गज्जलाञ्जलि - वाट किती पाहुं तरी ? धीर ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वाट किती पाहुं तरी ? धीर निघेना मधुरे,
गूज कथूं का मनिंचें ? तूज कळे तें चतुरे,
सान्ज किती रक्त पहा ! रङग फिका होऊल हा,
मन्द ऊजेडांत अता सन्धि - घडी अर्घ ऊरे.
या गिरिकुक्षींत तळीं गाव जणू बाळ निजे,
मञ्जुळ घण्टारव हा सूचवि गोठयांत गुरें.
पश्चिमवाय़ूसह ये गीतलकेरी दुरुनी.
स्पष्टच हे शब्द मधे पालुपदीं - ‘बाल मुरे.’
हाय ! तुझ्या प्रीतिविणें निष्क्रिय हें जाय जिणें,
मन्त्र तपस्येविण तो होऊनि निस्तेज झुरे,
रूक्ष सडा निर्जन हा तूजमुळे रम्य अहा !
नाहि तरी सर्व जगत नीरस भेसूर भुरें !
काय तुझ्याहूनि मला हो प्रिय ही काव्यकला ?
कीर्ति नको, घालुं कुणा गेऊनि मी हारतुरे ?
भूवर का मत्स्य जगे ? तूच मला जीवन गे,
ऐन्दुमुखी, सिन्धु नको, बिन्दु मला ऐक पुरे !
२९ मार्च १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP