गज्जलाञ्जलि - दैवयोगें ध्येय आता भेटण्य...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
दैवयोगें ध्येय आता भेटण्याचें घाटतें
तों धुकें कां ऐन वेळीं त्वन्मनीं कोन्दाटतें ?
चेहरा गम्भीर कां गे ? मावळे ऊल्लास कां ?
ओळखीचे भाव कोठे लोपले सैराट ते ?
जीविताचा चैत्र जातां सन्धि आता ये तरी
प्रीतिचें पाणी जितें का ग्रीष्मकालीं आटतें ?
लागलें का खूळ तूतें ? काय वेडी कल्पना !
अन्तरींची शुद्धि का बाहोपचारें बाटते ?
प्रेम सौजन्यें करी जो तो सखा माझाहि गे,
मत्सराभावें खुलूनी प्रेमशोभा थाटतें.
मित्र जाऊनीच यावी सन्धि सोन्याची परी,
या विचारें दील माझेंही पहा गे फाटतें.
काळ दे हालाहलाच्या मागुनी पीयूष हें,
ऐरव्ही पेल्यांत दे तो वीख काठोकाठ. तें.
दुष्ट काळें दीस थोडे ठेविले आता, परी
प्रेमयोगाची मजा ऐका क्षणींही साठते.
२७ एप्रिल १९२९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP