मिळे गे नयनां नयन जरी-
नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०
काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ? १
विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी. २
पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी. ३
निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी. ४
नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी. ५
पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी. ६