गज्जलाञ्जलि - जीव तूजा लोभला माझ्यावरी ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जीव तूजा लोभला माझ्यावरी रे शोभना,
या क्रणाची विस्मृती ती न कधी होवो मना !
कां मुळी कोणी करावें प्रेम खेळाद्यावरी ?
हें तूझें सौजन्य पाणी आणितें या लोचनां.
ज्योति लागूनीहि तूझी पेट मी घेऊंच ना,
नित्य खोचूनी तरी मारूं नको तू टोमणा.
बर्फ हें जेणें द्रवे तेणेंच पाणी आटतें.
लागणीला जन्म दे का मागणीची घोषण ?
शक्तिच्या राज्यांत सक्ती शोभते शोभो तिथे !
प्रतिला स्व्व्व्वन्त्र्या आधि पाहिजे. का होय ना ?
जन्मतां सान्निध्य लाभे, नित्य तें कैचें परी ?
नर्मदा - सोणांस नेऊ दूर दैवी योजना.
आपुल्यामध्ये पडूं दे शैलराजी सहय ही -
भेटती दूरान्तरें सप्रेम कृष्णा - कोयना.
चाललों ऐका दिशेने थोडकें का हें असें ?
सागरीं ऐकाच भेटूं अन्तक्क्क्क्कालीं मोहना.
१८ डिसेम्बर १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP