गज्जलाञ्जलि - मोतियाचा सतेज हा गजरा चेह...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
मोतियाचा सतेज हा गजरा
चेहरा यपरी कसा हसरा
म्हणतां का फुरङगटूनि अशा,
‘मानभावी, तुम्ही दुरीच सरा !’
काय थट्टा नको ? नको सलगी ?
मधुभाषाहि का दुरूनि करा ?
दग्धचित्तीं कुठूनि भाव नवा ?
केवि येऊ रणीं नवीन झरा ?
ठरलां का अभागिनी, वेडया ?
यापुढे ना दिवाळि ना दसरा ?
काय हा राग ? छे दिसे ऊसना,
काय रागांत गोड हो नखरा !
मृग नेत्रांतुनी अता वरसे ?
प्रमदांची खरी विचित्र तर्हा !
तूच ना भग्न चित्त सान्धियलें
आणुनी या भिकारियास घरा ?
दग्ध होताच हृठादेश तदा,
भाव - पीकासही तसाच बरा.
मग जाऊं ? कशास राहुं ऊथे ?
भाव माझा तुला गमे न खरा ?
नित्य माझींच गे गळोत टिपें.
चिम्बवीशी कशास तू पदरा ?
जीवघेणी अशी कशी थट्टा ?
संशयाचा नकोच वास जरा.
ये अशी ! यास हात लावुं नको
मीच बान्धीन हा अता गजरा.
१६ ऑगस्ट १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP