गज्जलाञ्जलि - भिल्लीण न तू सुन्दरि, बाण...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
भिल्लीण न तू सुन्दरि, बाणा न शिकारी -
कां मारिशि गो बाण असे तेज जिव्हारीं ?
मी होऊनि होऊं वश तूते वनबाले,
आकर्ण धनुष्यें तर कां व्यर्थ तयारी ?
हें सावज जाऊल भिऊनी न पळूनी
हा बाण विषारी जरि काळीज विदारी.
लावण्यलता तू ललिता, यौवनमत्ता !
काही कर तू माफ तुला ! तू अधिकारी !
खेळांत तुझ्या काय मरावेंच असें मी ?
ही और तुझी जादुगिरी गुङगविणारी !
ऊद्दाम मरुद्वीचिपरी झोक तुझा हा,
दे मान तुला वाकुनि समृद्धि शिवारीं,
साण्डेल गमे तेज असा रङग बघूनी
शाहीर करी खेदच, मी कां न चितारी ?
काढील हबेहूब कसें चित्र चितारी ?
बाहेलच त्यालाहि झणी ऐष्क - विमारी,
ऐत्फुल्ल मिजाशींत पदें टाकित जाशी,
मार्गात किती लोळण घेतात बिचारीं !
मी भऊ भिकारी तर राणी कमला तू,
चुम्बूं मजला देऊ तुझी घोळ - किनारी,
बेमोल पहा प्रेम हृदीं साठुनि राही,
कां व्यर्थ मला मी समजूं क्षुद्र भिकारी ?
या दाट चराऊवर तू गौळण राधा,
मी कां न तुझा राजस तो नन्द - खिलारी ?
२८ एप्रिल १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP