मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
निशिदिनिं तुज हरि, ध्याइन का मी ?

निशिदिनिं तुज हरि, ध्याइन का मी ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


निशिदिनिं तुज हरि, ध्याइन का मी ?

विकसित कमलासम फुललें मम सुमन तुझ्या पदिं वाहिन का मी ? १

जनिं वनिं गगनीं त्रिभुवनिं एका अनेक रूपीं पाहिन का मी ? २

सुतदारा समजुनि तव सत्ता, प्रेमीं काया झिजविन का मी ? ३

अखिल कर्म या कार्यक्षेत्रीं पूजन समजुनि अर्पिन का मी ? ४

सप्तसुरीं सुरहीन लयीं तुज उन्मादीं कधिं गाइन का मी? ५

विविध कवनिं मम अविविध रसमय लाहुनि तुज कधिं नाचिन का मी? ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - वनहरिणी

राग - भैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - ४ जानेवारी १९२८

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP