धळीलाहि जाऊं मिळोनी सुखें,
घरालाहि होऊं सुखें पारखे,
उपाशी मरूं दूर देशांतरीं.
वनीं रानिं हिंडूं पिशाचापरी,
सुळाच्या अती तीव्र धारेवरी
हसोनी सजूं रक्तपुष्पापरी,
असत्या तुझ्या हा न माथा झुके,
जरी कापशी, काप येईं सुखें !
जुलूमा न दे अंगुली हात हा,
कलम् कर सुखें, आण चाकू पहा ! १०
असे दोगला, दो पित्यांचा तरी
फसे ऐंद्रजालीं तुझ्या यावरी !
फिरूं नागवे होउनी वानरें,
विषारी तुझे ते दुशाले पुरे !
तुझ्या त्या महालां विलासां भुले
महारौरवीं घोर नर्कीं गळे !
नको स्पर्श हा दुष्ट माये अगे !
भुतासारिखा मोह आतां निघे ! १८