गज्जलाञ्जलि - तू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तू आणि मी मिळुनी ऊथे द्दश्यें मनोहर देखिलीं.
तू आणि मी मिळुनी ऊथे स्वप्ने हवेवर रेखिलीं,
तू आणि मी मिळुनी ऊथे म्हटलें क्रमूं घडि नेमिली,
मी ऐकटा भट्कें ऊथे, कळली अता तव बेदिली.
सुकले ऊभे रजतौघ ते, सुकली सुखी कुसुमावली,
विटल्या पहा पहिल्या मऊ हिरव्या तकाकित मख्मली;
आर्द्र प्रकाश न शीकरांतुनि ऊल्लसे वसुधातलीं,
चोहीकडे ही रूक्षता पिवळी छटा फैलावली.
निस्सङग नील नभीं परी गाम्भीर्य निश्चा भासतें.
ऊत्तुंग नील गिरीवरी गाम्भीर्य निर्मल हासतें.
खाली दरींतिल काननीं गाम्भीर्य भीषण साचतें.
माझ्या मनींच्या प्राङगणीं हुरहूर सुन्दर नाचते.
येथे स्थिरेना चारुता बान्धूं कशाला गेह मी ?
हुडकीत चारु गभीरता हिण्डेन भूवर नेहमी.
३० ऑक्टोबर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP