मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
अशांचें कोण करिल तरि काय ?

अशांचें कोण करिल तरि काय ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


अशांचें कोण करिल तरि काय? ध्रु०

वस्त्र हवे ज्यां लाज झाकण्या, अन्न ढकलण्या काय १

रडति न ज्यांचीं रांडापोरें, शिवे धनाची न हाय २

दिली तिलांजलि देहसुकावरि काय अशांस अपाय ? ३

खुशाल घाला अशां तुरुंगी, काय अशांचें जाय ? ४

भीती का चतुरंगबल नृपा ? दिला मृत्युशिरिं पाय ! ५

'जनीं जनार्दन' ही हरिसेवा, अन्य न ज्यां व्यवसाय ६

अशांस पाहे वक्र कुणाची ऐशी व्याली माय. ७

दीन जनांची एक काळजी, मनीं दुजीस न ठाय ८

धन्य तुझा गे कुसवा माते ! दैन्य कां न तव जाय ? ९

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - पतितपावन

राग - अडाणा

ठिकाण - अजमेर

दिनांक - ८ ऑगस्ट १९२२

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP