गज्जलाञ्जलि - तुझ्यावीण कुठे झाऊं ? कसा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तुझ्यावीण कुठे जाऊं ? कसा राहुं तुझ्यावीण ?
हवा तू तर मी पक्षि, नदी तू तर मी मीन,
लतेवीण जसा कुञ्ज तुझ्यावीण तसा मी.
तुटे तार तरी व्यर्थ पडे केवि पहा बीन,
कधी लोभ कधी क्षोभ, तर्हा ऐक न तूझी,
कधी प्रेमळ वाचाळ, कधी मूक ऐदासीन,
कधी शुद्धत रोखूनि तुझी द्दष्टि पहाशी,
अधोद्दष्टि कधी व्यक्त करी अन्तर शालीन,
तुझी वृत्ति अशी चञ्चल दे थाङग न लागूं,
तरी पाडुन मोहात करी दास मला दीन,
तुझा अङिकत होण्यात मला मानच वाटे.
जरी तत्त्व खरें हेंहि जिणें नीच पराधीन,
नको लोटुं मला दूर, करी आन हवें तें,
तुझे छन्द सुखें सन्निध मी साहुनि राहीन,
कधी दूर न तू दर्पण राहूं निज देशी,
तुझा मित्र असा मी जड ऐन्याहुनि का हीन ?
२२ जून १९२१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP