गज्जलाञ्जलि - मूर्ति तुझी देखतांच मी पड...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
मूर्ति तुझी देखतांच मी पडलों सम्भ्रमीं,
पूर्ण शशी ये अखेर काय हृदींच्या तमीं !
काय करूं भावसिन्धु ऐत्सुक हेलावतां,
यौवन हें भावभूत, होय न आशा कमी.
हा नखरा, हा कटाक्ष आग न लावील का ?
अन्ध न मी, मी पिसा न, मी नचतुर्थाश्रमी.
मादक केवी ऊरोजवैभव ऊत्फुल्ल हें !
केशन आजानु, पाश गन्धित हे रेशमी.
हास्य तुझें खोडसाळ, राग तुझा लाघवी.
चारुचमूव्यूह थोर, काय करूं ऐक मी ?
मी न करीम व्यर्थ झुन्ज, तूच हवें तें करी,
स्वर्गमहीराज हेंच, मी पथ ऐसा क्रमीं,
कां म्हणशी, हे प्रलाप. संयम कां तूटला ?
ऐक शुकाचार्य मात्र या जगतीं संयमी.
जाण गडे, पाहिजेस तूच मला सङगतीं.
की विरहीं तूजवीण मी तर नित्य श्रमी.
२३ मे १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP