समज मानिनी, मान न करिं गे. ध्रु०
झळक चपल ही व्ययार्थ, हीस्तव प्रणयाचा अपमान न करिं गे. १
अमृतमधुर रसपान हवें तरि अधररसाचें दानच करिं गे. २
मधुमय कोमल कमल कमलमुखि, मधुदानीं अनुमान न करिं गे. ३
चंद्रमुखी, हा चंद्र कांतिमय कांतिदानिं अभिमन न करिं गे. ४
अधरमाधुरीविषयिं कृपणपण, नियतिविमुख कृति जाण, न करिं गे. ५
देहभोग हे भोगुनि सरती; सऋण सुमुखि, उत्थान न करिं गे. ६