गज्जलाञ्जलि - गमे स्वामि, संसार सारा तु...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
गमे स्वामि, संसार सारा
तुझ्यावीण मिथ्या पसारा.
असो बाग काश्मीरची ही,
तुझ्यावीण वाटे सहारा.
पडो फूल अङगीं जुऊचें.
करी दंश जेवी निखारा.
वियोगीं प्रतीक्षेवरी मी
किती चालवूं रे गुजारा ?
वृथा पाहुं दारीं कितीदा ?
किती घालुं या येरझारा ?
तुला काय साङगूं मुखाने ?
पुरे का न तूते ऐशारा ?
स्फुरे प्रीतिचें गीत चित्तीं,
कुठे तू परी ऐकणारा ?
ऊडे जीव हा प्रेमवातें
जणू की घ्वजाचा फरारा !
३० ऑक्टोबर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP