
मग साचार द्वैत उमजे; आत्मा सहजें दिगंबरू. ॥२॥
९२७
अवो ! तुह्मीं नेणावो ! तें नेणा; गुण अगणीत तया सगुणा;
निर्गुणत्व तद्वेधें ये गुणा; परि तें मना प्रीय नव्हे. ॥१॥धृ॥
आतां कयी जाइन ? माये ! कै कै पाहीन ते पाये ?
गेल्यावरी पुडती न ये; आठवताहे क्षणक्षणां. ॥छ॥
तयावरि वारीन तपस, साक्ळ योग आणि अभ्यास,
ज्ञान, विज्ञान, कुल साभास. दत्तु जीवास न सोडवे. ॥२॥
प्रतिक्षणीं नये वो ! वीसरु. मन न धरी आत्मविचारू.
काये सांगैल मज तो गुरू ? मातें दिगंबरू न सोडवे. ॥३॥
९२८
सखी ह्मणे ::- अवो ! तूं आरज; स्वप्न चि सत्य मानलें तुज;
आवडी पुढें काइसी लाज ? तें तवं तूजप्रति नाहीं. ॥१॥धृ॥
आतां तूं पाहेपां ! आपणा; देखसी त्याची अभावना;
जागृति मुरे जेवि सिवणा; मृगजळभरणां कां भरिसी ? ॥छ॥
स्वप्नसुख जर्हीं तें अपार, तर्हीं परि काळें येकें नश्वर;
सत्य सर्वदा नीराकार; दिगंबर भजयी पां ! ॥२॥
९२९
सखी ह्मणे ::- नेणो वो ! ते खुण; जो ज्ञानाचें जन्मस्थान
ऐसें कोण बळवंत वेदननिराकरण करीं त्याचें. ॥१॥धृ॥
अवो ! तें चरणवंदन प्रसवे ब्रह्मात्मविज्ञान.
येणेंसी नव्हे तें समान. कार्यकारण गणिजे ना. ॥छ॥
विज्ञानहेतू जें सेविजे; विवेकवंतीं आगविजे;
जें साकार परि सहजें प्रसवे बीजें निर्गुणाची. ॥२॥
अवो ! परब्रह्माचें शोधक, ब्रह्मज्ञान फलदायक,
दिगंबर हें जनतारक. आन अधीक. अधीक बोल झणें. ॥३॥
९३०
सखी ह्मणे ::- अवो ! अकूशले ! तरु न सेवीं, सेवितीं फळें
पूर्णानंदघन, रसाळें; सांडीं डोहळे द्वेताचे. ॥१॥धृ॥
अवो तूं करीं वो ! श्रवण; फळ तें वृक्षाचें कारण;
शेविजे, सांग, सांग, कवण फळ कीं पान, मूळ, शाखा ? ॥छ॥
फळ सेवितां सेविला होये; अंतर्भावीं तरुवरु आहे;
येरु तो स्वादु तयाचा नोहे; जाणोंनि पाहे अनुभवें. ॥२॥
सगुणीं रस आन आन; परि ते तरूरससमान;
ब्रह्म येकरस. नीरंजन, तेवी निर्गुण, दिगंबर. ॥३॥
९३१
सखी ह्मणे ::- अवो ! तूं नेणती, अमितें फळें जयाप्रती.
छाया, स्वजन, विश्रांती, पुडतोपुडती, स्मरताहे. ॥१॥धृ॥
आतां झणें करीं प्रलपन; मज तें न साहे वचन;
अवधूतरायाचें सेवन; ब्रह्मज्ञान काये तेथें ? ॥छ॥
न करीं फळाची मीं आशा; माइकें तया उपदेशा ?
जीउ हा जाहाला वो ! पींसा परमपुरुषाचेनि वेधें. ॥२॥
श्रीदत्तु माझें ब्रह्मज्ञान, योग तपसु आणि चिद्घन;
नो लगे दुजें तेणें वीण; माझें प्राण दिगंबरु. ॥३॥
९३२
मल्हार. सासुरवास.
संसार, दूर देशू, येथ घडला वासु !
दुरळ सासुरें वो ! मज वाटे परदेशू !
सर्व संकल्प मूळ माझी कामना सासू;
सासुरा कामु; माये ! येर जन बहुवसू ! ॥१॥धृ॥
आतां मीं काये करू ? मज न धरे धीरू;
विश्रांति न पवे मीं; नित्य होतसे मारू ! ॥छ॥
क्रोधाचें बळ मोठे; लल्लाट वोखेटें;
हृदय फूटताहे; आतां जाइजे कोठें ?
सर्वांगीं दीपु लागे; प्रळयानळु पेटे;
अवतरे भूत आंगीं; कर्म करवीं खोटें. ॥२॥
तृष्णा हे नणदूली मज लागली मूळीं !
संतृप्त करितां ते अतिक्षीण मीं जाली !
तैसीं चि सकळैकें येही तूहि घातली;
भर्तारु मज नेणें; हे गति मज जाली ! ॥३॥
माहेर आठवलें; चंचळ मन जालें;
नयनीं वाट पाहे; तव मूळ ही आलें !
सर्वज्ञ भायी माझे आंगणीं ठाकले;
मज वेगु सावरे ना; द्रवो लागले डोळे ! ॥४॥
गळ्या झोंबिनली दुःखाची उकळी !
न धरे; स्पंदु आला; ते अवस्था गेली !
कंठासि पैसु जाला; मग, बोलती जाली;
भाइया भागलासी; भली परति केली ! ॥५॥
क्षेम कीं माये माझी, बापु श्रीयागिरा ॐ ?
सकळ बंधुवर्ग ठेवि पाउडा पा ॐ !
येथ विश्रांति नाहीं मज; लागला क्षेॐ !
दिगंबराची आण; भारी येतुसे भेॐ ! ॥६॥
९३३
संसार व्याळवण; येथ काइसे स्थान ?
व्याघ्र, तरस, रीस, वृक वनिचे श्वान !
विश्रांति न पवे मीं येईल मरण !
कवणासि सादु घालूं अवधुता वांचूंन ? ॥१॥धृ॥
वो ! गा ! ये ! देवराया ! मीं जातिसें वायां;
माये तूं बापु दत्ता ! झणें सांडीसी माया ! ॥छ॥
संताप शोक वन्ही परीतु पातला;
मनसें भूलि धेली; अंतकाळु मांडला !
कृपापीयूष वेगीं वोळ, वोळ चित्कळा;
दीनदयाळु होसी दिगंबरा ! कृपाळा ! ॥२॥
९३४
वियोगदुःख माये ! तापु जाणवें आंगीं.
विषय, उपचार ते ही आगळी धगी.
विश्रांति न पवें मीं शरीर सयोगीं.
आयासु न करा वो ! उपशमने लागीं. ॥१॥धृ॥
चांदिणें पोळिता हे; चंदन न साहे.
सकळ अर्थ लाभ आंगीं लागती घाये. ॥छ॥
कवण ते प्राणवेसी भेटि करील दत्तेंसीं ?
धरीन मी पाये तीचे; झाडीन मी केंसी.
जा वो ! उपाय करा; तुटि पडली कैसी ?
वांचूंनि दिगंबरे द्वैत न ये मनासी. ॥२॥
९३५
श्रीदत्तु प्राण, धन, योग, सार, नीधान.
चंचळ मन माझें, केवि करूं जतन ?
जायील हातिचें वो ! मग प्राणु देयीन.
वेचले जन्म कोटी; भाग्ये लाधली खुण ! ॥१॥धृ॥
अरे ! कमळनयना ! गुणी ! अगूणगुणा !
हृदय पर वसवीं; धरीं माझया मना. ॥छ॥
श्रीदत्तु सार माये ! निगमागमीं पाहें
संसारदुःखहानी; योगी सेविती पाये.
भ्रमती वीतरागी; तया आयासि न ये.
दिगंबरु आठवला; स्थीरु कैसेनि होये ! ॥२॥
९३६
हृदयीं दत्तु धन, जेणें माझें दर्शन
सुवर्णमय जालें, तेणें सर्व ही भान.
तन्मय भासताहे; गेलें दुर्बळपण;
जनदृष्टीसि न ये; माझें संपूर्णपण. ॥१॥धृ॥
अरे ! चिद्घन ! धनदा ! अरे ! अत्रिवरदा !
दक्ता ! कमळनयना ! हें चि पुरे सर्वदा. ॥छ॥
गणितां गुणीं न गणें श्रीगुरुचें देणें.
श्रमले वेद च्यार्ही; भाॐ नाहीं गगनें.
ठेवितां वीपरीत सर्व सांडूंनि देणें.
चिद्धन दिगंबरीं ठायें ठाॐ असणें. ॥२॥
९३७
चंचळ जळ चले जैसी सरिता वाहे;
तद्वत् वय जातां हातीं धरिजे काये ?
यालागि सावधानू सेवीं सद्गुरूपाये.
पुढे प्रक्काशु नाहीं. शब्दु लीटका नोहे ! ॥१॥धृ॥
शरीर, जन, जाया, धन, धनद, क्रिया,
वायां वीण हें भजसी; सांडी सकळ माया ! ॥छ॥
जना ! स्वजनभजनें काळु घालीं पां ! झणें.
सदनवनतनुजभ्रमु न धरीं मनें.
जिवन नलनीदलिचें चल होई लक्षणें.
आयुष्य तरि सारीं दिगंबरचिंतनें. ॥२॥
९३८
शक्रारीजंभमर्दना ! अरे! अगूणगुणा ! तुतें सगूण ह्मणती यातिधर्मविहिना
तया विवेकु नाहीं. आलें आमुतें मना.
नग्न, कळत्रवंत, नित्य, अपराधीना ! ॥१॥धृ॥
वायां चि मोहितासी; मज काये तूं देसी ?
रूपें हरलें मनस; नेणें परति कैसी ? ॥छ॥
अर्थासि ठाॐ नाहीं; तुं उघडा देहीं.
तैसें चि दिगंबरा मज करिसी कायी ?
संसारसुख सकल वायां जायील, पाहीं.
जीवासि उरि न दिसेल द्वैत गेलें सर्व ही. ॥२॥
९३९
चातकु, जाण, तुझा शब्दबिंदु मीं मागें.
कैं मेघु वोळसील अवधूता ! प्रसंगे ?
सोषला कंठु माझा; दुःख कवणा सांगें ?
ये गा ! कमळनयना ! पवनाहूंनि वेगें ! ॥१॥धृ॥
अरे ! स्वजनजीवना ! मतीहरणा !
कयी पां ! परति करिसी ? शिवरूपा ! निधाना ! ॥छ॥
संसारसर्पु काळा दिसे प्रत्यक्ष डोळां !
डोले लाउंनि पाहे, तवं स्वप्नीं देखिला.
त्यावरि विस्मरण; ऐसी चूकलों कळा.
कै येसी ? दिगंबरा ! भक्तजनवत्सला ! ॥२॥
९४०
विषम विषयसरिता ढाळीं पडली दत्ता !
सकळ करणगुण हें वोसाण अवधूता ?
जडलें न सूटे मनसीं; थोरि मांडली वेथा !
कवणासि भारु घालिजे तुजवीण ? समर्था ! ॥१॥धृ॥
अरे ! अमरवलुभा ! उडी घालिपां ! उभा.
नयन भ्रमीत जाहाले; कास देयीं हेमगर्भा ! ॥छ॥
आदि, मध्य, अवसान येथ न दिसे काहीं !
विकल शरीर जालें ठाये संसारडोहीं !
कामादि जळचरें तया पारूचि नाहीं !
वेगु करीं दिगंबरा ! प्रकट हृदयीं ! ॥२॥