गज्जलाञ्जलि - मानिनि, जाणार तुझा राग कध...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
मानिनि, जाणार तुझा राग कधी ?
हास गडे, बोल गडे, कां अवधी ?
तापुनिही बोल, सुखें साहिन तें,
दुस्सह हा होय अबोला अगदी.
बोल ऊधारी न न कुणालाहि रुचो,
त्यास गणीं ऐवज मी गे नगदी.
पाप तयाचें बघ तूझ्याच वरी.
मौन जरी गुप्तपणें जीव वधी.
तू तिकडे, मी ऐकडे आणि मधे
काय वहाणारच निश्शब्द नदी ?
थाम्बुनि दोधेंहि दुरी हे पडलों,
सूचवि काहीच न का सप्तपदी ?
वाट बघें मी, न बघे काळ परी,
दे न पुन्हा हा क्षण तो निर्दय - धी.
खूण जराशीच करीं तू नयनें,
पोहुनि येऊन तिथे मी जलदी.
३० सप्टेम्बर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP