गज्जलाञ्जलि - पदें पाण्यांत सोडूनी बसे ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पदें पाण्यांत सोडूनी बसे तन्वी तटाकी,.
पडे घाटावरी तीची जनानी पायचाकी,
बसे ई सृष्टिच्या घ्यानीं जणू कोरीव मूर्ती,
परी छे ! द्दष्टिची सञ्जीवनी चौफेर टाकी.
दिसे जों भानु शैलाग्रीं बघे रङगूनि हीहीं,
दुणावी तो कपोलींच्या गुलाबांची तकाकी.
जलाच्या आननीं देखा जरा - रेका दिसेना,
हृदीं शोभा सभोतीची कशी रेखीव राखी !
खुले हृत्कान्ति कैशी ही हिच्या या साफ भालीं !
कचभ्रूची प्रतिच्छाया विरोधें सख्य झाकी.
तनूला शुभ्रकाठी ही निळी साडी सुशोभ,
गिरींच्या जाम्भळ्या रङगीं न ही भङगप्रभा की !
कुणाची कोण ही येथे अशी कां ऐकटी ये ?
कशाला व्यर्थ ही चिन्ता ? न ही दैन्यास भाकी.
ऊषा ही भावि आशांची अधिष्ठात्री कुमारी,
न वस्तू खेळ विक्रीची कुणी दासी वराकी.
नव्या मन्वन्तरींची ही ऊमा का शैल - बाला ?
जिची थोरीव जाणाया हवा साक्षात पिनाकी !
१६ जुलै १९३१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP