मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनि...

गज्जलाञ्जलि - सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनि...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सहधर्मिणी, तुजवाचुनी दुनिया सुनी मज वाटते,
फिरतों प्रसन्न ऊन्हांत मी तरि अन्तरीं तम दाटतें !

हसतोंफ़ जनांत वरीवरी करुनी रसाळ विनोद मी
परि ऐकला पडतां घरीं हुरहूर गूढ न हो कमी.

जनता जिथे सुखमद्य पी रसरङगमङल ऐत्सवीं
बघुनी तिथे सुखि जोडपीं हरपे मदीय मुखच्छवी.

भरयौवनींहि म्हणूनि मी फिरतों वनीं हृदयप्रभे,
परि हाय ! राहुनि राहुनि राहुनी सय हो जुनी मज दुर्लभे !

डुबरें सडयावर रान का घनदाट लोकर मर्गजी ?
दिसते हरिद्वसना कशी वनदेवता सुखगर्क जी !

कुसरीस शुभ्र बहार का वनतारका करिती स्मितें ?
बहरूनि रानगुलाब हे मधुराग विस्तरिती ऊथे.

चढती दरीतुनि मेघ अन धरिती द्युमण्डलवाट ते -
फिरतों प्रसन्न ऊन्हांत मी तरि अन्तरीं तम दाटतें !

१९ जून १९२३


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP