मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ११८१ ते १२००

दासोपंताची पदे - पद ११८१ ते १२००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


११८१
पाहातां चरण मन विपरीत जालें !
सत्वरजस्तमोमय भान वीतुळलें ! ॥१॥धृ॥
शंकलियें, शंकलियें; पाहातां अवधूतरूप शंकलियें मी ! ॥छ॥
दिगंबरीं मन बुद्धि दीपलें देखणें.
मीपण सखिये ! माझें नुरे तेणें गुणें. ॥२॥

११८२
अज निराकृत मुक्त पद निरंजन;
सावळें रूप माये ! कमळ नयन. ॥१॥धृ॥
गुणहीनु वो ! गुणहीनु वो ! पाहातां सगूण गुणहीनु वो ! ॥छ॥
दिगंबर सार सर्वगत निरंतर
सेविती सज्जन सुखविश्राम मंदी. ॥२॥

११८३
पृथ्वी आपस्तेजो वायुः सछिद्र गगन
अभावीं बुडालें; तेथें नुरे त्रिभुवन. ॥१॥धृ॥
निदान वो ! निदान वो ! प्रबोधु ह्मणिजे गुणनिदान वो ! ॥छ॥
शून्य ना साभास ऐसें अमळ चैतन्य;
दिगंबर परब्रह्म गुणत्रयहीन. ॥२॥

११८४
विराट हीरण्यगर्भ माया महांमाया
उत्पत्तिप्रलयोस्थितिसाक्षित्वअव्यया ! ॥१॥धृ॥
पूर्णपणें रे ! पूर्णपणें रे ! न दीसे काहीं चि परिपूर्णपणें रे ! ॥छ॥
दिगंबर ब्रह्मा, विष्णु, रुद्र, सर्वेश्वरु.
आत्मत्वें मायेचा जाला सकळे संहारु ! ॥२॥

११८५
सूक्ष्म ना कारण स्थूल शरीर आत्मयां !
चतुर्थ शरीर भान न वत्तें अव्यया ! ॥१॥धृ॥
स्वस्वरूपे ! स्वस्वरूपे रे ! निराल निरंजन निर्विकल्प रे ! ॥छ॥
जागृती ना स्वप्न, सुषुप्ति ना तुरीया;
दिगंबरु आत्मा तेथें अविद्या ना माया ! ॥२॥

११८६
श्रवण करितां मन गुणी चि गुंतलें;
ज्ञानाज्ञेय ज्ञान तेथें हारपोंनि गेलें ! ॥१॥धृ॥
संनिधान वो ! संनिधान वो ! दत्ताचें येथूंनि पुरे संनिधान वो ! ॥छ॥
दिगंबरीं भेटि भेद त्रिविध हरण;
अखंड अमळ पद स्फुरे सनातन. ॥२॥

११८७
वाटुली पाहतां गति कुंठली गे ! माये !
कइ देखयीन ? माझी स्फुरतीसे बाहे. ॥१॥धृ॥
जाइन वो ! मीं जाइन वो ! अवधूतसंगें पद पावैन वो ! ॥छ॥
जीवाचे जीवन माझे जीवें वोवाळीन.
दिगंबरु आला, पाये कबरीं झाडीन. ॥२॥

११८८
हृदय दुभागे; मातें वियोगु न साहे.
कयी कयी अवधूता ! तुझे देखयीन पाये ? ॥१॥धृ॥
राहिन वो ! चरणाजवळी; प्राणु, शरीर, जीउ देयीन बळी ! ॥छ॥
बहुत क्रमले काळ तुजविण देवा !
दिगंबरा ! अंतकालीं तूं मज विसांवां ! ॥२॥

११८९
क्षितितळगतु जळमय मळ नाशी.
तीर्थ तें कैसेनि माझी अविद्या नाशी ? ॥१॥धृ॥
सद्गुरू वो ! सद्गुरू वो ! सेवीन मीं तीर्थ ज्ञानसागरू वो ! ॥छ॥
दिगंबरेंवीण काहीं पवित्र न दिसे;
तयातें लाहोंन नीवयीन ब्रह्मरसें. ॥२॥

११९०
हातिचें सुटोंनि होतें बहुत काळ गेले.
आजि सुदीनु; माझें मज सांपडलें. ॥१॥धृ॥
निधान वो ! निधान वो ! अवधूतु माये गुणनिधान वो ! ॥छ॥
प्रयत्नें हृदयीं आतां करीन जतन
सर्वसुखसार दिगंबराचे चरण. ॥२॥

११९१
आठउ करितां, तृप्ति न पवसी मना !
धरूनि चरण तेथें नुरवीं आपणा. ॥१॥धृ॥
योगधन वो ! योगधन वो ! श्रीदत्तु सखिये ! माझें योगधन वो ! ॥छ॥
पाहातां नयनीं मज अंतर न साहे;
पाहाणें सांडूंनि भेटि घेईं लवलाहें. ॥२॥
दिगंबरें वीण मज असिलें न जाये.
सांडूंनि विभेदु आतां तो चि होइन माये ! ॥३॥

११९२
लक्षितां लक्षणें लक्ष पडलें वो ! दूरी.
प्रवृत्ति सांडीन माये ! येथूनि बाहेरी. ॥१॥धृ॥
आत्मारामु वो ! आत्मारामु वो ! श्रीदत्तु सखिये ! परमात्मारामु वो ! ॥छ॥
पाहातां पाहाणें आड पाहाणया जालें;
दिगंबरीं भेटि होतां करीन वेगळें. ॥२॥

११९३
देहेंसीं भेटणें. जळो देह ! आड ठाके !
अवधूतरूप मज नव्हे वो ! पारिकें. ॥१॥धृ॥
निधान वो ! निधान वो ! कमळनयनरूप निधान वो !
दिगंबरू जीवें जीउ प्रीती आळंगीन; सोडूंनि मीपण याचें स्वरूप करीन. ॥२॥

११९४
आठउं करितां मध्यें वीसरू आहे;
आठव विसर आड मज तें न साहे. ॥१॥धृ॥
चिद्धन वो ! माये ! चिद्बन वो ! कमळनयनरूप चिद्बन वो ! ॥छ॥
भेदातें मोडूंनि आला भेटि दिगंबरु;
सांडीन मीपण माये ! आठउ विसरु. ॥२॥

११९५
जाणिवेची खूण मातें जाणवली माये !
आत्मा अवधूतु माझा; मीं चि मातें पाहें. ॥१॥धृ॥
निदान वो ! निदान वो ! साहीन सकळगुणनिदान वो ! ॥छ॥
कर्म तें बाहेरि ठेलें; जाणणें नेणणें.
दिगंबरी भेटि चाड नाहीं वो ! मीपणें. ॥२॥

११९६
मनस चंचल धर्मु न संवरी माये !
हातिचें जाईल दत्तुधन. करूं काये ? ॥१॥धृ॥
साहीन वो ! माये ! साहीन वो ! जीवाचें मरण आंगीं साहीन वो ! ॥छ॥
आतां मीं न धरीं; मुक्त दिधलें सोडूंन. ॥२॥

११९७
श्रीदत्तें मानस माझें हारिलें गे ! माये !
घालितां स्ववृत्तीं, माझें मजप्रति नये. ॥१॥धृ॥
अवगूणु वो ! हा गुणहीनु वो ! कमळनयनु माये ! गुणहीनु वो ! ॥छ॥
विसरू न ये वो ! नित्य कैसें करूं काये ?
दिगंबररूप मज आठवत आहे. ॥२॥

११९८
वियोगें साहिले योग तपस अपार. भेटला श्रीदत्तु; न सोडी निरंतर.
जाईन वो ! मीं जाईन वो ! कमळानयनासवें जायिन वो ! ॥छ॥
दिगंबरी भेटि जाली; न करी साधन;
साच्य चि जाहाली परब्रह्म सनातन. ॥२॥

११९९
पूर्वापरकृत कार्य कर्म विसरली;
श्रीदत्तदर्शनें माये ! कृतकृत्य जाली. ॥१॥धृ॥
निदैन वो ! मीं निदैन वो ! नीजी नीजानंदपदींनिदैन वो ! ॥छ॥
दिगंबरीं भेटीमज योगु ना अयोगु.
दिगंबरीं भेटि मज योगु ना अयोगु.
करिजेतें नाहीं शब्दु राहिला प्रसंगु. ॥२॥

१२००
क्षीतीतळगत जळ न भजें उपायें;
चातकु सोषला परि आळवीतु आहें. ॥१॥धृ॥
देवराया ! कइ घन वोळसी ? दर्शनामृतसीं द्रवसी ? रेया ! ॥छ॥
दिगंबरा ! तूजवीण न करीं समरण;
निदान जाहालें; आतां, देई दर्शन. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP