मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
समजुनि बांध शिदोरी

समजुनि बांध शिदोरी

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


सहचरि, समजुनि बांध शिदोरी. ध्रु०

आवडनावड राख बाजुला, बघ मार्गाची दूरी. १

गोड करंज्या, खाजीं बासति; बुरसे गे साटोरी २

लग्नीं कार्यीं घीवरलाडू, मार्गिं न त्यांची थोरी. ३

पोहे, सत्तूपीठ, फुटाणे वाट काटितिल सारी. ४

मार्गिं मिळे कीं न मिळे पोई, असुं दे तांब्यादोरी. ५

हरिनामाची गांठ घाल मग न घडे मार्गी चोरी. ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - तिलककामोद

ठिकाण - अजमेर

दिनांक - १ ऑगस्ट १९२२


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP