चहुंकडे ढगांच्या माळा,
उभि दरडीवर ती बाला. ध्रु०
वायुची बसे थाप ती, चिरगुटें उडति, केस भुरभुरती,
कां चढली दरडीवरती ? १
चौबाजुंस शेतें छान, झोपडे सान गर्द राईंत,
तें दिसे गार वेलींत. २
टाकोनि मोकळें दार तुफानीं गार आज कां आली ?
कां उभी उंच या काळीं ? ३
क्षणिं नजर फेकि मेघांत, पुन्हा मार्गात काय ही पाही ?
का दिसे दूर हिस कांहीं ? ४
ते विशाल डोळे किती गरगरा फिरति खालती वरती,
गगनाचा वेधचि घेती ! ५
कालवे काय ह्रदयांत ? एक निमिषांत छटा किति खुलती
बिजलीपरि गालांवरती ! ६
प्रीति का मिळे बाजारिं ? काय शेजारिं ? सोड मीमांसा,
प्रीतिमूर्ति बघ ये ऐसा !