गज्जलाञ्जलि - प्याला भरला तुझ्याच साठी,...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
प्याला भरला तुझ्याच साठी,
भाळीं रसिका कशास आठी ?
भासे सुरसी जरी ऐराणी,
आहे पण ही ऐरा मराठी.
का, वेषतर्हा दिसे विदेशी
तेणें स्वमनीं कुतर्क घेशी ?
ठावें न कसें रसज्ञतेला ?
सौन्दर्य खुले अनेकवेषीं.
वेषास भुलूनि जात नाही,
कोणीच असा जगांत नाही
वाटे बघ केवि वेषभेदें
ती तीच नभीं प्रभात नाही.
प्राचीन किती परी ऊषा ही,
पूर्वी ऋषि हीस सूक्त गाऊ,
रङगी कवितेपरी नटूनी
कैशी चिरयौवनाच राही !
का वेषच ऐक पाहशी तू ?
अद्वैतहि देख मानसीं तू.
तू मेघ. पिपासु बाग रे मी;
मी सागर आणखी शशी तू.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP