गज्जलाञ्जलि - जमल्यास आज तारा अथवा खुशा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जमल्यास आज तारा अथवा खुशाल मारा,
तुमच्याशिवाय थारा मजला कुठे ऊदारा ?
प्रभु थोर या जिवाचे, महिमा महींत गाजे,
हृदयीं अखण्ड वाजे तुमचाच हा नगारा.
विभवीं तुम्ही लपावें, अपुल्यामधे रमावें.
तुमच्या परन्तु नावें जगिं कारभार सारा.
रुसलां जहाँपन्हा कां ? किति वेळ मारुं हाका ?
बनवा अमेस राका. नलगे तुम्हां ऊशारा.
उपभोगवस्तु नाना तुमच्याविना वृथा ना ?
मग या पहा जनाना मज हो असहय कारा.
वनभूसि ही दिसे की पसरी कलाप केकी !
फुलवा कटाक्ष - सेकीं हृदयांतला सहारा.
सुकुमार पुष्प - शेजीं, विरहीं न श न्ति दे जी,
छळ काय हाय ये जी ! कुठला सुगन्ध - वारा ?
जगतीं तुम्हीच गाजी, न तुम्हांस कोण राजी ?
तुमचीच मी नमाजीं करितें दुवा ऊदारा !
ऑगस्त १९१९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP