मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
शोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...

गज्जलाञ्जलि - शोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


शोकाच्या समुद्रीं खाऊनी गोते
प्रेमज्ञान माझें राहिलें कोतें.

आपोआप केवी दीप हा पेटे
गेलेला निराशावायुच्या झोतें ?

वैशाखांत वाळूची दिसो रेषा,
आषाढीं तिथे कल्लोलिनी लोटे.

मी धारेंत जाऊ का वहावूनी ?
तटीं दुस्सहय ऊत्कण्ठा पहा होते.

प्रेमावीण जाऊ हें जिणें वाया,
जीवा ऐकदा स्पर्शूनि जावो तें !

निन्दायुक्त हास्यें कां पहाती हे ?
मोठे वीतरागी ठोकळे गोठे !

स्वर्गी मृत्युमागूनी हवी रम्भा,
दम्भाने ऐथे कां बोलती खोटें !

१२ जुलै १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP