गज्जलाञ्जलि - किती करिशी विकाप कवे, असा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
किती करिशी विकाप कवे, असा कवितेचिया भजनीं
पदें यमकें रचूनि तुला हवा तरि काय लाभ जनीं ?
असे जरि कीर्ति मोहमयी न दे यशती कधी प्रणयीं;
ठसो कविता प्रिया - हृदयीं; तिला प्रिय भिन्न अर्थ मनीं,
पुन्हा बघ कीर्ति काय बरें, ? अशाश्वत ऐक फुङकर रे !
तुझा भडका ! प्रकाश कुणा ? पहा, गति दिव्य ही कवनी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP