गज्जलाञ्जलि - बुवा निस्सङग बैरागी श्मशा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
बुवा निस्सङग बैरागी श्मशानें धुण्डतों आम्ही,
स्वगाने जाग आणूनी भुतांशी खेळतों आम्ही.
जयाला ठार मारूनी जगत गाडूनिही टाकी,
पहा सञ्जीवनी कानीं तयाच्या फङकतों आम्ही.
ऐथे स्वीकारितों प्रेमें जगाने टाकिलें जें तें,
भरूनी मूठ धूलीने जगीं सन्तोषतों आम्ही.
पडे घायाळ त्या लावूं सुखाने चुम्बनस्नेहें,
जगाच्या प्रीतिदुक्खांना खुशीने सोसतों आम्ही.
लिहूनी टाकिल्या गोष्ट - हृदींच्या जाहिराती या !
न वाचो वा कुणी वाचो न पर्वा ठेवितों आम्ही.
शिवूंही ना शके जेथे जगींची तीव्र ही स्पर्धा,
नर्भीचे भूतळीं चेण्डू स्थळीं त्या फेकितों आम्ही.
मजेने स्थापुं निर्लज्जा तिला सन्मानुनी अडकीं,
सुखारामीं सदा स्वामी कुठेही झोपतों आम्ही.
अनिष्ठा सौख्यहारी ही प्रियेची - ना परी भीती !
कळे आम्हां, वळे आम्हां, स्वचिन्ता फेकितों आम्ही.
गुरुत्वें आलिया येथे तुम्ही चेलेच व्हायाचे,
पहा शिष्यत्व शिष्याचें परी सम्पदितों आम्ही.
तुम्ही द्या अश्रुला अश्रू, तुम्हांला अर्पितों चावी.
पुढे मारा सुरा वक्षीं, न त्याला गाठितों आम्ही.
३० एप्रिल १९१९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP