ती म्हणाली, “साङग हे होती कशी ती देखणी.”
मी म्हणालों. “देखणी मीही न गे तीते गणीं.”
ती म्हणाली, “सावळा का वर्ण तो होता तिचा ?”
मी म्हणालों, “गौर होती, प्रश्न नाही कान्तिचा.”
ती म्हणाली, “का स्वभावे गोड होती फार ती ?”
मी म्हणालों, “तो कळेना गे जडे जेव्हा रती.”
ती म्हणाली, “आणि अर्थात याचना झाली तिची ?”
मी म्हणालों, “पूर्तता तेणेंच होऊ प्रीतिची.”
ती म्हणाली, “अन कृपा केली अव्हेराची तिने ?”
मी म्हणालों, “त्या कृपा केली अव्हेराची तिने ?”
ती म्हणाली, “ये वियोगें केवि चित्तीं शान्तता ?”
मी म्हणालों. “मोहिनी ती वीज होती तत्त्वता.”
ती म्हणाली, “मोह का अद्यापिही रेङगाळतो ?”
मी म्हणालों, “विस्मरेना पार गेला काळ तो.”
ती म्हणाली, “भावनेची, छे ! गमे छायाच ती !”
मी म्हणालों, “अन्धळी भावोर्मि होती साच ती !"
ती म्हणाली, “ही अहन्ता ऐक जातीची दिसे !”
मी म्हणालों. “देव जाणे काय तें आहे पिसें.”
ती म्हणाली, “याच वेडाची मजा आहे मुळी -”
मी म्हणालों, “बोलशी काही तरी तूही खुळी.”
२० जुलै १९३१