मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
कुणाला कुणी निर्मिलें आणि...

गज्जलाञ्जलि - कुणाला कुणी निर्मिलें आणि...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


कुणाला कुणी निर्मिलें आणि केव्हा,
तुवां मानवाला, तुला मानवें वा -

करो गूढ हें मूढ त्या तार्किकाला,
स्वये वन्दिते भावना तूज देवा.

विराटापुढे काय केवा ?
रजाचा रवीच्यापुढे काय केवा ?

कधी भीतिने स्वार्थ साधावयाही
कराया तुझी धावतों साव - सेवा.

कधी वन्दितों अग्निसुर्यादि तेजें,
नि तीर्थे कधी - जान्हवी, सिन्धु, रेवा.

कधी नेणुनी रूप तूझें अगम्या,
तुला अर्पितों मानवाच्या अवेवां

नको भीति वा वासनाक्रान्ति आता,
कुठे शान्ति, निर्वाण ? दे तोच ठेवा,

तुझ्यासङगती कर्मयोगी करी रे,
कुणालाहि दे स्वर्ग, वाटो न् हेवा.

९ डिसेंबर १९२५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP