गज्जलाञ्जलि - तू भासलीस मागे काव्यात्म ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तू भासलीस मागे काव्यात्म सारजा,
तू वाटशी निषादी गौरी नगात्मजा.
जातां खिळूनि जागीं त्वद्रूप पाहुनी
तू विन्धिलें कटाक्षें सम्मूढ सावजा.
आधी करुनि त्याला घायाळ कां अता
खोचून साङगशी की आहेस मुक्त, जा !
गेले तुटूनि सारे सम्बन्ध मागले,
वक्रोक्तिने कशाला देशी अता रजा ?
मार्जार मूषकाशी जो खेळ खेळतें,
खेळांत त्याच का गे वाटे तुला मजा ?
हा योगधर्म साङगें, प्रेमस्वरूप जें,
त्यागूनि अर्थ सारे त्यालाच या भजा.
येऊनि अन्तरूमीं प्रेमांत मी पढें
हा का गुन्हा म्हणूनी देशी मला सजा ?
हे हालहाल आता झाले न का पुरे ?
दे मोक्ष ऐक घावें छेदूनि काळजा !
३० जानेवारी १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP