गज्जलाञ्जलि - तुझ्या सम्भाषणाची मला लाभ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तुझ्या सम्भाषणाची मला लाभे सुधा ही,
वियोगाचा न आता मला चण्डांशु दाही.
तुझ्या मन्द स्मितांनी ऊडूं हा जीव लागे,
कधी त्वद्वर्तनींची चळेना ठेपराऊ.
तुझी छायाछबीही करीना धन्य अन्या
तिथे या दर्शनाची कमी का गे कमाऊ ?
जरी संसार - यात्रा ही सदाची चुकेना,
तुझ्या या देवडीची तरी लाभो सराऊ,
तुझ्या ठायींच जेथे असें पावित्र्य आहे,
कशाला पण्ढरी मी स्मरूं ? कां धौम - वाऊ ?
तुझ्या इच्छेप्रमाणे घडूं दे योग भावी.
असे जीवांत आशा, कशाला वेड - घाऊ ?
तुला का आश्रिताची मुळी चिन्ताचा नाही ?
करूं का ऐकला मी नशीबाशी लढाऊ ?
तुझ्या सेवेंत लाभे जिथे निश्चिन्त शान्ती,
कशाला काळजीची हवी ती पादशाही ?
७ नोव्हेम्बर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP