गज्जलाञ्जलि - भावपुष्पें फुललीं ही मधु ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
भावपुष्पें फुललीं ही मधु अन्तर्यामीं,
वाहुं कोणास तुम्हांवीण दुज्याला स्वामी ?
या करा धारण हीं ! ये न पुन्हा सन्धि अशी,
काळही खेळुं बघे फुल्ल अशा आरामीं,
देवपूजा मजला कां कथिती साधाया ?
नाथवेडें मन हें हाय रमेना रामीं !
द्दष्टि माझी म्हणती की नच विश्वव्यापी,
विश्व तुम्हांत समाविष्ट तुम्ही हृद्धामीं.
सर्व सौभाग्य तुम्ही ऐक मला हें दिधलें,
स्वर्ग शङकास्पद तो काय मला आगामी ?
हाक मारीन कशी अन्य कुणाला, तुम्ही
पाठिराखे असतां संसृतिच्या सङग्रामीं ?
गोड सेवा करुनी घ्या, न विनन्ती दुसरी,
लाभलें सर्व; दुजी आस करावी कां मी ?
३१ जुलै १९३१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP