गज्जलाञ्जलि - जातां टळूनि आवस वाढेल ह्र...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जातां टळूनि आवस वाढेल ह्रच्छशी.
आशेस तों करी हत काळी चतुर्दशी.
ही चन्द्रकोर ये रुचि आणावया तमीं
लोपूनि अल्पकालच तेजांत आवाशीं.
वर्षर्तुचन्द्रिकेपरि होऊनि संसृती
आता सरीवरी सर वर्षे निशा मशी.
कैलास पाहण्यास्तव गेलीस चित्कलें.
ठेवूनि गाढ मागुनि अन्धार मानसीं.
ऊल्का नभास सोडूनि घे झेप खालती,
ज्योतिष्पथास दावुनि लोपे पुन्हा जशी,
सोडूनि तू तशी मज गेलीस राजसे,
गेली त्यजूनि ज्यापरि ऐलास ऊर्वशी.
भ्यावेंस तू जळीं तुज नेल्यास मी बळें,
अव्यक्तसागरीं तर घेशी ऊडी कशी ?
पूर्वी जरी मनोरम थट्टेंत वञ्चिलें,
क्रौर्ये कधी न यापरि तू पाडिलें फशीं.
धर्मार्थकामसाधन केलें समागमें,
कां ऐकटी पुढे द्रुत मुक्तीस पावशी ?
स्वर्गीं परी सुनें तुज वाटेल ना सखे,
पृथ्वीवरी तुझ्याविण वाटे जसें मशी.
३० जानेवारी १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP